Lokmat Sakhi >Beauty > गरब्यासाठी हटके हेअर स्टाईल करण्याच्या नादात, केसांचे नुकसान तर करुन घेत नाही ना ?

गरब्यासाठी हटके हेअर स्टाईल करण्याच्या नादात, केसांचे नुकसान तर करुन घेत नाही ना ?

THE DOS AND DON’TS FOR YOUR HAIR THIS FESTIVE SEASON : सणासुदीच्या काळात केसांशी संबंधित या ५ चुका करू नका, सुंदर हेअरस्टाईलच्या नादात केसांचे सौंदर्य होईल खराब....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2023 01:03 PM2023-10-13T13:03:34+5:302023-10-13T13:30:59+5:30

THE DOS AND DON’TS FOR YOUR HAIR THIS FESTIVE SEASON : सणासुदीच्या काळात केसांशी संबंधित या ५ चुका करू नका, सुंदर हेअरस्टाईलच्या नादात केसांचे सौंदर्य होईल खराब....

5 hair care mistakes to avoid in festive season, 5 styling mistakes you must avoid for damage-free hair | गरब्यासाठी हटके हेअर स्टाईल करण्याच्या नादात, केसांचे नुकसान तर करुन घेत नाही ना ?

गरब्यासाठी हटके हेअर स्टाईल करण्याच्या नादात, केसांचे नुकसान तर करुन घेत नाही ना ?

सध्या आपल्यापैकी सगळ्यांचीच नऊ दिवस गरबा खेळायला जायची तयारी सुरु असेलच. काहीजण जोडीने गरबा खेळायला जातात तर काहीजण आपल्या मित्रमैत्रिणी, परिवारासोबत गरबा एन्जॉय करतात. गरबा खेळायला जातात अगदी नटूनथटून जाण इज मस्ट. स्त्रिया किंवा मुलींच्या बाबतीत हा विषय अगदी आवडीचा असतो. दररोज गरब्याला नवीन कपडे, मेकअप, त्याला सूट होणाऱ्या चपला, हेअरस्टाईल असं सगळं काही आपण अगदी बारकाईने बघतो. नटूनथटून गरबा खेळायला प्रत्येकालाच आवडत. असे असले तरीही मुली आणि स्त्रिया आपला पेहेराव, मेकअप व हेअरस्टाईल अधिक सुंदर व आकर्षक कशी दिसेल दिसेल याकडे लक्ष देतात( 5 hair care mistakes to strictly avoid in festive season for damage-free hair).

जितके सुंदर आपण कपडे घालतो तशीच त्याला परफेक्ट मॅच होणारी हेअरस्टाईल (Common Hair Care Mistakes That You Can Avoid Easily) देखील आपण करतो. या नऊ दिवसांत स्त्रिया, मुली आपल्या केसांच्या वेगवेगळ्या हेअर स्टाईल करतात. या हेअरस्टाईल करताना आपण केसांवर वेगवेगळ्या ट्रिटमेंट्स किंवा ब्युटी प्रॉडक्ट्सचा सर्रास वापर करतो. असे केल्याने त्या दिवसापुरता आपले केस सुंदर दिसतात खरे परंतु असे वारंवार केल्याने केसांना इजा होऊ शकते. हेअरस्टाईल करण्यासाठी केसांवर सतत काही ना काही नवीन उपाय करत असतो. यामुळे केसांसंबधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सणासुदीच्या काळात अनेक वेळा आपण केसांशी संबंधित अनेक चुका करतो. यामुळे केसांना इजा होण्यासोबतच केसांची चमकही निघून जाते. असे होऊ नये म्हणून या नवरात्रीत केसांशी संबंधित कोणत्या चुका टाळाव्यात हे पाहूयात(5 hair care mistakes to avoid in festive season).

सणासुदीच्या काळात केसांशी संबंधित होणाऱ्या कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ? 

चूक १ : केसांसाठी हिटिंग टूल्सचा अधिक वापर करणे.         

केस वारंवार कर्ल किंवा केसांना स्ट्रेटनिंग करण्याची सवय अनेकींना असते. कधीतरी केसांवर असे प्रयोग केल्यास हरकत नाही. पण काहीजणी मात्र सतत   किंवा त्यापेक्षाही अधिक वेळेस केसांसाठी हिटिंग टूल्स वापरतात. यामुळे केस खराब होऊन दुभंगतात. त्यामुळे केसांसाठी हिटिंग टूल्सचा वापर हा मर्यादित प्रमाणात करावा. हिटिंग टूल्समधून निघणारी गरम उष्णता केसांना डिहायड्रेट करते आणि केसांना नुकसान पोहोचवते, यामुळे शक्यतो यांसारख्या उपकरणांचा वापर कमी करावा.

नवरात्रात सुंदर दिसावं म्हणून चेहऱ्याला ब्लिच करताय ? ६ गोष्टी विसरु नका, चेहरा व्हायचा खराब...

चूक २ : केस झटपट वाळवण्यासाठी ब्लो ड्रायरचा वापर करणे. 

बरेच लोक केस सुकवण्यासाठी ब्लो ड्रायचा वापर करतात. या गोष्टी केसांसाठी हानिकारक असतात आणि केसांचे पोषणही कमी करतात. त्यांच्या अति वापरामुळे केस गळण्याची समस्याही वाढते. त्यामुळे केसांची नैसर्गिक चमकही कमी होते.  

 मेकअप किटमधील कॉम्पॅक्ट पावडर फुटून त्याचा भुगा झाला ? १ सोपी ट्रिक, कॉम्पॅक्ट पावडर अशी करा सेट...

चूक ३ : हेअरस्टाईल करताना केस गरजेपेक्षा अधिक घट्ट ताणून बांधणे.

सणासुदीच्या काळात महिलांना अनेकदा केसांचे पोनीटेल आणि बन्स बांधायला आवडतात. या कारणासाठी केस घट्ट व ताणून बांधले जातात. जास्त वेळ केस घट्ट बांधल्याने केस खराब होतात आणि केस गळतात. ही समस्या टाळण्यासाठी केस गरजेपेक्षा अधिक घट्ट ताणून बंधू नका. यासोबतच काही ठराविक काळाने केसांचा बांधलेला पोनीटेल आणि बन्स सोडून केस मोकळे सोडा. यामुळे केसांच्या मुळांना मोकळा श्वास घेता येईल व केस खराब होणार नाहीत. 

चूक ४ : केसांना तेल न लावणे. 

सणासुदीच्या काळात आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी तसा फारच कमी वेळ मिळतो. त्यामुळे अनेकदा आपण केसांना तेल लावायला विसरतो. केसांना तेल न लावल्याने केस कमजोर होतातच पण केसांची चमकही कमी होते. हा त्रास टाळण्यासाठी आठवड्यातून १ ते २ वेळा केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत केसांना तेल लावा.

चूक ५ : केसांवर कोरड्या शॅम्पूचा वापर कमी करा. 

अनेक वेळा सणासुदीच्या काळात केस धुण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो. अशा परिस्थितीत बऱ्याचजणी ड्राय शॅम्पू वापरणे सुरू करतात. त्यामुळे केस गळण्यासोबतच स्प्लिट एंड्सही दिसू लागतात. ड्राय शॅम्पूमुळे टाळू कोरडी पडते. यामुळे केसांचे नुकसान होते. त्यामुळे केसांवर सतत ड्राय शॅम्पू वापरणे टाळा.

BB क्रिम वापरण्याची योग्य पद्धत माहिती आहे का ? चुकलं तर, क्रिम लावूनही दिसाल भयंकर...

Web Title: 5 hair care mistakes to avoid in festive season, 5 styling mistakes you must avoid for damage-free hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.