Lokmat Sakhi >Beauty > Mistakes That Are Makes You Look Older : अंघोळीनंतर ५ चूका कराल तर तरूणपणातच वयस्कर दिसाल; सगळ्यात आधी बदला सवयी

Mistakes That Are Makes You Look Older : अंघोळीनंतर ५ चूका कराल तर तरूणपणातच वयस्कर दिसाल; सगळ्यात आधी बदला सवयी

Mistakes That Are Makes You Look Older : दररोज आंघोळ केल्यानंतर लोक अनेकदा अशा काही चुका करतात, ज्याचा परिणाम त्यांच्या त्वचेवर आणि केसांवर होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 08:05 PM2022-05-29T20:05:04+5:302022-05-29T20:47:24+5:30

Mistakes That Are Makes You Look Older : दररोज आंघोळ केल्यानंतर लोक अनेकदा अशा काही चुका करतात, ज्याचा परिणाम त्यांच्या त्वचेवर आणि केसांवर होतो.

 5 everyday bathroom mistakes that are making you look older and harm your skin and hair | Mistakes That Are Makes You Look Older : अंघोळीनंतर ५ चूका कराल तर तरूणपणातच वयस्कर दिसाल; सगळ्यात आधी बदला सवयी

Mistakes That Are Makes You Look Older : अंघोळीनंतर ५ चूका कराल तर तरूणपणातच वयस्कर दिसाल; सगळ्यात आधी बदला सवयी

काही लोक दीर्घकाळ तरुण कसे दिसतात, तर काही लोक तरुण वयात म्हातारे कसे दिसतात. याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? खरं तर, म्हातारे दिसणे आणि तुमचे वय यात कोणताही खास संबंध नाही. काही लोक स्वत:ला चांगल्या सवयी लावतात आणि त्यांचे तारुण्य दीर्घकाळ टिकवून ठेवतात. (Bathroom mistakes) माणूस म्हातारा आहे की नाही हे त्याची त्वचा आणि केस पाहून कळते आणि जर तुम्ही तुमच्या त्वचेची आणि केसांची योग्य काळजी घेतली नाही तर तुम्ही लवकरच म्हातारे दिसायला लागाल. (Bathroom mistakes that are makes you look older)

दररोज आंघोळ केल्यानंतर लोक अनेकदा अशा काही चुका करतात, ज्याचा परिणाम त्यांच्या त्वचेवर आणि केसांवर होतो. या चुकांमुळे अनेक लोक त्यांच्या वयापेक्षा मोठे दिसतात, तर अनेकजण 40-45 वर्षांच्या वयात म्हातारे दिसू लागतात. या सामान्य सवयी आहेत ज्या बदलल्या जाऊ शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास सवयी सांगत आहोत, ज्या बदलून तुम्ही तुमचा लूक दीर्घकाळ तरूण ठेवू शकता. (Anti ageing Tips)

1) अंघोळ करताना चेहरा आणि केसांना साबण लावणं

अंघोळ करताना चेहऱ्यावर आणि केसांना साबण लावला तर त्याचा तुमच्या चेहऱ्यावर आणि केसांवर वाईट परिणाम होतो. वास्तविक सामान्य साबण खूप हार्ड असतो आणि चेहऱ्याची त्वचा खूप संवेदनशील असते. त्यामुळे अंघोळ करताना शरीराच्या इतर भागाला साबण लावावा पण चेहऱ्यावर आणि केसांना साबण लावू नये. 

चेहरा धुण्यासाठी फेस वॉश आहेत, जे विशेषतः चेहऱ्याच्या त्वचेसाठी डिझाइन केलेले आहेत आणि केस धुण्यासाठी शॅम्पू आहेत.   काही खास सौम्य साबण आहेत तुम्ही चेहऱ्यावर, केसांवर देखील लावू शकता. पण बाकी सर्व सामान्य साबण लावल्याने चेहऱ्याची त्वचा कोरडी होते आणि लवकरच सुरकुत्या येऊ लागतात.

2) खराब टॉवेल वापरणं

जर तुम्ही जुने टॉवेल वापरत असाल जे खराब झालेले आहेत ते तुमचा चेहरा आणि केस पुसण्यासाठी खूप त्रासदायक असू शकतात. तर ही चूक तुमच्या त्वचेला दीर्घकाळासाठी खूप महागात पडू शकते. चेहऱ्याच्या संवेदनशील आणि नाजूक त्वचेचे पाणी पुसण्यासाठी नेहमी मऊ धागे असलेला टॉवेल वापरा.

3) अंघोळीनंतर मॉईश्चराईजर लावणं

साबण तुमच्या त्वचेसाठी हार्ड असतो पण त्वचेतील घाण साफ करण्यासाठी तुम्हाला आंघोळ करावीच लागेल. अशा स्थितीत, जर तुम्ही आंघोळीनंतर लगेचच तुमच्या संपूर्ण शरीरावर मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन लावले नाही तर तुमची त्वचा कोरडी होईल आणि त्वचा भेगांसारखी दिसू लागेल. आंघोळीनंतर अंग सुकवून लगेच संपूर्ण शरीरावर मॉइश्चरायझर लावा. रात्री झोपण्यापूर्वीही चेहऱ्यावर हलके मॉइश्चरायझर लावूनच झोपा.

4) केसांना तेल न लावणं

ही अशी चूक आहे जी लोक अनेकदा करतात. केसांना निरोगी राहण्यासाठी पौष्टिक घटकांची देखील आवश्यकता असते. जर तुम्ही केसांना हेअर जेल, हेअर क्रीम अशा काही गोष्टी लावल्या, पण तेल कधीच लावले नाही, तर तुमचे केस लवकर कमकुवत होऊन गळतील. आठवड्यातून किमान 1-2 वेळा केसांना तेलाने मसाज करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल, बदाम तेल, तिळाचे तेल, एरंडेल तेल इत्यादी नैसर्गिक तेले वापरणे चांगले. यामुळे केसांचे पोषण होईल आणि केस मजबूत राहतील.

5) ओल्या केसांवर कंगवा फिरवू नका

तुम्हाला तरुण दिसण्यात केसांचाही मोठा वाटा असतो. तुमचे केस लवकर गळत असतील तर तुम्ही म्हातारे दिसाल. पण अनेकदा आपल्याला लहानपणापासून चुकीच्या सवयी शिकवल्या जातात, ज्यामुळे  आपल्या केसांचे खूप नुकसान होते. ओले केस विंचरण्याच्या  सवयीमुळे केस गळतात. यामुळे केस मुळापासून कमजोर होतात. याशिवाय ओल्या केसांवर रोज कंगवा फिरवल्यानं खराब होतात. केस नीट कोरडे केल्यावर नेहमी विंचरावे. 
 

Web Title:  5 everyday bathroom mistakes that are making you look older and harm your skin and hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.