Join us  

केस पिकलेत-डायने केस पुन्हा पांढरे होण्याची भिती? १ चमचा कॉफीचा उपाय-केस होतील काळे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 10:46 AM

5 minutes hair dye : या उपायाने केसांचा नैसर्गिक रंग परत मिळण्यास मदत होईल आणि केस काळेभोर दाट दिसतील.

केस काळे करण्यासाठी सगळ्यात आधी काळ्या बीया म्हणजेच कलौंजी फायदेशीर ठरते. सगळ्यात आधी या भाजलेल्या बीया दळून बारीक करून घ्या. (5 Minutes Hair Dye ) दळलेल्या  बीयांमध्ये कॉफी पावडर घालून त्यात मोहोरीचे तेल घाला.  हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून नंतर केसांना लावा. या उपायाने केसांचा नैसर्गिक रंग परत मिळण्यास मदत होईल आणि केस काळेभोर दाट दिसतील. (Kalonji Seeds Benefits for Grey Hair and how to use them)

कलौजीचे केसांना काय फायदे होतात? 

कलौंजीचे तेल केसांना लावल्याने केसांची वाढ होते. यात एंटीहिस्टामाईन प्राकृतिक असते. याचे कोणतेही साईड इफेक्ट जाणवत नाही. (Kes kale kase karave) केसांवर याचा वापर करणं पूर्णपणे सुरक्षित आहे. केसांवर या तेलाचा वापर  केल्याने अकाली केस पिकणं, केस पांढरे होणं या समस्या टाळण्यास मदत होते.

डोक्यावर पांढरे केसच जास्त दिसतात? ५ पदार्थ वापरून केस करा काळे, डायची गरजच नाही

यातील लिनोलिक एसिडच्या  जास्त प्रमाणामुळे हे होते. ज्यामुळे मुलांमध्ये ब्लॅक पिग्मेंटेशन कमी करता येते. कलौंजीचे तेल केसांना दीर्घकाळ काळे आणि चमकदार ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.  जर तुमचे केस कुरळे असतील तर तुम्ही कलौंजीच्या तेलाने मालिश करू शकता. ज्यामुळे सिबमच्या उत्पादनात मदत होईल. याशिवाय काळ्या बीयांचे तेल फॅटी अमिनो एसिड्स  परिपूर्ण असते. यामुळे केसाचे मॉईश्चर कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे केसांचं गळणं कमी होतं. 

१० रूपयांच्या कोथिंबीरीने केस होतील दाट-लांब; कंबरेपर्यंत वाढतील केस, या पद्धतीने केसांना लावा

धूळ-घाण, प्रदूषण यामुळे केस रुक्ष आणि कोरडे होतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला महागड्या हेअर केअर प्रोडक्ट्सची गरज भासते. नियमित स्वरूपात कलौंजीच्या तेलाने स्काल्पवर मालिश करायला हवी.  काळ्या बीया एंटी ऑक्सिडेंट्सचा चांगला स्त्रोत असतात.  ज्यामुळे फ्रि रॅडीकल्सवर परिणाम होतो. 

कलौंजीचे तेल कसे वापरावे?

एक वाटीत दोन मोठे चमचे कलौंजीचे तेल घ्या आणि व्यवस्थित गरम  करा.  नंतर या तेलात कापडाचा बोळा बुडवा आणि स्काल्पवर व्यवस्थित लावा. जवळपास  ५ मिनिटं ठेवल्यानंतर डोक्याची मालिश करा. त्यानंतर केस शॉवर कॅपने झाकून घ्या. जवळपास एक तासासाठी हे तेल तसेच लावून ठेवा नंतर माईल्ड शॅम्पूने केस धुवा.  चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून कमीत कमी २ वेळा ही क्रिया करा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी