Join us  

चेहरा टॅनिंगमुळे डल दिसतोय? रात्रभरात टॅनिंग घालवतील ५ फेसपॅक, दिसेल नितळ त्वचा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 1:12 PM

5 homemade night packs for a glowing skin : बाजारात अनेक नाईट क्रिम्स, मॉईश्चरायजर, सिरम उपलब्ध असले तरी घरगुती उपायांमुळे तुम्हाला कोणत्याही क्रिम्सचा वापर न करता चांगला परीणाम दिसेल. (

दिवसभर उन्हात राहिल्याने चेहरा बराच काळा पडतो. अनेकजण उन्हात जाताना सनस्क्रीन लावून निघतात पण त्याचा उपयोग काहीवेळा होत नाही. चेहरा अधिकच काळपट दिसू लागतो. रात्री झोपताना चेहऱ्याला घरगुती फेसपॅक लावल्यास त्याचा चांगला परीणाम त्वचेवर दिसून येईल. (5 homemade night packs for a glowing skin) बाजारात अनेक नाईट क्रिम्स, मॉईश्चरायजर, सिरम उपलब्ध असले तरी घरगुती उपायांमुळे तुम्हाला कोणत्याही क्रिम्सचा वापर न करता चांगला परीणाम दिसेल. (Best 5 Overnight Face Masks to Get Healthy Glowing Skin)

नाईट फेसपॅक कसा तयार करायचा? 

१)  हा पॅक बनवण्यासाठी दूधाची मलई आणि  गुलाब पाणी व्यवस्थित एकत्र करा. याची एक पातळ पेस्ट तयार करा. हा पॅक लावल्यानंतर चेहऱ्याला व्यवस्थित मसाज करा. थोड्यावेळासाठी हा पॅक असाच राहू द्या. काहीवेळानं चेहरा स्वच्छ धुवा. या पॅकमुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होईल.

दंड, हाताची बोटं काळवंडली? १० रूपयात पार्लरसारखं मेनिक्युअर घरीच करा-ग्लोईंग दिसेल त्वचा

२) व्हिटामीन ई ची कॅप्सुल गुलाब पाण्यासह मिसळून चेहऱ्याला लावा. हा पॅक सुकल्यानंतर १० ते १५ मिनिटं मसाज केल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

३) तुम्ही अंड्याचा पांढरा भाग दह्यात मिसळून चेहऱ्याला लावू शकता. ही पेस्ट चांगली एकत्र केल्यानंतर चेहऱ्याला लावा. नंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका. 

१ चमचा मेथीचा थ्री इन वन फॉर्म्यूला; केसांची वाढ होईल भराभर, कोंडा-पांढऱ्या केसांचा त्रास टळेल

४)  रात्री झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ करून त्यावर ग्लिसरीन, लिंबू आणि गुलाबपाणीचे मिश्रण लावले आणि 10 मिनिटांनी चेहऱ्याला हलके मसाज केली आणि 20 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुतला तर एक अनोखी चमक येईल. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर हा फेस पॅक तुमच्यासाठी खूप चांगला आहे. हा फेसपॅक तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी लावू शकता.

५) ओट मील खाण्याचे जितके फायदे आहेत तितकेच ते त्वचेवर लावण्याचे फायदेही आहेत. जर तुम्ही रात्री चेहऱ्यावर ओटमील फेस पॅक लावलात तर ते तुमच्या चेहऱ्यावर चमक आणि चमक आणण्याचे काम करते. यासाठी सर्वप्रथम गुलाब पाण्याने चेहरा हलका भिजवा.

यानंतर स्क्रब  10 मिनिटे करा. असे केल्याने चेहऱ्यावरील रक्ताभिसरण चांगले होऊ लागते. यानंतर काकडीचे पातळ काप चेहऱ्यावर लावावेत. 20 मिनिटांनी चेहरा चोळून पाण्याने चेहरा स्वच्छ करावा.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहेल्थ टिप्स