Join us  

दुधीची साल फेकून देताय ? दुधीच्या सालींचा बनवा फेसपॅक...चेहऱ्याचे सौंदर्य वाढेल चटकन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2023 9:28 PM

5 Incredible Benefits Of Lauki (Bottle Gourd) For Skin : त्वचेच्या अनेक समस्यांसाठी पार्लरला जाऊन कंटाळलात, तर एकदा दुधीच्या सालींचा फेसपॅक लावून बघा, नक्की फरक पडेल...

दुधीची भाजी म्हटलं की आपल्यापैकी बरेचजण नाक मुरडतात. कित्येकजण तर ही भाजी खाण्यासाठी चक्क नकार देतात. दुधी म्हणजे नावडत्या भाजीपैकी एक. असे असले तरीही दुधी हा खूप पौष्टिक असतो. दुधी भोपळ्यामध्ये जीवनसत्त्व ए, सी, ई आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. दुधी - भोपळा खाणे हे  फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर असते. 

दुधीचा जसा आपण वापर करतो तसेच दुधीच्या साली देखील तितक्याच उपयुक्त ठरतात. दुधीच्या सालीचा आपल्या आरोग्यासाठी तर उपयोग होतोच पण याचा जास्त फायदा आपल्या त्वचेसाठी होतो. दुधीची भाजी बऱ्याचदा घरी बनविली जाते. भाजी बनवण्यासाठी त्याची साल सहज काढून फेकून दिली जाते. ही साल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. या सालींच्या वापराने चेहेऱ्याच्या सौंदर्यात भर पडते आणि त्वचेसंबंधित अनेक समस्या सहज दूर होतात. यासाठीच दुधीच्या सालींचा घरगुती फेसपॅक कसा बनवायचा ते पाहूयात(5 Beauty Benefits Of Bottle Gourd (Lauki) Face Pack That Can Make Your Skin Look Younger).

दुधीच्या सालीचा फेसपॅक कसा बनवावा ? 

दुधीची साल उन्हात सुकवून वाटून घ्या. त्याची पावडर तयार करा. या पावडरमध्ये गुलाबपाणी मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि १५ ते २० मिनिटांपर्यंत तसेच ठेवा. नंतर थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक चेहऱ्याला लावल्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग निघून जाण्यास मदत मिळते. याचबरोबर चेहऱ्यावर चमकही येते. दुधीच्या सालीची ही पावडर एकदाच बनवून आपण स्टोअर करून ठेवू शकता. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास, चेहरा कमालीचा आकर्षक दिसेल आणि चेहऱ्यावरील चमक कायम राहील व निस्तेजपणा दूर होईल.  

नाकातील केस काढावे का? संसर्ग होण्याचा गंभीर धोका, नाक सांभाळा, फॅशनच्या नावाखाली जीवाशी खेळ...

केसांना मेहेंदी लावताना त्यात मिसळा १ सिक्रेट गोष्ट, केसांवर मेहेंदीचा रंग टिकेल भरपूर दिवस...

दुधीचा व त्याच्या सालींचा आपल्या त्वचेसाठी नेमका कोणता फायदा होतो... 

१. त्वचा हायड्रेट ठेवते :- दुधीच्या भाजीतील पाण्याचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक असते. पाण्याने समृद्ध असलेली ही भाजी आपल्या शरीरासोबतच त्वचा देखील  हायड्रेट ठेवण्याचे काम करते.

चमचाभर गव्हाच्या पिठाची जादू, त्वचा दिसेल यंग व ग्लोइंग ! तजेलदार त्वचेसाठी इन्स्टंट फेसपॅक...

२. मुरुम कमी करण्यासाठी उपयुक्त :- दुधी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात मदत करू शकते, ज्यामुळे आपल्याला त्वचेवर येणाऱ्या  मुरुमांच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. यासोबतच पचन सुधारण्यास आणि संपूर्ण आरोग्यास चालना देण्यास मदत करते.

फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?

३. एजिंगच्या खुणा नष्ट करते :- दुधीमध्ये व्हिटॅमिन-सी असते, ज्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. यामध्ये झिंकसारखे पोषक घटक देखील असतात, जे त्वचेला दीर्घकाळ तरूण ठेवतात. वाढत्या वयोमानानुसार, त्वचेवर दिसणाऱ्या एजिंगच्या खुणा कमी करण्यास देखील फायदेशीर ठरते. 

४. चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळवून देते :- दुधीमध्ये असलेली जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला चमकदार बनवतात. यासाठी आपण  दररोज दुधीचा रस पिऊ शकता.

'सर जो तेरा चकराये'.. अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय केसांना चंपी करताना नेमकं कोणतं तेल वापरणं उत्तम

५. त्वचेची जळजळ होत असल्यास :- कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने त्वचेवरी कधीतरी जळजळ होऊ लागते. मग अशावेळी दुधीच्या सालीचा उपयोग करता येऊ शकतो. याची पेस्ट जळजळ होणाऱ्या ठिकाणी लावली तर जळजळ होणे त्वरीत थांबते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी