Lokmat Sakhi >Beauty > नव्या वर्षात त्वचेवर येईल ग्लो, करा ५ सोपे उपाय- चेहऱ्यावर येईल नवं तेज-दिसाल कायम तरुण

नव्या वर्षात त्वचेवर येईल ग्लो, करा ५ सोपे उपाय- चेहऱ्यावर येईल नवं तेज-दिसाल कायम तरुण

5 Easy Ways to look younger and glowing skin : घरच्या घरी सोपे उपाय केल्यास त्वचेचा ग्लो कायम राहण्यास मदत होते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2023 02:31 PM2023-12-28T14:31:16+5:302023-12-28T16:24:44+5:30

5 Easy Ways to look younger and glowing skin : घरच्या घरी सोपे उपाय केल्यास त्वचेचा ग्लो कायम राहण्यास मदत होते...

5 Easy Ways to look younger and glowing skin : 5 Simple Remedies for Glowing Skin in the New Year, Look Younger and Beautiful Forever... | नव्या वर्षात त्वचेवर येईल ग्लो, करा ५ सोपे उपाय- चेहऱ्यावर येईल नवं तेज-दिसाल कायम तरुण

नव्या वर्षात त्वचेवर येईल ग्लो, करा ५ सोपे उपाय- चेहऱ्यावर येईल नवं तेज-दिसाल कायम तरुण

वर्ष बदललं तरी आपलं वाढलेलं वय दिसू नये अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आपण कायम तरुण आणि सुंदर दिसावं असं आपल्याला वाटतं. पण वाढलेल्या वयाच्या खुणा चेहऱ्यावर दिसतातच. याशिवाय काही ना काही कारणाने चेहऱ्यावर मुरूम येतात, चेहऱ्याची त्वचा सुरकुतल्यासारखी दिसते किंवा चेहऱ्यावर डाग पडतात. चेहऱ्याच्या या समस्या आपल्यापैकी अनेकींना छळतात. चेहरा नितळ आणि सुंदर दिसावा यासाठी आपण नेहमी काही ना काही प्रयत्न करत असतो. पण त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. पार्लरमधल्या ट्रिटमेंटसलाही खूप पैसे जात असल्याने आपण त्या नेहमी करु शकत नाही. म्हणूनच आज आपण घरच्या घरी नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन करता येतील असे उपाय पाहणार आहोत. यामुळे चेहरा ग्लो करण्यास नक्कीच मदत होईल. पाहूयात हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे (5 Easy Ways to look younger and glowing skin )...

१. ओटसची पावडर करुन घ्यायची आणि त्यामध्ये कच्चे दूध घालायचे. हा पॅक चेहऱ्याला लावून ठेवायचा आणि साधारण १० मिनीटांनी चेहरा धुवून टाकायचा. त्यामुळे चेहऱ्यावर एकप्रकारचा ग्लो येण्यास मदत होईल. 

(Image : Google)
(Image : Google)

२. आहारात भरपूर फळं आणि भाज्यांचा समावेश करायला हवा. त्वचा चांगली राहण्यासाठी संत्री, बेरीज, अॅव्हाकॅडो यांसारखी फळं तसेच बीट, ब्रोकोली यांसारख्या भाज्यांचा रोजच्या आहारात अवश्य समावेश करायला हवा. 

३. कोलेजन हे त्वचा चांगली राहण्यासाठी अतिशय आवश्यक असे सप्लिमेंट असते. वयाच्या २५ वर्षानंतर त्याचे शरीरातील प्रमाण कमी होते. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारात या सप्लिमेंटचा समावेश करायला हवा. 

४. त्वचा मस्त ग्लोईंग आणि नितळ दिसावी यासाठी चेहऱ्याला मसाज करणे हा उत्तम उपाय आहे. आपल्या आवडत्या तेलाने किंवा खोबरेल तेलाने चेहऱ्याला मसाज केल्यास त्वचा तरुण दिसण्यास मदत होते. 

५. सनस्क्रिन हा त्वचेची काळजी घेण्यातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. नियमितपणे घराबाहेर पडताना सनस्क्रिन लावली तर त्वचा ग्लोईंग आणि सुंदर दिसण्यास मदत होते. 

Web Title: 5 Easy Ways to look younger and glowing skin : 5 Simple Remedies for Glowing Skin in the New Year, Look Younger and Beautiful Forever...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.