Lokmat Sakhi >Beauty > मेकअप बिघडला म्हणून चेहरा धुण्याची गरज नाही, ५ टिप्स - ५ मिनिटांत मेकअप करा परफेक्ट...

मेकअप बिघडला म्हणून चेहरा धुण्याची गरज नाही, ५ टिप्स - ५ मिनिटांत मेकअप करा परफेक्ट...

5 worst yet common makeup mistakes and how to avoid them : मेकअप बिघडला तर चेहरा पूर्ण धुवून नवीन सुरुवात करण्याशिवाय पर्याय नसतोच असं नाही, या घ्या खास टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2023 07:52 PM2023-07-24T19:52:35+5:302023-07-24T20:13:48+5:30

5 worst yet common makeup mistakes and how to avoid them : मेकअप बिघडला तर चेहरा पूर्ण धुवून नवीन सुरुवात करण्याशिवाय पर्याय नसतोच असं नाही, या घ्या खास टिप्स

5 Makeup Mistakes We All Make—and How to Fix Them. | मेकअप बिघडला म्हणून चेहरा धुण्याची गरज नाही, ५ टिप्स - ५ मिनिटांत मेकअप करा परफेक्ट...

मेकअप बिघडला म्हणून चेहरा धुण्याची गरज नाही, ५ टिप्स - ५ मिनिटांत मेकअप करा परफेक्ट...

मेकअप करणे हा प्रत्येक स्त्रीचा जन्मसिद्ध हक्कच म्हणावा लागेल. हातांच्या बोटांवर मोजण्याइतक्याच स्त्रिया असतील ज्यांना मेकअप करायला आवडत नाही. प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसायचे असते, त्यासाठी ती मेकअपचा आधार घेतेच. काहीवेळा तर महिला मेकअप करुन सुंदर दिसण्यासाठीच हजारो रुपये खर्च करतात. काही खास सण, समारंभ, प्रसंग असला की आपण आवर्जून मेकअप करतोच. मेकअप करताना तो योग्य पद्धतीनेच झाला पाहिजे. असे झाले नाही तर मेकअप उठून दिसत नाही. मेकअप केल्यामुळे चेहेरा जितका सुंदर व आकर्षक दिसतो, तितकाच मेकअप चुकल्यामुळे चेहेरा विद्रुप दिसतो. यासाठीच मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. 

काहीवेळा कामाच्या घाई गडबडीत किंवा धावपळीच्या वेळी आपल्या हातून चुकीचा मेकअप केला जातो. कधी फाऊंडेशन जास्त लागते, मस्करा पसरतो, काजळ - लायनर पसरते, लिपस्टिक नीट लागत नाही, या ना त्या अशा अनेक समस्या समोर येतात. मेकअप करताना अनेकदा आपण अशा चुका करतो, ज्यामुळे संपूर्ण लुकच  खराब होतो. अशा परिस्थितीत चेहरा धुणे आणि पुन्हा मेकअप करणे हा एकच पर्याय असतो. यामुळे वेळ आणि मेकअप उत्पादने दोन्ही वाया जातात. अशावेळी नेमके काय करावे हा प्रश्न उपस्थित होतो. मेकअप न पुसता झटपट काही सोपे उपाय करुन आपण हा बिघडलेला मेकअप दुरुस्त करु शकतो(5 Makeup Mistakes We All Make—and How to Fix Them).

बिघडलेला मेकअप दुरुस्त करण्यासाठी काही टिप्स... 

१. चेहेऱ्यावरचे डार्क पॅचेस किंवा डाग लपवण्यासाठी. 

जर आपल्या चेहेऱ्यावर डार्क पॅचेस किंवा काळे डाग असतील तर ते मेकअप करुन लपवावे लागतात. चेहेऱ्यावरचे असे काळे डाग लपवण्यासाठी    फाउंडेशनमध्ये पीच किंवा रेड कलरचे आय शॅडो मिक्स करा. हे तयार झालेले फाउंडेशन त्या काळ्या डागांवर व डार्क पॅचेसवर लावून घ्या. फाउंडेशनमध्ये, आय शॅडोचे कलर मिसळल्याने चेहेऱ्यावरचे डाग दिसत नाहीत. तसेच ही सोपी ट्रिक वापरुन आपण शरीराच्या कोणत्याही भागावर असणारा टॅटू देखील अगदी सहजपणे लपवू शकता.  

रात्री मेकअप काढायला विसरलात? ५ सोप्या टिप्स - एवढे नाही केले तर चेहरा खराब झालाच समजा...

२. काजळ कायम तसेच रहावे पसरु नये म्हणून. 

आपण वापरत असलेले काजळ जर वॉटरप्रूफ नसेल तर उन्हाळ्यात किंवा पावसात काजळ पसरू शकते, त्यामुळे काजल लावल्यानंतर ब्राऊन आयशॅडोचा कोट त्यावर लावावा. आयशॅडोचा कोट लावल्यामुळे ते काजळ सील करण्यास मदत करते, ज्यामुळे ते पसरण्याची समस्या उद्भवत नाही.

फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?

३. जेव्हा फाउंडेशन संपले असेल तेव्हा काय करावे. 

जेव्हा आपल्याकडचे रोजच्या वापरातले फाउंडेशन संपले असेल तेव्हा आपण मॉइश्चरायजरमध्ये कंन्सीलर मिसळून त्याचा फाउंडेशन म्हणून वापर करु शकतो. यासाठी चिमूटभर पावडर किंवा कन्सीलरमध्ये मॉइश्चरायजर चांगले मिसळा आणि चेहेऱ्याला लावा. यामुळे आपल्या चेहेऱ्यावर फाउंडेशन लावल्यासारखा एक प्रकारचा बेस तयार होईल. यामुळे आपल्या चेहेऱ्यावर इन्स्टंट ग्लो येण्यास मदत मिळेल. फाउंडेशन लावल्यानंतर आपण त्यावर लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट देखील लावू शकता.  

४. कंन्सीलर नसल्यास नेमके काय करावे. 

 कंन्सीलर नसल्यास आपण  कंन्सीलरच्या जागी फाउंडेशनचा वापर करु शकता. डोळ्यांखालील काळ्या झालेल्या भागावर किंवा ज्या ठिकाणी काळे डाग आहेत त्या ठिकाणी बोटांनी हलकेच फाउंडेशन लावून ते त्वचेमध्ये मिसळून घ्यावे. 

ब्युटी ब्लेंडरमधला स्पंज साफ करणं म्हणजे डोक्याला ताप? पाहा ३ सोप्या पद्धती, सफाई होईल चटकन..

५. जर आयलायनर सुकले असेल तर. 

जर आपले आयलायनर सुकून गेले असेल तर काहीवेळ आयलायनर पेटत्या बल्बजवळ ठेवा. बल्बच्या उष्णतेमुळे हे सुकलेले आयलायनर वितळून थोडे द्रव रूपात येईल ज्यामुळे ते लावणे अधिक सोपे जाईल. यासोबतच आपण सुकलेल्या आयलायनरची बाटली किमान १० मिनिटे गरम पाण्यांत संपूर्णपणे बुडेल अशी ठेवू शकता. यामुळे देखील ते पातळ होऊन डोळ्यांवर लावणे सोपे जाईल.

Web Title: 5 Makeup Mistakes We All Make—and How to Fix Them.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.