Lokmat Sakhi >Beauty > किचनमधील 'हे' ५ पदार्थ वापरुन घरीच करा पार्लरसारखे फेशियल, चेहऱ्यावर येईल अस्सल फेशियल ग्लो...

किचनमधील 'हे' ५ पदार्थ वापरुन घरीच करा पार्लरसारखे फेशियल, चेहऱ्यावर येईल अस्सल फेशियल ग्लो...

5 Facial Treatments That Will Make You Glow : Tips For Glowing Skin : How To Do Facial At Home with Natural Ingredients : फेशियलसाठी दर महिना हजारो रुपये वाया घालवताय? किचनमधील ५ पदार्थ वापरुन घरीच करा फेशियल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2025 15:51 IST2025-03-01T15:32:14+5:302025-03-01T15:51:55+5:30

5 Facial Treatments That Will Make You Glow : Tips For Glowing Skin : How To Do Facial At Home with Natural Ingredients : फेशियलसाठी दर महिना हजारो रुपये वाया घालवताय? किचनमधील ५ पदार्थ वापरुन घरीच करा फेशियल...

5 Facial Treatments That Will Make You Glow Tips For Glowing Skin How To Do Facial At Home with Natural Ingredients | किचनमधील 'हे' ५ पदार्थ वापरुन घरीच करा पार्लरसारखे फेशियल, चेहऱ्यावर येईल अस्सल फेशियल ग्लो...

किचनमधील 'हे' ५ पदार्थ वापरुन घरीच करा पार्लरसारखे फेशियल, चेहऱ्यावर येईल अस्सल फेशियल ग्लो...

आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक स्त्रीच स्वप्न असत. सुंदर दिसण्यासाठी अनेक स्त्रिया आपल्या सौंदर्याची काळजी घेण्यासाठी दर महिन्याला पार्लरमध्ये  महागड्या ट्रिटमेंट्स करण्यावर जास्त भर देतात. काही महिला तर दर महिन्याला आपले पार्लरमध्ये जायचे रुटीन अतिशय काटेकोरपणे फॉलो करताना दिसतात. आपण सुंदर दिसावे (5 Facial Treatments That Will Make You Glow) यासाठी स्त्रिया फेशियल, क्लिनअप, ब्लिच, वॅक्सिंग, आयब्रो अशा अनेक गोष्टी करताना दिसतात. फेशियल ही एक स्किनकेअर ट्रिटमेंट् आहे ज्यात, विविध उत्पादने आणि तंत्रांचा वापर करुन मृत त्वचा आणि अशुद्धता एक्सफोलिएशनद्वारे (Tips For Glowing Skin) काढून टाकली जाते. त्याचबरोबर त्वचेला फेसमास्क आणि क्रिमने हायड्रेशन केले जाते(How To Do Facial At Home with Natural Ingredients).

बदलत्या काळानुसार वाढते प्रदूषण, रोजची धावपळ यामुळे होणारे त्वचेचे नुकसान भरुन काढण्यासाठी आपल्याला काळजी घ्यावीच लागते. त्वचेला दर अमूक काही दिवसांनी खोलवर स्वच्छ करणे आवश्यक असते यात शंका नाही. यासोबतच त्वचेला योग्य ते पोषण मिळणेही खूप महत्त्वाचे आहे. फेशियल या दोन्ही गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करतात. यामुळेच तुम्ही कोणत्याही स्किन एक्सपर्टकडे गेलात तरी ते आपल्याला फेशियल करण्याचा सल्ला देतात. परंतु काहीवेळा आपल्याला फेशियल करण्यासाठी पार्लरला जाणे शक्य होत नाही. याचबरोबर, दर महिन्याला फेशियल सारख्या अशा महागड्या ट्रिटमेंट्स करणं खिशाला परवडणारे देखील नसते. अशावेळी आपण किचनमधील नेहमीच्या वापरातील ५ पदार्थांचा वापर करुन अगदी सहज फेशियल करु शकतो. पार्लरला न जाता देखील आपण घरच्या घरीच फेशियल कसे करु शकतो ते पाहूयात. 

किचनमधील कोणते पदार्थ वापरून फेशियल करता येईल?

१. एलोवेरा जेल :- एलोवेरा जेल त्वचेला हायड्रेटेड करुन त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवते. त्वचेत नैसर्गिक ओलावा असल्याने त्वचेला विशेष अशी चमक येते. यासाठी रात्री झोपताना त्वचेला एलोवेरा जेल लावून हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर एलोवेरा जेल त्वचेवर तसेच राहू द्यावे आणि सकाळी स्वच्छ धुवून घ्यावे. नियमितपणे हा उपाय केल्याने आपल्याला फेशियल करण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची गरजच भासणार नाही. 

लग्नात प्राजक्ता कोळीने गळ्यात घातलेल्या 'त्या' हिरव्या हाराची काय गोष्ट, हा दागिन्याचा प्रकार की वेगळं काही?

२. मध आणि दही :- मध आणि दह्याचा वापर फार पूर्वीपासून त्वचेसाठी केला जात आहे. मध आणि दह्याचे मिश्रण चेहरा मऊ आणि चमकदार करण्यास मदत करतात. यासाठी एका बाऊलमध्ये प्रत्येकी २ टेबलस्पून मध आणि दही घ्यावे. आता हे मिश्रण एकत्रित कालवून त्वचेवर लावावे. त्यानंतर हलक्या हाताने त्वचेला मसाज करावा. १५ मिनिटे हे मिश्रण चेहऱ्यावर तसेच लावून ठेवावे. मग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. हा फेसपॅक आठवड्यातून किमान दोन वेळा तरी त्वचेवर लावा. यामुळे पार्लरसारखा फेशियल ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येईल.  

३. हळद आणि चंदन :- हळद बॅक्टेरियाविरोधी आहे, तर चंदन त्वचेला थंडावा देणारे आहे. हे दोन्ही घटक गुलाब पाण्यात मिसळा आणि फेसपॅक म्हणून लावा. हा पॅक वापरण्यापूर्वी, एकदा बॅच टेस्ट करा, कारण हळद सर्वांच्याच त्वचेला सूट होते असे नाही. 

४. दूध आणि बेसन :- दुधात असलेले लॅक्टिक अ‍ॅसिड काळवंडलेल्या त्वचेचे टॅनिंग काढून टाकण्यास मदत करते, तर बेसन त्वचेला एक्सफोलिएट करते. हा फेसपॅक २० मिनिटे तसाच चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर धुवा. हा पॅक बनवण्यासाठी नेहमी कच्चे दूध वापरा. 

आंघोळीच्या पाण्यांत टाका ही जादुई पोटली, त्वचेच्या समस्या होतील गायब - त्वचा दिसेल अधिकच सुंदर...

५. टोमॅटो आणि लिंबू :- टोमॅटोमध्ये लायकोपिन असते, जे त्वचेला उजळवते. लिंबू टॅन काढून टाकण्यास मदत करते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी टोमॅटो आणि लिंबाचा रस एकत्रित करुन मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. त्यानंतर १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून तुम्ही घरीच चमकदार आणि निरोगी त्वचा मिळवू शकता. 

जर तुम्हांलाही पार्लरला न जाता घरच्याघरीच पार्लरसारखे फेशियल करायचे असेल तर किचनमधील या ५ नैसर्गिक पदार्थांचा नक्की वापर करुन पाहा.

Web Title: 5 Facial Treatments That Will Make You Glow Tips For Glowing Skin How To Do Facial At Home with Natural Ingredients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.