नवरात्र (Navratri) म्हणजे ९ दिवसांचा उत्सव. या ९ दिवसात ९ रंगाचे पोशाख परिधान केले जाते. आउटफिट्ससह अॅक्सेसरीज, शूज, हेअरस्टाइल, मेकअप यावरही विशेष लक्ष दिले जाते. गरबा नाईट्सला प्रत्येक जण नटून-थटून गरबा खेळायला येतो. संध्याकाळ झाली की प्रत्येकाला गरबा खेळण्याची ओढ लागते. पण अनेकदा संध्याकाळी केलेला मेकअप खेळता-खेळता फिका पडतो किंवा काळोख असल्यामुळे ठळक दिसून येत नाही.
मुख्य म्हणजे लिपस्टिक रात्रीच्या वेळेस दिसून येत नाही. जर आपण नवरात्रात कोणत्या शेड्सची लिपस्टिक लावायची यात कन्फ्युज असाल तर, या ५ प्रकारच्या लिपस्टिक शेड्स लावून पाहा. यामुळे आपले ओठ उठून तर दिसतीलच, शिवाय मेकअपही खुलून दिसेल(5 Different Lipstick Shades For Each Day Of Navratri).
सॉफ्ट ब्राऊन लिपस्टिक
नवरात्र सेलिब्रेशन मेकअप लूक करताना आपण सॉफ्ट ब्राऊन लिपस्टिकचा वापर करू शकता. बहुतांश महिला गरबा नाईट्सला ट्रेडीशनल वेअर परिधान करण्यास प्राधान्य देतात. पण सायंकाळच्या वेळेस लिपस्टिक उठून दिसत नाही. अशा वेळी आपण सॉफ्ट ब्राऊन लिपस्टिक शेडचा वापर करू शकता. ही शेड इंडियन स्किन टोनवर उठून दिसते.
आलिया भटच्या ५ ब्यूटी टिप्स- नवरात्रात तुमच्याही चेहऱ्यावर झळकेल आलियासारखं तेज
न्यूड शेड लिपस्टिक
सध्या न्यूड शेड लिपस्टिकचा ट्रेण्ड आहे. ट्रेडीशनल पोशाखावर न्यूड लिपस्टिक सुंदर दिसते. गरबा खेळताना अनेकांचा मेकअप हा फिका पडतो, किंवा उतरतो. त्यामुळे लाईट मेकअप ठेवा. त्यावर न्यूड लिपस्टिक लावा. जर आपला पोशाख गडद रंगाचा असेल तर, न्यूड शेड इंडियन स्किन टोनवर सूट करेल.
सॉफ्ट बेरी लिप कलर
बहुतांश ट्रेडीशनल वेअर हे गडद रंगाचे असतात. त्यावर लाईट मेकअप सूट करतात. नेहमीचे गडद रंगाचे लिपस्टिक लावण्यापेक्षा आपण सॉफ्ट बेरी कलरची लिपस्टिक लावू शकता. ही लिपस्टिक लावल्यानंतर हलकी पिंकीश दिसते. ज्यामुळे आपल्याला एक क्युट मेकअप लूक मिळतो.
गडद लाल लिपस्टिक
जर आपण या नवरात्रात फिकट रंगाचा ट्रेडीशनल पोशाख परिधान करीत असाल तर, गडद लाल रंगाची लिपस्टिक लावा. जर आपण डार्क कलरची लिपस्टिक लावत असाल तर, डोळ्यांचा मेकअप हा हलकाच ठेवा. ज्यामुळे आपल्याला एक सुंदर रॉयल लूक मिळेल.
मेहेंदीत मिसळा स्वयंपाकघरातील २ गोष्टी, अकाली पांढरे झालेले केस, गळण्याची समस्या होईल गायब
हॉट पिंक लिपस्टिक
बहुतांश महिलांचा आवडता रंग म्हणजे पिंक. या रंगामध्ये देखील अनेक प्रकार आहेत. जर आपण परिधान करीत असलेला पोशाख हा गडद रंगाचा असेल तर, हॉट पिंक लिपस्टिक ट्राय करून पाहू शकता. हॉट पिंक लिपस्टिक फक्त ट्रेडीशनल वेअरवर सूट करत नसून, इतरही पोशाखावर नक्कीच उठून दिसेल.