Join us  

कायम तरुण दिसण्यासाठी करा फक्त ५ गोष्टी, वाढत्या वयाची एकही खूण चेहऱ्यावर दिसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2023 3:55 PM

5 Diet Tips to Slow Down The Aging Process : आहारामध्ये काही किमान बदल केल्यास तरुण दिसण्यास मदत होते...

आपलं वय वाढलं की त्याच्या खुणा साहजिकच चेहऱ्यावर दिसायला लागतात. त्वचा सुरकुतणे, केस पांढरे होणे यांसारखी लक्षणे दिसतात आणि आपलं वय वाढत चाललं हे आपल्याला आणि समोरच्यांनाही लक्षात येतं. पण आपण कधीच वयस्कर होऊ नये आणि कायम तरुण राहावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. म्हणूनच चेहऱ्यावरच्या सुरकुत्या लपवण्यासाठी पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट घेतल्या जातात. मात्र त्याचा म्हणावा तितका उपयोग होतोच असे नाही. तसेच या ट्रिटमेंट खूप महाग असल्याने त्यासाठी बरेच पैसेही मोजावे लागतात (5 Diet Tips to Slow Down The Aging Process). 

मात्र दरवेळी इतके पैसे मोजणे आपल्याला शक्य असतेच असे नाही. म्हणूनच चेहऱ्यावरुन आपले वाढलेले वय दिसू नये आणि आपण कायम एव्हरग्रीन आणि तरुण दिसावे यासाठी काही किमान बदल रोजच्या आयुष्यात करावे लागतात. हे बदल कोणते याबाबत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी काही सोप्या टिप्स देतात. या टिप्स अगदी सोप्या असून त्यामुळे वाढलेलं वय नक्कीच लपण्यास मदत होईल. 

१. दिवसभराच्या रुटीनमध्ये भरपूर पाणी पिणे आणि आहारात द्रव पदार्थांचा समावेश करणे अतिशय गरजेचे आहे. पाण्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते, आहारातील पोषक घटक शरीरात शोषले जाण्यास मदत होते. तसेच पाण्यामुळे शरीर चांगल्या प्रकारे डीटॉक्स होण्यासही मदत होते. त्यामुळे दिवसभरात किमान २ ते ३ लीटर पाणी अवश्य प्यायला हवे. 

(Image : Google)

२. भाज्या भरपूर प्रमाणात आणि फळं काही प्रमाणात अवश्य आहारात असायला हवीत. भाज्यांमुळे शरीरात अल्कलाईन घटकांचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे वाढलेलं वय दिसू नये यासाठी चांगला फायदा होईल. तसेच शरीराला जास्तीत जास्त खनिजे मिळण्यास याचा चांगला फायदा होईल. तसेच लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या फळांचाही आहारात समावेश असायला हवा.

३. अल्ट्रा रिफाईंड पदार्थ आहारात शक्यतो टाळायला हवेत. यामध्ये बेकरीचे पदार्थ, विविध फ्लेवर असणारे पॅकेज फूड, कार्बोनेटेड ड्रींक्स, बिस्कीटे, रेडी टू कूक पदार्थ, विविध प्रकारचे सॉस, आईस्क्रीम यांचाही यामध्ये समावेश होतो. 

४. आपले वाढलेले वय दिसण्यामध्ये गोड पदार्थांचाही महत्त्वाचा वाटा असतो. आपण अनेकदा चॉकलेट, डेझर्ट, पेस्ट्री, आईस्क्रीम, इतर गोड पदार्थ अगदी सहज खातो. या सगळ्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे ते आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात. 

५. याशिवाय आहारात गुड फॅटसचे प्रमाण चांगले असायला हवे. गुड फॅटस म्हणजेच ओमेगा ३ फॅटस  आणि मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड यांचा समावेश असतो. मोहरीचे तेल, तिळाचे तेल, ऑलिव्ह ऑईल आणि शेंगादाण्याचे तेल यामध्ये हे फॅटस जास्त प्रमाणात असतात. तसेच स्वयंपाकासाठी कायम कोल्ड प्रेस ऑईलचाच वापर करायला हवा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीआहार योजना