Join us  

जेवण झाल्यानंतर मुखवास म्हणून खा ५ पदार्थ.. केसांच्या सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 1:06 PM

Over-All Hair Care Routine: केस गळत असतील, त्यांची वाढ होत नसेल, डोक्यात खूप कोंडा असेल किंवा केस अकाली पांढरे होत असतील, तर या सगळ्या समस्यांवर हा बघा एक उत्तम उपाय..

ठळक मुद्देदुपारच्या जेवणानंतर एक टी स्पून एवढ्या प्रमाणात या मुखवासाचे सेवन करावे. केसांच्या वाढीसाठी ही एक खास हेअर ग्रोथ रेसिपी आहे.

जेवण झाल्यानंतर मुखवास (mukhwas) म्हणून तोंडात टाकायला काही ना काही तरी लागतंच. कुणी बडीशेप खातं तर कुणाला लवंग, वेलची किंवा मसाला सुपारी खाण्याची सवय असते. जेवणाचे चांगले पचन व्हावे, म्हणून मुखवास खाणे योग्यच आहे. पण मुखवास म्हणून एकच पदार्थ खाण्यापेक्षा आपण त्यात आणखी काही पदार्थ टाकले तर तो मुखवास आरोग्यासाठी आणि खासकरून केसांसाठी अधिक पौष्टिक (5 food items important for hair growth) ठरू शकतो. हा मुखवास कसा तयार करायचा, याविषयीची माहिती इन्स्टाग्रामच्या raksha.lulla_nutrition.coach या पेजवर शेअर करण्यात आली आहे.

 

या रेसिपीमध्ये सांगितलेल्या पद्धतीनुसार मुखवास तयार करणं अगदी सोपं आहे. शिवाय यातले बरेच पदार्थ आपल्या स्वयंपाक घरात नेहमीच असतात.

केस वाढतच नाहीत, चेहराही खूप खराब झाला? हा घ्या दोन्ही समस्यांवरचा १ सोपा उपाय...

केसांची चांगली वाढ व्हावी आणि केसांसंबंधी सगळ्या समस्या दूर व्हाव्या, यासाठी हा मुखवास तर नियमितपणे खा, पण त्यासोबतच वेळेवर झोप आणि सकस आहार या गोष्टीही महत्त्वाच्या आहेच. हा मुखवास म्हणजे प्रत्येकासाठीच एक over-all hair care routine आहे, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. दुपारच्या जेवणानंतर एक टी स्पून एवढ्या प्रमाणात या मुखवासाचे सेवन करावे. केसांच्या वाढीसाठी ही एक खास हेअर ग्रोथ रेसिपी आहे, असं वर्णनही या व्हिडिओमध्ये करण्यात आलं आहे. 

 

कसा तयार करायचा केसांसाठी पौष्टिक मुखवास?साहित्यबडीशेप, पांढरे तीळ, काळे तीळ, जवस तसेच भोपळ्याच्या आणि सुर्यफुलाच्या बिया हे सगळं साहित्य समप्रमाणात घ्यावे.

शिल्पा शेट्टी सांगतेय स्ट्रेचिंगसाठी २ परफेक्ट व्यायाम, फिटनेस आणि पोटाचे त्रास, दोन्हींसाठी उत्तमरेसिपी१. सगळ्यात आधी तर वरचे सगळे साहित्य मंद गॅसवर २ ते ३ मिनिटे भाजून घ्यावे.

२. गॅस मोठा करू नये, अन्यथा वरील सगळे साहित्य करपून जाऊ शकते.

३. भाजून घेतलेले सगळे साहित्य थंड झाले की ते एकत्र करावे. केसांसाठी पौष्टिक मुखवास झाला तयार. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीअन्नपाककृती