Lokmat Sakhi >Beauty > चपला बूट घातल्याने पायांवर काळे - पांढरे पट्टे उमटलेत ? ५ उपाय - टॅनिंग कमी -त्वचा दिसेल एकसमान...

चपला बूट घातल्याने पायांवर काळे - पांढरे पट्टे उमटलेत ? ५ उपाय - टॅनिंग कमी -त्वचा दिसेल एकसमान...

Tanning Due To Footwear : How to remove stubborn tan lines from your feet? पायांवर उमटलेले असे टॅनिंगचे डाग काढून टाकण्यासाठी आणि पुन्हा पायांची त्वचा एकसारखी होण्यासाठी करून बघा हे काही उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2023 07:44 PM2023-10-31T19:44:39+5:302023-10-31T20:00:49+5:30

Tanning Due To Footwear : How to remove stubborn tan lines from your feet? पायांवर उमटलेले असे टॅनिंगचे डाग काढून टाकण्यासाठी आणि पुन्हा पायांची त्वचा एकसारखी होण्यासाठी करून बघा हे काही उपाय..

5 Effective Home Remedies To Remove Tan From Feet, How do you get rid of tan on your feet from shoes | चपला बूट घातल्याने पायांवर काळे - पांढरे पट्टे उमटलेत ? ५ उपाय - टॅनिंग कमी -त्वचा दिसेल एकसमान...

चपला बूट घातल्याने पायांवर काळे - पांढरे पट्टे उमटलेत ? ५ उपाय - टॅनिंग कमी -त्वचा दिसेल एकसमान...

पायांतील चपला, बूट वापरणे हा आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहे. काहीवेळा आपण अनेक प्रकारचे फुटवेअर्स वापरणे पसंत करतो. प्रत्येक आऊटफिट नुसार आपण कोणत्या चपला, बूट वापरावेत हे आपले ठरलेले असते. परंतु असे असले तरीही काहीवेळा आपण बराचकाळ एकाच प्रकारचे चपला, बूट सोयीचे पडतात म्हणून वापरतो. अशावेळी या रोजच्या त्याच चपला, बूट वापरल्याने आपल्या पायांवर नंतर हलकेच टॅनिंगच्या खुणा दिसू लागतात. चपलांचा वापर आपण दिवसातले ७ ते ८ तास सलग करत असू तर त्यामुळे पायांवर टॅनिंग (How do you get rid of tan on your feet from shoes?) होतं. म्हणजेच चपलांचा बेल्ट ज्या ठिकाणी असतो तेवढा भाग गोरा आणि बाकीचा पाय काळा दिसू लागतो. यामुळे शक्यतो बऱ्याचजणांच्या पायांवर असे टॅनिंगचे मार्क्स किंवा पॅचेस दिसतात. पायांवर हे चपलांचे वळ दिसत असल्यामुळे पायाची त्वचा एकसमान रंगाची दिसत नाही(how to remove tanning from feet?).

कधी कधी तर काही जणांच्या पायांवरचं टॅनिंग इतकं गडद झालेलं असतं की त्यांच्या पायाच्या टॅनिंगवरून (How To Remove Tan From Feet: 5 Home Remedies To Remove Tan From Feet Instantly) ते कशा पद्धतीची चप्पल, सॅण्डल घालत असावेत, याचा अचूक अंदाज समोरच्या व्यक्तीला येतो. अशा पद्धतीने पायावर वळ उमटले असतील तर ते कधीकधी चारचौघात खूपच वाईट दिसतं. एकच एक चप्पल किंवा बूट किंवा सॅण्डल वारंवार वापरण्यापेक्षा आज एक उद्या एक अशी वेगवेगळी फुटवेअर वापरली तर असे वळ पडणार नाहीत. पण अशा पद्धतीने चपलांचा वापर करणे शक्य नसेल तर पायांवर पडलेले वळ किंवा टॅनिंग (How to remove stubborn tan lines from your feet?) काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय नक्की ट्राय करुन बघा(5 Effective Home Remedies To Remove Tan From Feet).

चपला बुटांमुळे पायांवर आलेले  टॅनिंग कमी करण्यासाठी उपाय... 

१. कोरफड जेल :- नेहमीच्या त्याच चपला, बूट घातल्यामुळे पायांवर उमटणारे ठसे कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर केला जाऊ शकतो. त्वचेचे पोषण करण्यासोबतच, कोरफड जेलमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक आणि दाहक - विरोधी गुणधर्म असतात जे सहजपणे पायांवरचे हे टॅनिंगचे पॅचेस कमी करतात. हे जेल नियमितपणे प्रभावित भागावर लावल्याने कालांतराने पायांवरील हे पॅचेस कमी होतात. 

शांत झोप आणि सुंदर व्हा ! ब्यूटी स्लिपचा घ्या निवांत फॉर्म्युला, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो

२. बटाटा व लिंबाचा रस :- बटाटा व लिंबू हे दोन्ही नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखले जातात. त्यामुळे बटाट्याच्या रसाचा वापर आपण पायांवरचे टॅनिंग कमी करण्यासाठी नक्कीच करू शकतो. हा उपाय करण्यासाठी बटाटा किसून त्याचा रस काढून घ्या. या रसामध्ये ४ ते ५ थेंब लिंबाचा रस घाला. हे मिश्रण पायांवर चोळा. यामुळे पायांवरचे चपला, बुटांचे उमटलेले ठसे कायमचे दूर होण्यास मदत होते. 

चुकूनही गुलाब पाण्यात हे ४ पदार्थ मिसळून चेहऱ्याला लावू नका, ऐन दिवाळीत चेहरा होईल निस्तेज आणि खरखरीत...

३. पपई व मध :- पपई व मधाचा वापर केल्याने देखील आपण पायांचे टॅनिंग घालवू शकतो. चमचाभर पपई घेऊन ती मॅश करून घ्यावी त्यात मध मिसळून या मिश्रणाने टॅनिंग झालेल्या भागावर हलकेच मसाज करून घ्यावा. त्यानंतर ही पेस्ट १० मिनिटे मार्कवर तशीच ठेवा. यानंतर पाय पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. 

अंडरआर्म्स हेअर रिमूव्हलसाठी केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्स वापरुन त्वचा काळवंडली, ४ घरगुती नैसर्गिक सोपे उपाय...

४. राईस वॉटर :- हा उपाय करण्यासाठी तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर त्यात दूध घालून त्याची मिक्सरमध्ये फिरवून बारीक पेस्ट करून घ्या. त्यात अर्धा टीस्पून हळद टाका. हे मिश्रण स्क्रबप्रमाणे पायांवर चोळा आणि त्यांनतर १५ ते २० मिनिटांनी पाय धुवून टाका. 

५. दही आणि बेसन :- हा सगळ्यात पारंपरिक उपाय. एक चमचा बेसन घ्या. त्यात चिमूटभर हळद घाला. दही घालून या मिश्रणाची पेस्ट तयार करा. तळपाय आधी ओले करून घ्या आणि त्यावर हा लेप लावून चोळा. त्यानंतर पाय धुवून घ्यावेत.

Web Title: 5 Effective Home Remedies To Remove Tan From Feet, How do you get rid of tan on your feet from shoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.