Join us  

त्वचेवर केलेले 'हे' घरगुती उपाय पडतील महागात, ग्लो येणं तर सोडाच -चेहरा होतो विद्रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2024 9:15 AM

Skin Care Tips: त्वचेवर केलेले घरगुती उपाय बऱ्याचदा महागातही पडू शकतात... ते उपाय नेमके कोणते पाहा...

त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी बरेच जण एवढे आग्रही असतात की अगदी त्यांना कळेल तो उपाय ते त्वचेवर करून पाहतात. आपल्याकडे प्राचीन काळापासून सौंदर्यशास्त्र खूप विकसित आहे. त्यामुळे अनेक घरगुती उपाय निश्चितच त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात, यात वादच नाही. पण बऱ्याचदा अज्ञानामुळे किंवा उगाच कुणाचं काही ऐकून आपण त्वचेवर वेगवेगळे प्रयोग करून पाहात असू, तर त्यामुळे मात्र सौंदर्यात वाढ होणं तर सोडाच पण आहे ते सौंदर्यही गमावण्याची वेळ येऊ शकते... (5 home remedies that can be harmful for your face and damage your beauty)

 

'या' घरगुती उपायांमुळे त्वचेचं होऊ शकतं नुकसान...

१. लिंबू आणि साखर यांचा एकत्रित वापर करून चेहऱ्याला स्क्रबिंग करण्याचा उपाय अनेकजण करतात. पण यामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. साखरेमुळे त्वचेवर ओरखडे येऊ शकतात, तर लिंबामध्ये असणारं ॲसिड त्वचेला कोरडं करू शकतं, अशी माहिती सौंदर्यतज्ज्ञ अंजली शर्मा यांनी झी न्यूज ला दिली आहे.

कमीतकमी तेलात जास्तीतजास्त पुऱ्या कशा तळायच्या? ३ खास टिप्स, पुऱ्या तेलकट होणार नाहीत

२. आईस फेशियलचा ट्रेण्ड सध्या खूप जोरात आहे. पण यासाठी तुम्ही फ्रिजमधला गारेगार बर्फ काढून त्याने त्वचेवर थेट मसाज करत असाल तर ते त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतं. अशापद्धतीने आईस फेशियल करणं टाळा. आईस फेशियल करायचंच असेल तर बर्फ एका कपड्यात गुंडाळून मग त्वचेवर फिरवा. किंवा मग बर्फाच्या पाण्यात तुम्हाला सहज शक्य होईल तेवढ्या सेकंदासाठी चेहरा बुडवून ठेवा.

 

३. चेहऱ्यावरील पिंपल्सवर अनेकजण टुथपेस्ट लावतात. पण त्यामुळे पिंपल्स आणखी चिघळून त्याच्या जखमा होऊ शकतात. त्यामुळे हा उपाय करणं पुर्णपणे टाळावं.

असं कुणी करतं का? भाजीवाल्याने दुकानात लावला डोळे वटारून पाहणाऱ्या महिलेचा फोटो, लोक म्हणाले.....

४. बेकिंग सोडा ठराविक प्रमाणात वापरला तरच तो त्वचेसाठी उपयुक्त ठरतो. पण त्याचं प्रमाण चुकलं किंवा तुम्ही त्या उपायाचा अतिरेक केला तर ते मात्र त्वचेसाठी हानिकारक असतं.

५. व्हॅक्सिंग करण्यासाठी अनेक जण घरच्याघरी साखरेचा पाक, गुळाचा पाक करून होममेड व्हॅक्स तयार करतात. पण त्यामुळे त्वचेला नुकसान तर होणार नाही ना, याची खात्री करून घ्या. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी