Lokmat Sakhi >Beauty > नाकातले केस दिसतात म्हणून वैतागलात? ४ उपाय - तज्ज्ञांचा सल्ला मात्र घ्या कारण..

नाकातले केस दिसतात म्हणून वैतागलात? ४ उपाय - तज्ज्ञांचा सल्ला मात्र घ्या कारण..

4 Ways To Safely Remove Nose Hair आरोग्य आणि सौंदर्य दोन्हींचा विचार करून योग्य निर्णय घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 12:15 PM2023-04-02T12:15:21+5:302023-04-02T12:16:06+5:30

4 Ways To Safely Remove Nose Hair आरोग्य आणि सौंदर्य दोन्हींचा विचार करून योग्य निर्णय घ्या..

4 Ways To Safely Remove Nose Hair | नाकातले केस दिसतात म्हणून वैतागलात? ४ उपाय - तज्ज्ञांचा सल्ला मात्र घ्या कारण..

नाकातले केस दिसतात म्हणून वैतागलात? ४ उपाय - तज्ज्ञांचा सल्ला मात्र घ्या कारण..

नाकातील केस अनेकांना सौंदर्याच्या दृष्टीने नकोसे वाटतात. पण, आरोग्याच्या दृष्टीने ते खूप फायदेशीर आहे. नाकातील केस हवेमधील प्रदूषण, धूळ, धूर, रोखून ठेवते. जेणेकरून आपल्या फुफुसापर्यंत स्वच्छ हवा जाते. मात्र, वाढलेले केस हे नाकाबाहेर दिसू लागले की, प्रचंड खराब दिसतात. ज्यामुळे अनेकवेळा लाजिरवाणेपणाला सामोरे जावे लागते. आपण इतरांशी बोलताना संकोच बाळगतो. जर आपल्याला नाकातील हे केस काढायचे असतील, तर या काही टिप्स फॉलो करा. याच्या मदतीने नाकातील केस सहज निघतील(4 Ways To Safely Remove Nose Hair).

इलेक्ट्रिक शेवर

बाजारात विविध प्रकारचे इलेक्ट्रिक शेव्हर्स उपलब्ध आहेत. या शेवर्सच्या मदतीने नाकातून बाहेर आलेले केस सहज काढू शकता. या इलेक्ट्रिक शेवरमुळे अधिक त्रास देखील होणार नाही. केस देखील जलद गतीने ट्रिम होतील.

केमिकल न वापरता हातावरची मेहंदी रंगेल लाल, करा फक्त ४ गोष्टी.. मेहंदी रंग लायेगी

कात्री

आपल्याकडे इलेक्ट्रिक शेवर उपलब्ध नसेल किंवा, इलेक्ट्रिक शेवर वापरताना घाबरत असाल तर, कात्रीच्या मदतीने नाकातील केस काढू शकता. मात्र, नाकातील केस ट्रिम करताना सावधगिरीने कापा. कात्रीमुळे नाकाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्या.

ओपन पोर्समुळे चेहरा खराब दिसतो, ब्लॅकहेड्स वाढलेत? ३ उपाय, चेहरा दिसेल स्वच्छ-चमकदार

वॅक्सिंग

आपण शरीरातील इतर भागातील केस काढण्यासाठी वॅक्सिंगचा वापर करतो. वॅक्सिंगमुळे केस मुळापासून निघतात. आपण याचा वापर नाकातील केस काढण्यासाठी देखील करू शकता. वॅक्सिंगमुळे नाकाला इजा पोहचण्याची भीती कमी होते.

लेझर उपचार

वारंवार केस ट्रिम करण्यापासून वैतागलात असाल तर, लेझर उपचारांचा अवलंब करू शकता. याने केस कायमचे निघून जातील. व वारंवार केस काढण्याची झंझट उरणार नाही. लेझर उपचार आपण घेत असाल तर, एखाद्या चांगल्या तज्ज्ञांकडून करून घ्या, अन्यथा नंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Web Title: 4 Ways To Safely Remove Nose Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.