हिवाळा म्हटलं की सगळ्यांनाच आधी त्वचेचा कोरडेपणा आठवतो. थंडीचे दिवस सुरु झाले की लगेच त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते. अशा कोरड्या पडलेल्या त्वचेला फारच खाज (Home Remedies for Itchy Skin) येऊ लागते. ड्रायनेस वाढल्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर खाज येते. जास्त खाजवल्यास त्वचेतून रक्त बाहेर येतं आणि जखमा होतात किंवा इन्फेक्शन होतं(5 Effective Home Remedies for Itchy Skin During Winters).
थंडीच्या मोसमात कोरडे वातावरण आणि गार वारा यांचा त्वचेवर सर्वाधिक परिणाम होतो. जास्त थंडीमुळे चेहऱ्यावर लाल खुणा आणि खाज येण्याची समस्या निर्माण होते. ही अशी वेळ असते जेव्हा त्वचा सर्वात जास्त संवेदनशील बनते आणि त्यामुळे त्वचेवर जळजळ होते. थंडीच्या काळात त्वचेवर भेगाही पडतात. अशा परिस्थितीत, हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. एकाचवेळी खूप ठिकाणी खाज आल्यास समस्या वाढते. अंगावर खाज येण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात.
हिवाळ्यात जर त्वचा कोरडी पडून खाज येत असेल तर...
१. एलोवेरा जेल :- हिवाळ्यात जर त्वचेला सतत खाज येण्याची समस्या सतावत असेल तर ताज्या एलोवेरा जेलचा वापर करावा. यासाठी ताज्या कोरफडीच्या पानांतील गर एका बाऊलमध्ये काढून घ्यावा. आता त्वचेचा जो भाग अगदी जास्त कोरडा पडला असेल किंवा ज्या भागावर खाज येत असेल त्या भागावर एलोवेरा जेल लावून हलक्या हाताने मसाज करावा. त्यानंतर थोड्यावेळासाठी तसेच ठेवून द्यावे. आपण रात्रभर देखील एलोवेरा जेल त्वचेला लावून ठेवू शकता.
हिवाळ्यात कोरड्या ओठांवर लिपस्टिकचे तडे दिसतात? ४ टिप्स, लिपस्टिक टिकेलही-दिसेलही छान...
२. खोबरेल तेल :- खोबरेल तेलामध्ये हेल्दी फॅट्स असतात जे त्वचेचा कोरडेपणा दूर करतात. यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि त्वचेला ओलावा मिळवून देण्याचे खास गुणधर्म असतात जे त्वचेसाठी फायदेशीर आहेत. खोबरेल तेलामध्ये असणारे लॉरिक ॲसिड त्वचेसाठी चांगले असते. यासाठी खोबरेल तेलाचे काही थेंब त्वचेवर लावल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासोबतच त्वचेला येणारी खाजही नाहीशी होते.
३. दही आणि हळद :- दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते जे त्वचेला हळूवारपणे एक्सफोलिएट करते. त्यात दाहक-विरोधी गुणांनी युक्त अशी हळद घालून त्वचेवर लावल्याने त्वचा मॉइश्चराईझ केली जाते. हा मास्क १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर लावून नंतर धुतल्याने कोरडेपणा आणि खाज अशा समस्यांपासून आराम मिळतो.
सायीत फक्त ‘हा’ पदार्थ कालवून लावा, चेहऱ्यावर येईल चमक-महागड्या मॉइश्चरायझरपेक्षा असरदार उपाय...
४. दूध आणि केळी :- केळ्यामध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन 'ई' मुबलक प्रमाणात असते आणि ते त्वचेला हायड्रेट ठेवते. यासाठी पिकलेलं केळं घेऊन ते मॅश करा आणि दुधात मिसळून त्याची पेस्ट तयार करा. दूध आणि केळ्याची एकत्रित पेस्ट त्वचेवर लावा आणि २० मिनिटांनी त्वचा स्वच्छ धुवा.
५. मध आणि लिंबू :- हिवाळ्यात त्वचेला येणारी खाज आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी, मध आणि लिंबाचे टोनर आपण त्वचेसाठी वापरु शकता. यासाठी एका बाऊलमध्ये प्रत्येकी एक टेबलस्पून मध आणि लिंबाचा रस एकत्र करून मिश्रण तयार करा. त्यात एक कप पाणी मिसळून टोनर बनवा.