Join us  

कोरड्या-काळ्यानिळ्या पडलेल्या नखांवर चमकच नाही? ‘हे’ ५ उपाय करा- नखं दिसतील गुलाबी सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2024 3:26 PM

5 Best Home Remedies To Make Your Nails Shiny & Healthy : 5 Incredible Home Remedies For Shiny & Healthy Nails : How To Get Super Shiny Natural Nails At Home : नखांवरील ग्लो निघून गेला? खराब दिसणाऱ्या नखांवर पुन्हा ग्लो येण्यासाठी करा घरगुती उपाय...

सुंदर, नाजूक नखांमुळेच आपल्या हातांच्या सौंदर्यात भर पडते. नखं सुंदर दिसावीत म्हणून आपण त्यांची खूप काळजी घेतो. वेळच्यावेळी नखांना मेनिक्युअर करणे, नेलपेंट लावणे, नखांना शेप देणे असे अनेक उपाय आपण करत असतो. नखं सुंदर, नाजूक आणि मजबूत तर असावीत पण याचबरोबर नखांवर एक हलका गुलाबीसर चमचमता ग्लो असेल तर नख आणि हातांच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. हातांच्या सौंदर्यात लांब, सुंदर, ग्लोइंग नखं खूप महत्त्वाची भूमिका बजावतात(How To Get Super Shiny Natural Nails At Home).

परंतु अनेकदा घरातील कामे आणि नखांची योग्य काळजी न घेतल्याने नखांवरील नॅचरल ग्लो हळुहळु कमी होत जातो. यामुळे नखं अधिक रुक्ष, निस्तेज, कोरडी दिसू लागतात. यासाठीच नखांवरील हरवलेला नॅचरल ग्लो परत आणण्यासाठी अनेकजणी लगेचच पार्लर गाठतात. परंतु नखांवरील ग्लो परत आणण्यासाठी पार्लरमधील या महागड्या ट्रिटमेंट्स (5 Incredible Home Remedies For Shiny & Healthy Nails) करुनही काहीवेळा फारसा फायदा होत नाही. या ट्रिटमेंट्समुळे नखांवर तात्पुरता ग्लो येतो आणि दीर्घकाळ टिकून राहत नाही. अशावेळी आपण काही घरगुती उपायांचा वापर करून कायम टिकणारा चमचमता ग्लो नखांवर आणू शकतो. नखांवरील नॅचरल ग्लो वाढविण्यासाठी घरगुती उपायांमध्ये नेमकं काय करावं ते पाहूयात(5 Best Home Remedies To Make Your Nails Shiny & Healthy).

नखांवर नॅचरल ग्लो येण्यासाठी नेमकं काय करावं ? 

१. दूध :- आपल्या आरोग्यासोबतच नखांच्या नॅचरल ग्लोसाठी दूध अधिक फायदेशीर ठरते. दुधामध्ये व्हिटॅमिन ए, बी१२, कॅल्शियम आणि प्रोटीन असतात, जे नखं मजबूत आणि चमकदार करण्यास मदत करतात. एका भांड्यात कोमट दूध घ्या. त्यात ५ ते १० मिनिटांसाठी नखं बुडवून ठेवा. त्यानंतर नखं पाण्याने चांगली स्वच्छ धुवा आणि मॉइश्चरायझर लावा. हा उपाय नियमित केल्याने नखांवर नॅचरल ग्लो येऊन ती अधिक मजबूतही होतील.

मस्कारा पसरुन पापण्यांवर जाड थर दिसतो? या ७ चुका टाळा, डोळे दिसतील टप्पोरे सुंदर...

२. एलोवेरा जेल :- एलोवेरा जेल स्किन आणि केसांसोबतच नखांसाठी देखील तितकीच उपयुक्त ठरते. एलोवेरामध्ये व्हिटॅमिन-ई आणि अनेक अँटीऑक्सिडंट असतात, जे नखांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. कोरफडीच्या पानातून ताजा रस घेऊन या रसाने नखं आणि नखांच्या आजूबाजूच्या त्वचेवर १० ते १५ मिनिटे मालिश करून घ्यावे. त्यानंतर ३० मिनिटांसाठी नखांवर एलोवेरा जेल तसेच राहू द्यावे. मग कोमट पाण्याने नखं स्वच्छ धुवून घ्यावीत. या उपायाने नखांची चमक तर वाढतेच शिवाय त्यांची वाढही सुधारते.

पायांच्या घोट्यांचा काळपटपणा जात नाही? करा घरगुती असरदार उपाय, पार्लरला जायची गरजच नाही...

३. कॉफी :- कॉफी नखांसाठी उत्तम प्रकारचे स्क्रब आहे असे मानले जाते. कॉफीमध्ये असलेले कॅफिन आणि अँटिऑक्सिडंट नखांना मजबूत करतात आणि त्यांची नैसर्गिक चमक वाढवतात. याशिवाय, मृत त्वचा काढून नखं चमकदार आणि मजबूत बनवतात. यासाठी एका बाऊलमध्ये प्रत्येकी एक टेबलस्पून कॉफी पावडर आणि मध एकत्रित करून स्क्रब तयार करावे. हे तयार स्क्रब नखांवर लावून ५ ते १० मिनिटे हळूवार स्क्रबिंग करुन घ्यावे. त्यानंतर कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवून घ्यावेत. नखं चमकदार बनवण्यासोबतच कॉफीचे स्क्रब हातांची त्वचा मऊ आणि कोमल बनवते.

४. तूप :- तुपामध्ये व्हिटॅमिन ई आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात, जे नखांना आवश्यक पोषण देतात. यासोबतच, नखं मजबूत करून   त्यांच्या वाढीस प्रोत्साहन देते. एक टेबलस्पून तूप घेऊन ते नखं आणि नखांच्या सभोवतालच्या त्वचेवर ते पूर्णपणे लावा. रात्रभर तूप नखांवर तसेच राहू द्यावे. या उपायाने नखं चमकदार तर होतीलच शिवाय अधिक सुंदर दिसतील. 

केसगळती थांबतच नाही? तुम्हीसुद्धा स्ट्रेस घेताय, डॉक्टर सांगतात स्ट्रेस आणि केसगळतीचा नेमका काय संबंध...

५. ऑलिव्ह ऑइल :- ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात जे नखांचे आरोग्य सुधारतात. नखं चमकदार आणि निरोगी ठेवण्यास ऑलिव्ह ऑइल मदत करते. तसेच यामुळे नखांमध्ये ओलावा टिकून राहतो आणि कोरडेपणा दूर होतो. थोडे ऑलिव्ह ऑईल गरम करून ते नखांवर लावा. मग ५ ते १० मिनिटांसाठी नखांना हलके मालिश करा. रात्रभर ऑलिव्ह ऑइल तसेच राहू द्या आणि सकाळी धुवा. ऑलिव्ह ऑइलचा नियमित वापर केल्याने नखांना नॅचरल ग्लो मिळेल आणि ते मजबूतही होतील.

टॅग्स :ब्यूटी टिप्स