Join us  

केस गळतीमुळे कपाळ सपाट दिसतंय? रोज ६ पदार्थ खा, पटकन वाढ होईल-मजबूत होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 10:18 AM

5 Best Foods for control hair fall : अनेकदा व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात आणि तुटायला लागतात.

खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी, कमी वयातच केसांवर वेगवेगळे प्रयोग करणं यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढलं आहे.  आपले केस मोठे, शायनी असावेत असं प्रत्येक मुलीला वाटतं. (Hair Care Tips) केसांमुळेच तुमचं व्यक्तीमत्व खुलून येत असतं. सध्याच्या अव्यवस्थित जीवनशैलीत अव्यवस्थित खाण्यापिण्याच्या सवयींमुळे कमी वयातच लोकांना हेअर फॉलचा त्रास जाणवतो. (5 Best Foods for control hair fall)

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार  वाढतं वय आणि जेनेटिक्स या कारणांचं काही करता येत नाही. पण खाण्यापिण्याची काळजी घेणं महत्वाचं आहे. हेल्दी आणि व्हिटामीन्सयुक्त  पदार्थ केसांच्या वाढीसाठी महत्वाचे असतात व्हिटामीन बी, व्हिटामीन डी, बोयटीन या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस गळतात. केस हेल्दी ठेवण्यासाठी अशा पदार्थांचा समावेश करायला हवा जे केसांना मजबूत ठेवतात.

१) पालक

पालक रक्त वाढवण्याासाठी गुणकारी आहे. त्याचप्रमाणे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. पालकात फॉलेट, आयर्न, व्हिटामीन ए, व्हिटामीन सी भरपूर प्रमाणात  असते. केसांच्या विकासासाठी पालक महत्वपूर्ण आहे. या पोषक तत्वांच्या कमतरतेनवं केस गळणं कमी होतं याचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.

२) गाजर

गाजर डोळ्यांसाठी चांगले असते. त्याचप्रमाणे रोज गाजर खाल्ल्यानं केसही चांगले राहतात. गाजर तुम्ही भाजीत घालून खाऊ शकता.  गाजराचा रस केसांसाठी फायदेशीर ठरतो. याचा रस प्यायल्यानं केस मजबूत होण्यास मदत होते.

३) बेरीज

बेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. ते केसांच्या वाढीसाठी खूप मदत करतात. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे कोलेजन उत्पादन आणि लोह शोषण्यास मदत करते. हे केसांच्या वाढीस चालना देऊ शकते. ब्लूबेरी, ब्लॅकबेरीसह सर्व प्रकारच्या बेरी केस मजबूत करतात.

४) व्हिटामीन सी

अनेकदा व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात आणि तुटायला लागतात. यामुळे तुमचे टक्कलही होऊ शकते. व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचे सेवन करणे केसांच्या वाढीसाठी देखील फायदेशीर आहे. लोह शोषण्यासाठी व्हिटॅमिन सी देखील आवश्यक आहे. लिंबू, संत्री, किवी इत्यादी लिंबूवर्गीय फळे रोज खावीत. एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने केसांना फायदा होईल तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढेल.

५) ड्रायफ्रुट्स

केसांच्या वाढीसाठी  ड्रायफ्रुट्स खूप फायदेशीर मानले जातात. त्यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात जे केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचे असतात. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, झिंक आणि आवश्यक फॅटी अॅसिड असतात, ज्याच्या सेवनाने अल्सरची समस्या टाळण्यास मदत होते.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यकेसांची काळजीब्यूटी टिप्स