Join us  

हेअर डाय लावायची भीती वाटते, 5 नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय, पांढरे केस होतील काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 7:14 PM

कमी वयात केस पांढरे होणं यापेक्षाही केस काळे करण्यासाठी हेअर डाय वापरणं अनेकांना जास्त काळजी वाढवणारं वाटतं. हेअर डाय वापरुन केस काळे करण्याचे 5 नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय आहेत.

ठळक मुद्देआवळा पावडर आणि रीठा पावडर यांचा वापर केस काळे करण्यासाठी परिणामकारक मानला जातो.आठवड्यातून 2-3 वेळा कांद्याचा रस केसांना लावल्यास पांढरे केस काळे होतात. कोरफडच्या गरानं त्वचेला जशी चमक येते तशीच चमक केसांनाही आणता येते. 

कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. केस पांढरे झाले की कमी वेळ आणि कमी खर्चाचा उपाय म्हणून केसांना डाय लावण्याचं प्रमाणही वाढलं आहे.  पण हेअर डायचा वापर जास्त केल्यानं होणारे धोके आरोग्य तज्ज्ञ आणि हेअर एक्सपर्टही सांगत आहेत. कमी वयात केस पांढरे होणं यापेक्षाही केस काळे करण्यासाठी हेअर डाय वापरणं अनेकांना जास्त काळजी वाढवणारं वाटतं.

Image: Google

हेअर डाय हाच पांढरे केस काळे करण्याचा उपाय मानला जात असला तरी हा उपाय आरोग्यविषयक धोके निर्माण करतो. हेअर डायमुळे पांढरे केस काळे करता येतात पण नैसर्गिक उपायांचा वापर करुन पांढरे केस केवळ काळे करता येतात असं नाही तर पांढरे केस या उपायांनी काळे होतात. पांढरे केस पुन्हा काळे होण्यासाठी आवळा पावडर, रीठा पावडर, कांद्याचा रस, कोरफडीचा गर, मेथ्या या नैसर्गिक आणि बहुगुणी घटकांचा वापर केला जातो.

Image: Google

पांढरे केस काळे करण्यासाठी..

1. पांढरे केस काळे करण्यासाठी आवळा पावडर आणि रीठा पावडर यांचा वापर करणं परिणामकारक मानलं जातं.  हा उपाय करण्यासाठी एका लोखंडी कढईत आवळा पावडर आणि रीठा पावडर एकत्र करुन रात्रभर भिजवावी. हे मिश्रण दुसऱ्या दिवशी सकाळी केसांना लावावा. हा लेप केसांवर 45 मिनिटं ते एक तास ठेवून नंतर पाण्यानं केस स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यास पांढरे केस काळे होतात. 

Image: Google

2. पांढरे केस काळे करण्याचा प्रभावी नैसर्गिक उपाय म्हणजे कांद्याचा रस लावणे. कांद्याचा रस काढावा. केस विंचरुन मग हा रस केसांच्या मुळांना लावावा. हा रस पूर्ण सुकला की मग केस शाम्पूनं धुवावेत. आठवड्यातून 2-3 वेळा कांद्याचा रस लावल्यास पांढरे केस काळे होतात.

 Image: Google

3. मेथ्यांचा उपयोग केस निरोगी होण्यासाठी करता येतो त्याचसोबत पांढरे केस काळे करण्याचा परिणामही मेथ्यांच्या उपयोगाद्वारे साधता येतो. यासाठी रात्रभर मेथ्या भिजवाव्यात. दुसऱ्या दिवशी मेथ्यांची पेस्ट करावी. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावावी. ही पेस्ट सुकल्यावर केस शाम्पूनं हळूवार धुवावेत.  

Image: Google

4. कोरफडच्या गराचा उपयोग करुन त्वचेवर चमक आणता येते. त्याचप्रमाणे कोरफडचा उपयोग केसांसाठी केल्यास केसही चमकदार होतात.  पांढरे केस काळे होण्यासाठी कोरफडचा गर वापरताना केस धुण्यआधी तेल लावलं जातं तेव्हाच केसांना कोरफडचा गर लावून केसांच्या मुळांशी हलका मसाज कराअवा. मस्दज केल्यानंतर केस सुकले की मग सौम्य शाम्पूचा वापर करत केस धुवावेत. शाम्पू नंतर केसांना कडिशनर लावू नये. आठवड्यातून 2-3 वेळा केसांना कोरफडचा गर लावल्यास केस काळे होतात आणि चमकतात. 

Image: Google

5. केस काळे होण्यासाठी पेस्ट स्वरुपात मेथ्यांचा वापर केला जातो त्याचप्रमाणे तेल स्वरुपातही वापर करता येतो. यासाठी एका भांड्यात खोबऱ्याचं आणि एरंड्याचं तेल एकत्र करावं. त्यात चमचाभर मेथ्या घालून त्या तेलात गरम कराव्यात. मेथ्या काळसर होईपर्यंत तेल तापवावं. हे तेल नंतर गार होवू द्यावं. या तेलानं नियमितपणे केसांना मसाज केल्यास पांढरे केस काळे होतात. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स