केसांच्या अनेक समस्या आजकाल सगळ्यांनाच सतावत आहेत. केस गळणं, केस कमकुवत होणं, अकाली पांढरे होणं यांसारख्या अनेक लहान मोठ्या समस्या आता अगदी कॉमन (Amla For Long Strong & Black Hair) झाल्या आहेत. आपले केस काळेभोर, घनदाट, लांबसडक असायला हवेत असं प्रत्येकीला वाटत, परंतु तसे होत नाही. महिलांच वय कितीही वाढत (Indian Gooseberry For Hair Use) गेलं तरीही त्यांचं केसांवरच प्रेम काही तसूभरही कमी होत नाही. अशातच केसांच्या अनेक समस्या त्रास देतात, यामुळे केसांचे आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही बिघडते(4 Ways to use Amla for hair growth, thickness).
केसांच्या बाबतीतल्या अनेक समस्या दूर करायच्या म्हटलं तर लगेचच बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पर्यांयांचा वापर केला जातो. परंतु सध्या हेअर प्रॉब्लेम्स कमी करुन केसांना लांब आणि दाट बनवण्यासाठी सध्या कोणतंही उत्पादन वापरण्यापेक्षा घरगुती उपायांचा वापर करु शकतो. घरगुती उपायांमध्ये साईड इफेक्ट्सचा धोका कमी असतो आणि केस नैसर्गिकरित्या चांगले राहतात. हिवाळ्यात बाजारांत विकत मिळणाऱ्या आवळ्याचा वापर करुन आपण केसांच्या अनेक समस्यांना कायमचे दूर ठेवू शकतो. केसांसाठी आवळ्याचा वापर फार पूर्वीपासूनच केला जात आहे, त्यामुळे आवळा केसांसाठी एक वरदानच आहे. यंदाच्या हिवाळ्यात केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आवळ्याचा वापर कसा करावा, ते पाहूयात.
केसांसाठी आवळा वापरण्याच्या पद्धती कोणत्या ?
१. केसांसाठी एखाद्या चांगल्या हेअर वॉशप्रमाणे तुम्ही आवळ्याचा वापर करू शकता. यासाठी १ चमचा आवळ्याच्या पावडरमध्ये रिठा पावडर मिसळा आणि त्यात जवळपास १०० मिलीटर पाणी मिसळा. रिठा पावडर न मिसळताही तुम्ही हे मिश्रण तयार करू शकता. हे पाणी केसांच्या मुळांना व्यवस्थित लावून ४ ते ५ मिनिटं मसाज करा. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा.
हिवाळ्यात कोरड्या ओठांवर लिपस्टिकचे तडे दिसतात? ४ टिप्स, लिपस्टिक टिकेलही-दिसेलही छान...
२. एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात आवळ्याचे लहान तुकडे किंवा आवळा पावडर दोघांपैकी काहीतरी एक घालावे. त्यानंतर पाणी गॅसच्या मंद आचेवर उकळवण्यासाठी ठेवून द्यावे. १० ते १५ मिनिटानंतर पाणी व्यवस्थित उकळून गरम झालेले असेल. जेव्हा या पाण्याचा रंग बदलून हलकासा सोनेरी रंग येतो, तेव्हा या आवळ्याचे गुणधर्म त्या पाण्यांत उतरले आहेत असे समजावे. मग गॅस बंद करुन हे आवळ्याचे पाणी थोडे थंड करण्यासाठी ठेवून द्यावे. पाणी थंड झाल्यावर गाळणीच्या मदतीने गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवावे. केसांना शाम्पू आणि कंडिशनर केल्यानंतर हे आवळ्याचे पाणी केसांवर ओतावे. २ ते ३ मिनिटे स्काल्प आणि केसांना मसाज करुन घ्यावा. त्यानंतर १० मिनिटे हे तसेच केसांवर लावून ठेवून द्यावे त्यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यावेत.
३. आवळ्याचा हेअर मास्क तयार करण्यासाठी आवळ्याचे पाणी, आवळा पावडर, मध आणि दही इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. आवळा हेअर मास्क तयार करण्यासाठी सर्वातआधी एक बाऊलमध्ये आवळा पाणी घेऊन त्यात आवळा पावडर, मध आणि दही घालून ते सगळे जिन्नस एकत्रित कालवून त्याची पातळसर पेस्ट तयार करुन घ्यावी. हा तयार आवळ्याचा मास्क स्काल्प आणि केसांवर लावून घ्यावा. त्यानंतर ३० ते ४५ मिनिटे केसांवर हा हेअर मास्क असाच लावून ठेवावा. त्यानंतर केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत.
हिवाळ्यात नखं वारंवार तुटतात, त्वचा कोरडी पडते? ५ टिप्स, नखं तुटणार नाहीत आणि...
४. हा फेसपॅक तयार करण्यासाठी प्रथम २ आवळे घ्या आणि ते किसून घ्यावेत. यानंतर त्यात ३ ते ४ चमचे कोरफड जेल घाला. आता हे मिश्रण चांगले मिसळून एकजीव करून घ्यावेत. गरज भासल्यास त्यात आवळा किंवा मोहरीचे तेलही घालू शकता. आता ही पेस्ट केसांवर आणि टाळूवर हलक्या हातांनी व्यवस्थित लावा. हा हेअर मास्क केसांना लावल्यानंतर २० मिनिटे तसेच सोडा. यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा.