Join us  

केस प्रचंड गळतात-पातळ झाले? नियमित ५ पदार्थ न खा, पटापट वाढतील-दाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2023 8:37 AM

5 Best Food for Hair Growth : केसांना मिनरल्स आणि व्हिटामीन्सच्या पोषणाची आवश्यकता असते.

लांब मजबूत आणि चमकदार केस प्रत्येकालाच आवडतात. पण सगळ्या जणांचे हे स्वप्न पूर्ण होतं असं नाही. कोरड्या केसांना पोषण देण्यासाठी हेल्दी डाएटबरोबरच लाईफस्टाईलमध्ये बदल करणं तिककचं गरजेचं असते. आजकाल केस गळणं, कमी ग्रोथ आणि छोट्या केसांची समस्या सर्वांनाच भेडसावते. यामुळे आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. (Foods For Quick Hair Growth)

केराटीन नावाचे प्रोटीन केसांना लांब, दाट आणि मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर ठरते. केसांना मिनरल्स आणि व्हिटामीन्सच्या पोषणाची आवश्यकता असते. केसांच्या वाढीसाठी काय खावे जेणेकरून केस जास्त वाढतील असा प्रश्न सर्वांनाच पडतो.  डेली डाएटमध्ये काही पदार्थांचा  समावेश केल्यास केसांची चांगली वाढ होण्यास मदत होईल. (Which Foods Make Hair Growth Faster)

पालक आणि इतर हिरव्या भाज्या खा

आयर्न केसांच्या वाढीसाठी गरजेचे असते. केसांच्या पेशींना आयर्नची आवश्यकता असते. शरीराता आयर्नची कमतरता  भासल्यास केस गळू लागतात. ऑक्सिजन आणि पोषक तत्वांची कमतरता केस गळण्याचे कारण ठरते. यामुळे केसांच्या मुळांपर्यंत पोषण व्यवस्थित पोहोचत नाही आणि केस कमकुवत होतात. म्हणून पालेभाज्या खायला हव्यात

मान-पाठीवर टॅनिंग, मळ साचलाय? खोबरेल तेलात 'हा' पदार्थ मिसळून लावा, ५ मिनिटांत टॅनिंग दूर

व्हिटामीन सी युक्त आंबट फळं

शरीराला आयर्नच्या एब्जॉब्शनसाठी व्हिटामीन सी ची आवश्यकता असते. म्हणूनच आपल्या आहारात आंबट फळांचे सेवन करा. व्हिटामीन्सयुक्त पदार्थांचे आपल्या डेली  रुटीनमध्ये समावेश केल्यास केसांची वाढ चांगली होते. 

ओमेगा -३ फॅटी एसिड्स

ओमेगा-३ फॅटी एसिड्स केसांना पोषण देते ज्यामुळे केस काळे, दाट राहण्यास मदत होते. बदाम, अक्रोडमध्ये फॅट एसिड्स मोठ्या प्रमाणात असतात किंवा आळशीच्या बीयांचे स्नॅक्सच्या स्वरूपात तुम्ही सेवन करू शकता. 

डोक्यावर पांढरे केसच जास्त चमकतात? झोपण्याआधी नाभीत हे तेल लावा-५ दिवसांत मिळवा काळे केस

बायोटीन

आयर्न, जिंक, व्हिटामीनबरोबरच बायोटीन केसांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. केस वाढवण्यासाठी प्रोटीन्स फार गरजेचे असतात. यामुळे केसांची चांगली वाढ होते.

एवोकाडो

एवोकाडोमध्ये व्हिटामीन ई असते ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. केसांची मुळं चांगली राहतात. तेल आणि पीच संतुलन चांगले राहते. याशिवाय आहारात काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता अशा ड्रायफ्रुट्सचा समावेश करा.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी