लग्नकार्य, वाढदिवस, पार्टी, सण अशा निमित्ताने आपण मेकअप करतोच. पण हल्ली ऑफिसला जातानाही बऱ्याच वर्किंग वुमन हलकासा मेकअप करतात. कारण आता तुमच्या व्यक्तिमत्त्वालाही खूप महत्त्व आहे. म्हणूनच तर मेकअप करताना तो परफेक्ट व्हावा, यासाठी काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती होणं गरजेचंच आहे. कारण मेकअप जास्त झाला तर चेहऱ्यावर अगदी मेकअप थापल्यासारखा वाटतो. आणि कमी झाला तर आपल्याला हवा तसा लूक मिळत नाही (How to do makeup for getting natural look). त्यातल्या त्यात लिपस्टिक, फाउंडेशन, आय लायनर, मस्कारा अशा गोष्टी आपण वापरतो. पण कन्सीलर, ब्लश नेमकं कशा पद्धतीने लावावं, हे समजत नाही (How to use blush and concealer?). म्हणूनच या काही टिप्स पाहून घ्या. यामुळे तुमचा मेकअप नॅचलर दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. (5 Best makeup tips for beginners)
कन्सीलर, ब्लश यांचा वापर कसा करावा?
जे लोक नुकताच मेकअप करायला शिकत आहेत, अशा बिगिनर्स लोकांनी कन्सीलर, ब्लश यांचा वापर कसा करावा, याविषयीचा व्हिडिओ wingitwithankush या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
ना मिक्सर- ना ज्यूसर, ५ मिनिटांत १ किलो संत्री- मोसंबीचा रस तयार, बघा सोपी पद्धत
१. यामध्ये सांगण्यात आलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ब्लशचा वापर तुम्ही नुकताच करायला लागला असाल आणि तुम्हाला खूप डार्क ब्लश नको असेल तर फाउंडेशन लावण्याच्या आधी ब्लश लावा आणि त्यावरून पातळ लेयरमध्ये फाउंडेशन लावा. यामुळे ब्लश अधिक नॅचरल दिसेल.
२. कन्सीलर लावण्यासाठी नेहमी फ्लफी म्हणजेच मोठ्या आकाराचा ब्रश वापरा. शिवाय त्या ब्रशवर अगदी थोडंच कन्सीलर येईल याची काळजी घ्या. कारण कन्सीलर जास्त झालं तर डोळ्यांखाली आढ्या दिसू शकतात.
३. कन्सीलर डोळ्यांच्या खाली अगदी वॉटर लाईनला चिटकून लावू नका. डोळ्यांच्या कडांच्याखाली थोडा गॅप ठेवून लावा. डोळ्यांच्या कडांना चिटकून कन्सीलर लावलं, तर डोळे बारीक, सुजलेले दिसतात.
लग्न- साखरपुड्यासाठी कपल रिंग घ्यायच्या? बघा लेटेस्ट स्टाईलच्या १० सुपर ट्रेण्डी डिझाईन्स...
४. ब्लश फक्त गालांवरच लावू नका. तर नाकावर मधोमध, आयब्रोच्या खाली, हनुवटीवर, कपाळाच्या दोन्ही बाजूंनाही लावा.
५. काही वेळाने मेकअप ऑईली दिसू लागतो. असं होऊ नये म्हणून चीक बोनवर, नाकाच्या खाली ओठांच्या बाजुने पावडरचा टच द्या. यामुळे चेहरा ऑईल फ्री वाटेल.