Lokmat Sakhi >Beauty > केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी फॉलो करा नाइट हेअर केअर रुटीनचे ५ नियम..केसांचे सौंदर्य टिकेल कायम..

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी फॉलो करा नाइट हेअर केअर रुटीनचे ५ नियम..केसांचे सौंदर्य टिकेल कायम..

Best hair care tips to follow at night for healthy hair : केसांच्या कोणत्या ना कोणत्या समस्येने हैराण ? फॉलो करा नाइट हेअर केअर रुटीन... केसांत दिसून येतील अनेक बदल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2023 08:09 PM2023-09-09T20:09:42+5:302023-09-09T20:36:38+5:30

Best hair care tips to follow at night for healthy hair : केसांच्या कोणत्या ना कोणत्या समस्येने हैराण ? फॉलो करा नाइट हेअर केअर रुटीन... केसांत दिसून येतील अनेक बदल..

5 Best Night Hair Care Tips You Must Follow. | केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी फॉलो करा नाइट हेअर केअर रुटीनचे ५ नियम..केसांचे सौंदर्य टिकेल कायम..

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी फॉलो करा नाइट हेअर केअर रुटीनचे ५ नियम..केसांचे सौंदर्य टिकेल कायम..

त्वचा जपण्यासाठी, सुंदर आणि निरोगी राखण्यासाठी रात्री झोपण्याआधी काही नियम पाळणं महत्वाचं असतं. यालाच नाइट स्किन केअर रुटीन असं म्हटलं जातं. त्वचेप्रमाणे केसांसाठीही नाइट हेअर केअर रुटीन पाळणंही गरजेचे असते. दिवसभर त्वचेप्रमाणे केसांवरही आपण सतत केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करत  असतो. दिवसभर आपले केस चांगले दिसावे किंवा व्यवस्थित सेट व्हावे यासाठी केसांवर अनेक जेल, हेअर स्प्रे यांसारखे प्रॉडक्ट्स वापरतो. संपूर्ण दिवसभर जरी केसांवर या केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सचा मारा होत असला तरीही ते केसांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे.   

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी केसांवर हेअर स्प्रे, जेल आदी स्वरुपात वापरलेले रासायनिक घटक केसांवरुन काढून टाकणं गरजेचं असतं. केसांवर जर हेअर स्प्रे आणि जेल लावलेले असेल आणि ते रात्रीही केसांवर राहिले तर त्यामुळे केस खराब होतात. जर असे केले नाही तर केसांच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. (5 Healthy Hair Habits You Should Adopt) केसांच आरोग्य खराब होण्यापासून टाळण्यासाठी नाइट हेअर केअर रुटीनचे ५ नियम पाळायला हवेत(Best hair care tips to follow at night for healthy hair).

नाइट हेअर केअर रुटीनचे मुख्य ५ नियम कोणते ?  (5 Best Night Hair Care Tips You Must Follow).

१. झोपण्यापूर्वी केस विंचरुन घ्यावेत :-  दिवसभर आपण आपले केस बांधून किंवा मोकळे ठेवतो. केस सतत बांधून किंवा मोकळे ठेवल्याने केस एकमेकांत गुंतून त्याचा गुंता तयार होतो. असेच गुंतलेले केस आपण तसेच ठेवून झोपलो तर केसांतील गुंता अधिक वाढून भरपूर प्रमाणात केस तुटू शकतात. एवढेच नव्हे तर सतत केशन्सचा असा गुंता होत रहिला तर केसांचे आरोग्य खराब होऊन केसांच्या मुळांना इजा होऊ शकते. आपण रात्री झोपल्यानंतर डोक्याखालील उशी व केस यांच्यात घर्षण होऊन केस तुटण्याची किंवा एकमेकांत अधिक गुंतण्याची भीती असते. यासाठी केसांतील गुंता अधिक वाढू नये म्हणून झोपण्यापूर्वी केस विंचरुन केसांतील गुंता सोडवून  घ्यावा. 

काळेभोर केस हवे ? तुळशीचा करा 'असा' वापर, केस होतील मऊ मुलायम सुंदर...

२. केसांच्या मुळांना व टोकांना तेल लावावे :- झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांना व टोकांना तेल लावून घ्यावे. आपण दिवसभर केसांना हेअर जेल, हेअर स्प्रे यांसारखे केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्स लावत असतो. असे असले तरीही न कळत आपण केसांचे फार नुकसान करत असतो. केसांचे हे नुकसान भरून काढण्यासाठी आपण रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांना व टोकांना तेल लावू शकतो. केसांना तेल लावून मसाज केल्याने केस तुटण्याची व केसांना फाटे फुटण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. 

देवघरातली पांढरीशुभ्र गोष्ट फार मोलाची, डोक्याला लावा केसातला कोंडा होईल काही दिवसांत गायब...

३. इन्व्हर्शन पद्धतीने मसाज करणे : - केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी केसांना इनव्हर्शन पद्धतीने मसाज करणे गरजेचे असते. यासाठी सगळ्यांतआधी केस मोकळे सोडून आपली मान खाली करून सगळे केस पुढच्या बाजूला करून हळूहळू हातांनी २ मिनिटे मसाज करून घ्यावा. इनव्हर्शन पद्धतीने केसांना मसाज केल्यामुळे केसांच्या वाढीला मदत मिळते. याचबरोबर केसांच्या फोलिकल्समध्ये पोषणाचा अतिरिक्त पुरवठा केला जातो. केसांना अशा पद्धतीने मसाज केल्यामुळे रक्ताभिसरण व ताण कमी होण्यास मदत होते. 

बिया इतक्या छोट्या पण केसांच्या सौंदर्यात पडेल भर...आता घरीच बनवा केसांसाठी होममेड नैसर्गिक कंडिशनर !!

केसांना मेहेंदी लावताना त्यात मिसळा १ सिक्रेट गोष्ट, केसांवर मेहेंदीचा रंग टिकेल भरपूर दिवस..

४. केसांतील गुंता बोटांनी सोडवावा :- केसांतील गुंता सोडवण्यासाठी आपण शक्यतो कंगव्याचा वापर करतो. परंतु केसांचा गुंता सोडवण्यासाठी कंगव्यापेक्षा बोटांचा वापर करावा. गुंता सोडवण्यासाठी केसांवर कंगव्याचा वापर करताना केस तुटण्याची अधिक भीती असते. अशावेळी बोटांच्या मदतीने हलकेच केसांतील गुंता सोडवून घ्यावा. 

५. केसांची लूज वेणी घालावी :- रात्री झोपण्यापूर्वी केसांतीळ गुंता सोडवून केसांची लूज वेणी घालून झोपणे हा उत्तम पर्याय आहे. केसांची लूज वेणी घातल्याने केस बांधून राहतात. याउलट केस मोकळे ठेवले तर झोपेत केसांचा पुन्हा गुंता होण्याची शक्यता असते. अशावेळी केसांची लूज वेणी घालून सिल्कच्या कापडाचा रबरबँड आपण लावू शकता. सिल्कच्या कापडाचे तयार केलेले रबरबँड केसांवर चांगल्या पद्धतीने बसतात. या रबरबँडमुळे केसांवर कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही किंवा केस तुटण्याची भीती राहत नाही.

मेहेंदी लावताय की केमिकल लावताय केसांना? पाहा घरी ‘कशी’ भिजवायची मेहेंदी-केस काळेभोर...

Web Title: 5 Best Night Hair Care Tips You Must Follow.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.