Join us  

मेकअप न करताही चेहरा करेल ग्लो, स्वत:ला लावा फक्त ५ चांगल्या सवयी; तब्येतही राहील उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2022 5:28 PM

5 Healthy Habits will give you Glowing Skin without Makeup : चेहरा नॅचरली ग्लो करावा यासाठी महत्त्वाच्या टिप्स...

ठळक मुद्देत्वचेचे क्लिंजिंग, टोनींग, मॉइश्चरायजिंग नियमितपणे करायला हवे. त्वचेचे क्लिंजिंग, टोनींग, मॉइश्चरायजिंग नियमितपणे करायला हवे.

आपली त्वचा ग्लो करावी, सगळ्यांमध्ये आपण छान उठून दिसावे असे आपल्याला नेहमीच वाटते. एखाद्या कार्यक्रमाला जाताना किंवा सणावाराला आवरताना आपली त्वचा मेकअपशिवायही नितळ आणि तजेलदार दिसावी असं आपल्याला वाटतं.  चहेऱ्यावर पिंपल्स, डाग असतील तर मेकअप करुन आपण ते झाकण्याचा प्रयत्न करतो. पण असे न करता नैसर्गिकरित्याच आपण सुंदर दिसावे अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण कधी ऋतूबदलामुळे तर कधी झोप न झाल्याने किंवा आहार योग्य नसल्याने चेहरा फारच खराब होतो. अशावेळी मेकअप न करताही चांगले दिसायचे तर त्यासाठी आपल्या जीवनशैलीत काही बदल अवश्य करायला हवेत. यामुळे तब्येत तर चांगली राहीलच पण आपला चेहराही नॅचरली ग्लो करेल. पाहूया अशाच काही महत्त्वाच्या टिप्स (5 Healthy Habits will give you Glowing Skin without Makeup)...

(Image : Google)

१. जास्तीत जास्त पाणी प्या

आपलं शरीर आतून स्वच्छ असेल तर नकळत त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर किंवा चेहऱ्यावर दिसून येतो. त्यामुळे आपण जास्तीत जास्त द्रव पदार्थ घेणे आवश्यक असते. पुरेसे पाणी पिण्याबरोबरच नारळपाणी, सरबत यांचाही आहारात समावेश करायला हवा. 

२. जंक फूड टाळणे, संतुलित आहार घेणे 

आपण अनेकदा बाहेरचे तेलकट, मसालेदार पदार्थ खातो. खाताना आपल्याला हे पदार्थ जीभेला चांगले लागत असले तरी आरोग्यासाठी आणि सौंदर्याच्यादृष्टीने ते घातक असतात. या पदार्थांमुळे चेहऱ्यावर पुटकुळ्या येणे, चेहरा रुक्ष होणे अशा काही ना काही समस्या दिसून येतात. त्यामुळे शक्यतो जंक फूड टाळलेलेच बरे. त्यापेक्षा घरातील ताजा आणि संतुलित आहार घ्यायला हवा. 

३. ताणापासून दूर राहा

आपल्याला कोणत्या गोष्टींचा ताण असेल तर नकळत तो ताण आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतो. ताणामुळे आपले मन आणि शरीर अस्थिर होते. त्यामुळे त्वचा चांगली हवी असेल तर मन शांत असणे गरजेचे आहे. 

(Image : Google)

४. पुरेशी झोप आवश्यक 

आपली झोप नीट झाली नाही तर त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. अपुऱ्या झोपेमुळे डार्क सर्कल, चेहऱ्यावर डाग येणे, पोट साफ नसल्याने फोड येणे, चेहरा काळवंडणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे रोज किमान ७ ते ८ तासांची सलग झोप आवश्यक असून ती घ्यायलाच हवी. म

५. स्कीन केअर रुटीन 

आपल्या त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन आपण सौंदर्यतज्ज्ञांच्या मदतीने चांगले स्कीन केअर रुटीन समजून घ्यायला हवे. केमिकल प्रॉडक्ट वापरायची नसतील तर बाजारात अनेक हर्बल उत्पादनेही उपलब्ध असतात. मात्र त्वचेचे क्लिंजिंग, टोनींग, मॉइश्चरायजिंग नियमितपणे करायला हवे. त्यामुळे त्वचा उजळ राहते आणि त्वचेचा ग्लो सुधारण्यासही चांगली मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सलाइफस्टाइलमेकअप टिप्स