आपली त्वचा नितळ, चमकदार, मऊ असावी असं सगळ्यांनाच वाटतं. त्यामुळे प्रत्येकजण जमेल त्या पद्धतीने आपल्या त्वचेची काळजी घेत असतात. काही जणींना त्यासाठी भरपूर वेळ मिळतो. तर काही जणींकडे अजिबातच वेळ नसतो. काही जणी अशाही असतात ज्या त्वचेसाठी खूप काही करत नाहीत पण तरीही त्यांची त्वचा अतिशय छान असते. त्याउलट त्वचेची भरपूर काळजी घेणाऱ्या कित्येकींची त्वचा पिगमेंटेड असते, त्यावर टॅनिंग झालेलं असतं. याचं कारण एकच की तुम्ही त्वचेची काळजी तर घेत आहात, पण ते करत असताना काही चुका करता ज्या तुमच्या त्वचेचं नुकसान करतात. अशा कोणत्या गोष्टी आहेत ते पाहूया...(5 most common mistakes in skin care routine that causes breakouts and pigmentation on skin)
त्वचेची काळजी घेताना 'या' चुका करू नका
१. तुमच्या त्वचेवर कधीही भरपूर कॉस्मेटिक्सचा मारा करू नका. त्वचेवर एकानंतर एक सतत काहीतरी लावत असाल तर ते सगळंच तुमच्या त्वचेला सूट होईल असं नसतं. त्यातलं एखादं जरी क्रिम तुमच्या त्वचेला सहन झालं नाही तर त्यातून ब्रेकआऊट्स होणं, पिगमेंटेशन येणं, त्वचा लालसर होणं असा त्रास होऊ शकतो.
वय वाढलं तरी हाडं राहतील मजबूत! 'हा' पदार्थ रोज खा- सांधेदुखीचा त्रास कधीच होणार नाही
२. तुमचा स्किन टाईप म्हणजेच त्वचेचा प्रकार नेमका कसा आहे हे लक्षात न घेताच अनेकजणी वेगवेगळे कॉस्मेटिक्स वापरतात. एखादी मैत्रिण वापरते, जाहिरात पाहिली म्हणून ते वापरणं सुरू करतात. यात जर तुमच्या स्किनटाईपच्या विरुद्ध प्रोडक्ट निवडलं गेलं तर त्यामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं.
३. सनस्क्रिन लोशन लावणं अनेकजणी टाळतात. आपण घरातच असतो किंवा आपण कुठे उन्हात जातो असं म्हणून अनेकजणी सनस्क्रिन लावत नाहीत. पण आपण ज्या वातावरणात राहातो त्यामध्ये आपल्या त्वचेसाठी सनस्क्रिन लावणं खूप गरजेचं आहे.
किचनमधल्या 'या' वस्तू वर्षांनुवर्षे वापरल्यास होऊ शकतात गंभीर आजार! तुम्हीही ती चूक करता?
४. खूप पटापट तुमचे प्रोडक्ट बदलू नका. एखादं प्रोडक्ट आणल्यानंतर किमान महिनाभर तरी ते नियमितपणे वापरा. कोणतीही गोष्ट नियमितपणे केली तरच त्याचे परिणाम दिसून येतात. तसंच त्वचेसाठी असणाऱ्या कॉस्मेटिक्सचही आहे.
५. ऋतूनुसार तुमचं स्किनकेअर रुटीन बदला. त्वचेसाठी जे काही हिवाळ्यात करत होतात तेच उन्हाळ्यात करून उपयोग नाही.