Join us  

चेहरा कायम भप्प सुजलेला दिसतो, थोराड दिसतो? ५ सोप्या टिप्स, चेहरा दिसेल रेखीव सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2023 9:45 AM

5 Incredible Ways To Get Rid Of Face Fat : चेहऱ्यावर जास्तीचे फॅट्स जमा होऊन चेहरा कायम सुजलेला-गुबगुबीत दिसतो, असे का?

लहान बाळाचे चब्बी चिक्स पाहिले की ते आपल्याला ओढावेस वाटतात. पण तेच जर आपण मोठे झाल्यानंतर आपले देखील चब्बी चिक्स बाहेर आले असतील तर आपल्याला ते नकोसे होतात. गुबगुबीत चेहरा हा एका वयोमर्यादेपर्यंतच ठिक वाटतो परंतु त्यानंतर असा गुबगुबीत चरबीयुक्त भप्प फुगलेला चेहरा कोणालाही आवडत नाही. चेहऱ्याचा हा गुबगुबीतपणा आणि डबल चीन यामुळे आपले सौंदर्य कमी करण्यासोबतच आपला आत्मविश्वासही कमी करतो. 

वजन जास्त असेल तर अनेक लोक डाएट प्लॅन व जिम जॉईन करतात. तसेच पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतात. चेहऱ्यावरील चरबीकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. चेहऱ्यावर दिसणारी चरबी म्हणजेच फेस फॅटमुळे डबल चिनची समस्या जाणवू शकते.  चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी कोणतेही डाएट करण्याची किंवा जिम लावण्याची गरज नसते.आपल्याला जर गुबगुबीत चेहऱ्यातील फॅट्स कमी करायचे असल्यास आहारात बदल आणि व्यायामासोबत काही छोट्या गोष्टींचा समावेश डेली रुटीन मध्ये करावा लागेल. असे करुन आपण चेहऱ्यावरील अतिरिक्त फॅट्सच्या या समस्येपासून लगेच सुटका मिळवू शकता(5 Incredible Ways To Get Rid Of Face Fat).

चेहेऱ्यावरील फॅट्स म्हणजे नेमकं काय ?

जेव्हा चेहऱ्याच्या काही ठिकाणी चरबी जमा होते तेव्हा आपला चेहरा गुबगुबीत दिसू लागतो. आपला चेहरा अधिक जास्त फुलू लागतो आणि गोल होऊ लागतो म्हणजेच पफी दिसू लागतो तेव्हा चेहऱ्यावर चरबी जमू लागली आहे असं समजावं. आपल्या चेहऱ्यावर अनेक लेअर्स असतात जे आपल्या चेहऱ्याला आकार मिळवून देतात. त्यामध्ये स्नायू, अनेक हाडं असतात आणि त्यानंतर फॅट हा भाग असून त्यावर सर्वात शेवटचा लेअर असतो तो म्हणजे त्वचेचा. काहींचा चेहरा फारच मोठा असतो. त्यांचे गालही फार थुलथुलीत असतात. तर काहींना डबलचीन असते. असा हेल्दी चेहरा दिसायला कधीच चांगला दिसत नाही. जर आपल्याला चेहरा आकर्षक दिसावा असे वाटत असेल तर चेहऱ्यावरील फॅट कमी करणे गरजेचे असते. 

मर स्पेशल तांदूळ व मसूर डाळीचा डि - टॅन फेसमास्क, टॅनिंग होईल चुटकीसरशी गायब, त्वचा दिसेल चमकदार...

फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?

चेहेऱ्यावरील फॅट्स कमी करण्यासाठी नेमकं काय कराव ?

१. चेहेऱ्याचा करा मसाज :- फॅटी चेहरा सडपातळ करण्यासाठी चेहऱ्याचा मसाज करणे उपयुक्त ठरते. मसाज केल्याने चेहऱ्याची सूज उतरते. चेहेऱ्यावर मसाज केल्यामुळे चेहऱ्याचे स्नायू अधिक बळकट होतात. फेशियल योगा हा चेहऱ्याचा मसाज आणि व्यायामाचाच प्रकार आहे. हा योगा केल्याने चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचा उत्तेजित होते. तसेच या योगाने  तणाव आणि चिंता कमी होते. काही संशोधनामधून असे स्पष्ट झाले आहे की, फेशियल योगामुळे त्वचा उजळ होते. फेशियल योगाचे अनेक मानसिक आणि शारिरीक फायदे देखील आहेत.

२. साखरेचे प्रमाण कमी करा :- वजन वाढण्यासाठी सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे साखर. चेहऱ्यावरील फॅट्सचे प्रमाण कमी करायचे असेल तर साखरेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. चहा, कॉफी आणि इतर ड्रिंक्समध्ये साखर घालू नका. ज्या पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे अशा पदार्थांपासून दूर राहा. एका दिवसात कमीत कमी दोन सिझनल फळ खाण्यावर भर द्या. केक, पेस्ट्री, डेझर्ट, तेलकट पदार्थ खाण्यापासून स्वतःला दूर ठेवा. हे सगळे पदार्थ चेहेऱ्याचा गुबगुबीतपणा वाढण्यास कारणीभूत आहेत. 

मेहेंदी लावताय की केमिकल लावताय केसांना? पाहा घरी ‘कशी’ भिजवायची मेहेंदी-केस काळेभोर...

३. पुरेशी झोप घ्या :- आपली चयापचय क्रिया आणि शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी आपण किमान ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घेणे महत्वाचे असते. पुरेशी झोप घेण्याच्या सवयीमुळे शरीरात साठलेली चरबी कमी करण्यास मदत करते. तसेच, जेव्हा आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा शरीरात पाणी साठते ज्यामुळे चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागांमध्ये सूज येते. पुरेशी झोप घेतल्याने आपल्या शरीरातील द्रवपदार्थाचे संतुलन राखण्यास मदत होते आणि चेहऱ्यावरील सूज कमी होऊ शकते. 

४. मिठाचे सेवन कमी करा :- जास्त मीठ खाल्ल्याने आपल्या शरीरात पाणी टिकून रहाते यामुळे चेहऱ्यावर सूज येऊ शकते . जेव्हा आपण जास्त सोडियमयुक्त आहार घेतो तेव्हा आपले शरीर जास्त सोडियम संतुलित करण्यासाठी पाणी राखून ठेवते, ज्यामुळे सूज येते. पाणी टिकवून ठेवल्याने चेहरा गोलाकार आणि भरलेला दिसू शकतो. मिठाचे सेवन कमी केल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन नियंत्रित केले जाऊ शकते ज्यामुळे चेहऱ्याचा पफीनेस  आपोआप कमी होतो. 

कोरफड म्हणजे उन्हाळ्यात वरदान, ७ प्रकारे कोरफड वापरा- उन्हामुळे होणारे त्रास होतील पटकन कमी...

५. रोज व्यायाम करा :- जेव्हा आपण नियमितपणे व्यायाम करतो तेव्हा आपले संपूर्ण शरीर अ‍ॅक्टिव्ह राहते. व्यायाम केल्याने आपण शारीरिकरित्या अ‍ॅक्टिव्ह राहतो. आपण नियमितपणे केलेल्या व्यायामामुळे कॅलरी बर्न करण्यास देखील मदत मिळते. जेव्हा आपले शरीर अ‍ॅक्टिव्ह राहते तेव्हा शरीरातील अतिरिक्त चरबी विरघळते आणि कॅलरीज देखील कमी होतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्स