एलोवेराचं झाड आजकाल प्रत्येक घरात दिसून येतं. हिरव्या रंगाच्या काटेरी सालीच्या आत अनेक पौष्टीक घटक आढळतात. हे झाड मानवी शरीराच्या आतील व बाहेरील समस्यांना दूर करतात. कोरफड हे अँटी-बॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. यासोबतच यामध्ये व्हिटॅमिन B1, B2, B6, B12 मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे लोकं त्वचा, केस, व इतर समस्या दूर करण्यासाठी याचा वापर करतात. कोरफड हे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. एलोवेरासोबत या ५ गोष्टी मिसळून लावल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येईल(5 Benefits of Aloe Vera Gel For Face And Skin ).
एलोवेरा आणि लिंबूपासून बनवा फेसपॅक
सर्वप्रथम, एका वाटीत लिंबाचा रस आणि एलोवेरा जेल समानप्रमाणात घ्या. हे मिश्रण चांगले मिक्स करा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटे ठेवल्यानंतर धुवा. त्वचेवर नैसर्गिक चमक येईल.
डोकं खूप खाजवतं, काम सुचत नाही? केसांतलं इन्फेक्शन त्रासदायक, त्वरित करा ५ उपाय
एलोवेरा जेल आणि मसूरच्या डाळीचा बनवा फेसमास्क
चेहर्याची बंद झालेली छिद्रे पुन्हा उघडण्यासाठी मसूरचा फेस पॅक मदत करेल. एका वाटीत एलोवेरा जेल, एक चमचा मसूर डाळ पावडर, आणि टोमॅटोचा रस घ्या. आवश्यकतेनुसार पाणी मिसळा. चेहऱ्यावर मिश्रण लावा, काही वेळानंतर चेहरा धुवा. याने चेहरा एक्सफोलिएट होईल, डेड स्किन निघून जाईल.
एलोवेरा आणि मध
मध चेहऱ्याला नवी चमक देते. मधासोबत आपण हळदही वापरू शकतो. हळदीचे औषधी गुणधर्म चेहऱ्यावरील अशुद्धी दूर करतात. २ चमचे कोरफडाच्या जेलमध्ये, एक चमचा मध आणि हळद मिसळा. हा फेस पॅक २० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा, त्यानंतर धुवा.
महागडे सिरम-टोनर कशाला? चेहऱ्यावर ग्लो हवा तर वापरा भिजवलेल्या तांदूळाचं पाणी, पाहा जादू
एलोवेरा आणि कडूलिंब
कडुलिंब चेहऱ्यावरील मुरुम कमी करण्यासाठी प्रभावी आहे. यासाठी एका वाटीत एलोवेरा जेल घ्या, त्यात कडुलिंबाची पाने बारीक पेस्ट करून घाला. चेहऱ्यावर हा मास्क १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर सामान्य पाण्याने धुवा. आपण हा फेस पॅक आठवड्यातून एकदा लावू शकतो.