Join us  

केस कोरडे होऊन केसांना फाटे फुटले? 5 उपाय, केस होतील मऊ- मुलायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2022 8:10 AM

Home Remedies For Dry Hair: केसांना फाटे फुटण्याची समस्या अनेकींना जाणवते. असे झाल्यास केस कापण्याऐवजी हे काही घरगुती उपाय करून बघा..

ठळक मुद्देकोरडे झालेले केस मग अनेक जणी कापून टाकतात. पण केस कापण्यापेक्षा हे काही उपाय आधी करून बघा.

केसांची पुरेशी काळजी घेतली जात नाही किंवा मग आहारातून केसांना पुरेसं पोषण मिळत नाही. त्यामुळे केस कोरडे पडण्याची समस्या मग खूपच जास्त वाढते. केस खालच्या बाजूने खराब होऊ लागतात. केसांच्या टोकांना फाटे फुटत (split hair) जातात आणि त्यामुळे मग त्यांची वाढ खुंटते. केस वाढणं (hair growth) बंद होऊन जातं. असे फाटे फुटलेले, कोरडे झालेले केस मग अनेक जणी कापून टाकतात. पण केस कापण्यापेक्षा हे काही उपाय (Solutions for split hair) आधी करून बघा. यामुळे केसांचा कोरडेपणा आणि केसांना फाटे फुटण्याचं प्रमाण नक्कीच कमी होईल.

 

केसांना फाटे फुटू नयेत म्हणून...१. केस फाटे फुटत असतील तर आठवड्यातून दोनदा केसांना गरम तेलाने मालिश करणे खूप गरजेचे आहे. केसांच्या मुळाशी तर मसाज कराच पण थोडे तेल केसांच्या खालच्या टोकांवर पण नक्की लावा.

२. हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनिंग, कर्ल्स यांचा जास्त वापर केल्यानेही केस कोरडे होतात आणि त्यांना फाटे फुटतात.

 

३. वारंवार शाम्पू केल्याने आणि प्रत्येकवेळी शाम्पूचं प्रमाण खूप जास्त घेतल्यामुळे केसांमधलं नैसर्गिक तेल कमी होत जातं. हळूहळू केस कोरडे पडत जातात आणि मग केसांना फाटे फुटतात.

४. केस धुण्यासाठी खूप कडक पाणी वापरू नये. त्यामुळे केसांच्या मुळांचं नुकसान होतं. अगदी काेमट पाणी वापरून केस धुवावेत. तसेच केसांना तेल लावल्यानंतरच केस धुवावेत.

५. केस धुतल्यानंतर लिव्ह इन कंडिशनरचा वापर करावा. त्यामुळे केसांना चांगले पोषण मिळते आणि ते चमकदार होतात. केस ज्या दिशेने वाढतात, त्या दिशेने हे कंडिशनर लावावे. केसांच्या टोकाला पण लावावे. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी