आपण कसे दिसतो किंवा कसे राहतो याकडे आपण अतिशय बारीक लक्ष देतो. आपले कपडे, केसांची हेअर स्टाईल, शरीराची व चेहेऱ्याची ठेवणं या सगळ्याचा आपण अतिशय काळजीपूर्वक विचार करुन त्यांची निवड करत असतो. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देताना काही लहान गोष्टींकडे आपले लक्ष जात नाही. जसे की आपल्या हातांची आणि पायांची नखे. हातांची आणि पायांची नखे चांगली असतील तर त्यामुळे हातांना आणि पायांना एक वेगळे सौंदर्य प्राप्त होत असते. सतत तुटणारी, रुक्ष झालेली नखे सगळ्यांनाच त्रासाची वाटतात. उन्हाळ्यांत नखांना पुरेसे पोषण, आर्द्रता आणि काळजी घेतली नाही तर नखे रुक्ष होऊन तुटतात. अशा प्रकारच्या नखांची वाढ व्यवस्थित होत नाही आणि ती कमजोर दिसायला लागतात. त्यामुळे अगदी महागातले महाग नेल पॉलिश लावले किंवा मॅनिक्युअर करवून घेतले तरी तुटणारी नखे सुंदर दिसू शकत नाहीत. आपल्या नखांची काळजी घेण्यासाठी कुठल्याही पार्लर मध्ये जाण्याची गरज नाही. आपण घरच्या घरी देखील नखांची काळजी घेऊ शकतो.
आपण आपल्या संपूर्ण शरीराची काळजी घेतो. पण नखांची हवी तशी काळजी घेत नाही. चेहरा, केस आणि शरीराच्या सौंदर्याव्यतिरिक्त, नखांचे सौंदर्य देखील खूप महत्वाचे आहे. आपण अन्न हाताने खातो त्यामुळे आपल्या नखांची काळजी घेणं हे महत्वाचे असते.यासाठी वेळोवेळी नखे कापणे, ती पॉलिश करणे, नेल पेंट लावणे आणि त्यांना चांगला आकार देणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. नखांची काळजी घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असते. या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या नाहीत तर नखं खराब होण्याची जास्त भीती असते. उन्हाळ्यात नखांमधील ओलावा संपून ती रुक्ष होऊ लागतात, तर काहीवेळा ठिसूळ होऊन वारंवार तुटतात, असे होऊन नये म्हणून उन्हाळ्यात नखांची विशेष काळजी घ्यावी लागते(5 Effective Tips For Nail Care During Summer Season).
उन्हाळ्यांत नखांची काळजी नेमकी कशी घ्यावी ?
१. बदामाच्या तेलाने मालिश करा :- नखांना नियमितपणे बदामाचे तेल लावल्यास नखांचा रुक्षपणा दूर होऊन नखांना आर्द्रता मिळण्यास मदत होते. बदामाच्या तेलाने रोज मसाज केल्यास नखे चमकदार, सुदृढ दिसू लागतात. तसेच विटॅमिन “इ” युक्त तेलाने नखांना मसाज केल्यासही नखांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळेल. विटॅमिन “इ” च्या कॅप्सूल मधील जेलने नखांना मालिश केल्याने नखांच्या सौंदर्यात अधिक भर पडते. विटॅमिन “इ” च्या कॅप्सूल्सचे नियमित सेवन नखांच्या तसेच केसांच्या आरोग्याला फायदेशीर ठरते. आठवड्यातून एकदा तरी हातांना मालिश करा, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशनमध्ये वाढ होण्यास मदत होते. फक्त हातांनाच नाही तर नखांनाही मालिश करणं आवश्यक असतं. त्यामुळे नखांच्या वाढिसोबतच नखं आकर्षक होण्यासही मदत होतं.
तांदूळ व मसूर डाळीचा डी - टॅन फेसमास्क, उन्हानं झालेलं टॅनिंग चुटकीसरशी गायब, त्वचा दिसेल चमकदार...
२. नखे एक्सफोलिएट करायला विसरू नका :- तुमच्या नखांना आणि क्यूटिकलला तुमच्या त्वचेप्रमाणेच एक्सफोलिएट करायला विसरु नका. मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी आणि तुमच्या नखांमध्ये रक्त प्रवाह वाढवण्यासाठी, मऊ नेल ब्रश किंवा बॉडी स्क्रब वापरा. यामुळे तुमच्या नखांचे क्युटिकल्स निरोगी राहण्यास मदत होते.
३. नखांना योग्य तो शेप द्यावा :- नखांना आकार देताना क्युटीकल म्हणजेच नखांच्या सुरुवातीच्या नाजूक त्वचेची काळजी घ्यावी. नख कापताना ती एकाच बाजूने व्यवस्थित शेपमध्ये कापावीत आणि शेप देखील एकाच बाजूने द्यावा, वेगवेगळ्या जागांवरून शेप दिल्यास नखे लवकर खराब होतात.
आठवडभरात गायब होतील डोळ्याखालची काळी वर्तुळं, बघा घरगुती आय मास्कची जादू....
४. अॅपल सायडर व्हिनेगर व ग्रीन टी चा वापर :- अॅपल सायडर व्हिनेगर नखांच्या आरोग्याकरिता अतिशय गुणकारी आहे. त्यामध्ये असलेले मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, आणि लोह नखांच्या आरोग्याकरिता उत्तम पोषण देतात. त्याचबरोबर यामध्ये असलेले अॅसिड नखांवर येणाऱ्या बुरशीचा नायनाट करण्यास मदत करतात. त्याचबरोबर ग्रीन टी सुद्धा नखांसाठी उत्तम आहे. ग्रीन टी मुळे नखांचा पिवळसरपणा दूर होण्यास मदत मिळते.
५. नखांना मॉइश्चराइज करा :- नखे कापल्यानंतर त्यांची काळजी घेणं महत्त्वाचे असते. नख कापल्यानंतर त्यांना मॉइश्चरायजर लावू शकता किंवा खोबरेल तेल देखील वापरु शकता. नखं जर वेळच्या वेळी मॉइश्चराइज केली नाहीत तर नखांच्या जवळील त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ लागते. नख मॉइश्चराइज करणे ही नखांच्या पोषणासाठी खूप महत्त्वाची गोष्ट मानली जाते. यामुळे नखे मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे नख ठिसूळ होत नाहीत.