Join us

कांद्याचा रस चेहऱ्याला लावण्याचे ५ फायदे, तुकतुकीत सुंदर त्वचा हवी तर हा उपाय करुन पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2023 16:29 IST

Onion on Skin Potential Benefits and know How to Use कांद्याचा रस केसांना लावण्याचे फायदे आहेतच पण चेहऱ्यासाठीही तो उपयुक्त ठरतो

जेवणाची रंगत वाढवण्यात कांद्याची फोडणी मदत करते. कांद्याचे अनेक फायदे आहेत. आरोग्यासह शरीराला देखील पौष्टीक घटक पुरवण्यात कांदा मदत करते. कांद्याचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते. यासह कांद्यामध्ये आढळणारे सेलेनियम रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. कांद्याचा रस केसांवर लावल्याने केसांची निगा राखण्यास मदत मिळते.

केसांसह चेहऱ्यासाठी देखील कांदा उपयुक्त आहे. कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटामिन ए, सी, आणि ईचे प्रमाण बऱ्याच प्रमाणावर आढळते. कांद्याचा वापर चेहऱ्यावर केल्याने त्वचा कोमल आणि तजेलदार होते. कांद्याच्या रसात फ्लेवोनोइड्स यासह अँटीऑक्सिडंट्स आढळते. जे चेहऱ्यावरील मुरुमांपासून सुटका देण्यास मदत करतात. चला तर मग कांद्याचे फायदे पाहूयात..

कांद्याच्या रसासोबत खोबरेल तेल

चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या सोडवण्यासाठी कांद्याचा रस आणि खोबरेल तेल मदतगार ठरेल. कांद्याच्या रसात खोबरेल तेल आणी मध मिसळा. हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी कांद्याच्या रसात खोबरेल तेल मिसळून लावू नये.

कांद्याचा रस आणि दही

चेहऱ्यावरील डेड स्कीन काढण्यासाठी कांद्याचा रस आणि दही मदत करेल. यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा कांद्याच्या रसात अर्धा चमचा दही मिसळा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. ५ मिनिटांनंतर चेहरा सामान्य पाण्याने धुवा. याने चेहऱ्यावरील डेड स्कीन दूर होईल यासह नवी चमक मिळेल.

टॅग्स :कांदाब्यूटी टिप्सहोम रेमेडी