अनेकदा आपण बाहेर जाताना मेकअप करतोच. अगदी रोज नाही तरी किमान काही खास प्रसंग किंवा कार्यक्रम असला तर आपण मेकअप करतोच. मेकअप करताना आपण सुंदर (Natural Makeup Remover) दिसावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉडक्ट्सचा भरमसाठ वापर करतो. असे अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरुन आपण सुंदर दिसत जरी असलो तरीही ते आपल्या त्वचेसाठी हानिकारकच असतात. यासाठीच मेकअप केल्यानंतर तो त्वचेवरुन संपूर्णपणे काढून त्वचा स्वच्छ करणे देखील तितकेच महत्वाचे असते( kitchen ingredients that can double up as the best natural makeup removers).
त्वचेवरील मेकअप काढण्यासाठी अनेकजणी महागड्या आणि केमिकल्सयुक्त मेकअप रिमूव्हरचा वापर करतात, जे त्वचेसाठी योग्य नसते. याचबरोबर, मेकअप काढण्यासाठी नेहमी बाजारात उपलब्ध असलेले महागडे मेकअप रिमूव्हर घेणे शक्य असतेच असे नाही. महागड्या आणि केमिकल्सयुक्त मेकअप रिमूव्हरचा वापर करण्यापेक्षा आपण घरातील काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन देखील त्वचेवरील मेकअप अगदी सहजपणे काढू शकतो. हे नैसर्गिक पदार्थ वापरल्याने मेकअप तर काढता येतोच त्याचबरोबर त्वचेची काळजी देखील घेतली जातेच. मेकअप काढण्यासाठी मेकअप रिमूव्हर पेक्षा कोणत्या ५ नैसर्गिक पदार्थांचा वापर करु शकतो ते पाहूयात( 5 Kitchen Ingredients That Are Natural Makeup Remover).
मेकअप रिमूव्हर नको तर मग वापरा हे खास पदार्थ....
१. बेबी ऑईल :- मेकअप काढण्यासाठी बेबी ऑईल हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. लहान मुलांसाठी बनवलेल्या उत्पादनांमध्ये जवळजवळ कोणतेही हानिकारक केमिकल्स नसतात, ज्यामुळे ते आपल्या त्वचेसाठी सौम्य ठरु शकते आणि मेकअप काढण्यासोबतच ते आपल्या त्वचेला देखील एखाद्या लहान बाळाच्या त्वचेप्रमाणेच मऊमुलायम बनवते.
फक्त 'हे' ४ नैसर्गिक पदार्थ वापरा, पांढरे झालेले केस काही मिनिटांत होतील काळेभोर...
२. कच्चे दूध :- कच्चे थंड दूध मेकअप काढण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी, एका लहान वाटीत दूध घेऊन त्यात कापसाचे गोळे बुडवून ठेवा. थोड्या वेळाने या कापसाच्या गोळ्यांच्या मदतीने तुम्ही त्वचेवरील मेकअप अगदी सहजपणे काढू शकता.
सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी फसली, भयानकच दिसतोय चेहरा-१० बॉलिवूड अभिनेत्रींची भलतीच गोष्ट...
३. खोबरेल तेल :- त्वचेला सुंदर बनवण्यासाठी आवश्यक असलेले पोषक घटक खोबरेल तेलात असतात. मेकअप काढण्यासाठी खोबरेल तेल त्वचेवर लावून कापसाने तुम्ही चेहरा स्वच्छ करू शकता. खोबरेल तेलाच्या मदतीने वॉटरप्रूफ मेकअप देखील सहज काढता येतो.
४. एलोवेरा जेल :- एलोवेरा जेल सर्व प्रकारच्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर असते. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी याचा वापर केला तर मेकअप काढण्याव्यतिरिक्त, त्वचेच्या इतर अनेक समस्यां देखील कमी होऊ शकतात. एलोवेरा जेल वापरुन आपण डोळ्यांचा मेकअप देखील अगदी सहज आणि सुरक्षितपणे काढू शकतो.
५. गुलाबपाणी :- गुलाबपाण्याच्या वापर करून देखील आपण त्वचेवरील मेकअप सहजपद्धतीने काढू शकतो. गुलाबपाणी चेहऱ्यावर स्प्रे करा आणि १५ मिनिटे ते तसेच ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. या मिश्रणामुळे मेकअप सहजपणे काढून टाकला जातोच; पण त्वचा स्वच्छ, चमकदार करण्यासही मदत होते.