Lokmat Sakhi >Beauty > उन्हाळ्यात मांडी घासली जाऊन जखमा झाल्या? धड चालता येत नाही? ४ उपाय- घामाचा त्रास होईल कमी

उन्हाळ्यात मांडी घासली जाऊन जखमा झाल्या? धड चालता येत नाही? ४ उपाय- घामाचा त्रास होईल कमी

4 Ways To Prevent Thigh Chafing In Summers मांड्या घासल्या गेल्यानं अनेकींना उन्हाळ्यात प्रचंड त्रास होतो, तो त्रास अंगावर काढू नका.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2023 04:20 PM2023-04-27T16:20:01+5:302023-04-27T16:20:46+5:30

4 Ways To Prevent Thigh Chafing In Summers मांड्या घासल्या गेल्यानं अनेकींना उन्हाळ्यात प्रचंड त्रास होतो, तो त्रास अंगावर काढू नका.

4 Ways To Prevent Thigh Chafing In Summers | उन्हाळ्यात मांडी घासली जाऊन जखमा झाल्या? धड चालता येत नाही? ४ उपाय- घामाचा त्रास होईल कमी

उन्हाळ्यात मांडी घासली जाऊन जखमा झाल्या? धड चालता येत नाही? ४ उपाय- घामाचा त्रास होईल कमी

मांड्यावर मांड्या घासण्याचा त्रास अनेकांना होतो. उन्हाळ्यात बहुतांश जण शोर्ट कपडे घालतात. चालल्याने शरीरातून खूप घाम निघतो. जेव्हा मांड्यांना मांड्या घासतात, तेव्हा खूप जळजळ व रेड रॅशेस तयार होतात. अनेकांना मांड्यांवर मांड्या घासण्याचा इतका त्रास होतो की, त्यांना तिथे जखमाही होतात. तो भाग अधिक काळा दिसू लागतो.

मांड्यांना मांड्या घासल्या की आपल्याला नीट चालताही येत नाही. मांड्यांची जळजळ असह्ह्य होते. या प्रॉब्लेमचा जास्त त्रास महिलांना होतो. यावेळी ते जास्त चालण्यास टाळतात. या समस्येपासून सुटका हवी असल्यास काही घरगुती सोपे उपाय करून पाहा. यामुळे मांड्या एकमेकांना घासल्या जाणार नाही. व चालताना वेदनाही जाणवणार नाही.

हेल्थ शॉट्स या वेबसाईटशी बोलताना मदरहूड हॉस्पिटलचे कन्सल्टंट ऑब्स्टेट्रीशियन अँड गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. स्वाती गायकवाड म्हणतात,  ''मांड्यांमध्ये खाज येण्याची अनेक कारणे आहेत. मुख्यतः जाड मांड्यांना याचा फार त्रास होतो. उन्हाळ्यात याची समस्या वाढते. कारण या दिवसात खूप घाम येतो, म्हणून मांड्या घासल्या जातात. अशावेळी मांड्यांना मॉइश्चरायझर लावा, कोमट पाण्याने अंघोळ करा, टाईट कपडे घालणे टाळा, खाज आल्यास खाजवू नका''(4 Ways To Prevent Thigh Chafing In Summers).

खोबरेल तेल

खोबरेल तेलाचा वापर त्वचेतील जळजळ कमी करण्यासाठी होतो. आपण खोबरेल तेलाचा वापर मांड्यांवर करू शकतात. ज्यामुळे चालत्यावेळी जखमा होणार नाही. खोबरेल तेल रेड रॅशेस कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय आहे. मांड्यांवर मांडी घासल्यानंतर जखमांच्या जागी तेल लावा. याने लगेच आराम मिळेल.

रात्री होतील त्वचेच्या समस्या छूमंतर, खोबरेल तेलाचा करा खास वापर, स्किन चमकेल

एलोवेरा जेल

कोरफडीमध्ये त्वचेला थंड ठेवण्याचे गुणधर्म आहेत. मांड्यांवर मांडी घासून जखमा झाल्या असतील तर, त्या जागी कोरफडीचा जेल लावा. काही दिवस हा उपाय केल्याने नक्कीच फरक दिसेल. व जळजळपासूनही आराम मिळेल.

बेबी पावडर लावा

मांड्यांच्या जडपणामुळे ते एकमेकांना घासतात, त्यामुळे मांड्यांची त्वचा लाल होऊन जखमा होतात. जखमा झाल्या असतील तर त्या ठिकाणी बेबी पावडर लावा. ज्यामुळे ते घासल्या जाणार नाही. व समस्येपासूनही आराम मिळेल.

चमचाभर मेथीचे दाणे -मूठभर कडीपत्ता! दोनच गोष्टी वापरा, केस होतील घनदाट -चमकदार

तुळशीच्या पानांचा करा वापर

स्किन प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर आपण करतोच. हा एक नैसर्गिक उपाय आहे. यासाठी तुळशीच्या पानांची पेस्ट तयार करा. व त्यात काळे मीठ मिसळा. ही पेस्ट मांड्यांवर लावा. काही मिनिटानंतर मांड्या स्वच्छ धुवा. 

Web Title: 4 Ways To Prevent Thigh Chafing In Summers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.