Join us  

थंडीसाठी विकतचे, केमिकल्सयुक्त महागडे मॉइश्चरायझर नको, घरातीलच या ५ गोष्टी आहेत उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2023 7:45 PM

The 5 Best Homemade Moisturisers For All Skin Types : सर्व प्रकारच्या त्वचेला हायड्रेशनची तसेच मॉइश्चरायझिंगची गरज असते. नैसर्गिक पद्धतीने मॉइश्चरायझिंग करण्यासाठी या घरगुती गोष्टींचा वापर करू शकतो.

थंडीच्या दिवसांत त्वेचेचे संरक्षण व्हावे यासाठी आपण त्वचेवर मॉइश्चरायझर लावतो. जसजसे आपले वय वाढते तसतसे चेहऱ्याचे हायड्रेशन कमी होऊ लागते. त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर (5 Recipes for Homemade Natural Moisturizers for Face and Body) वापरणे आवश्यक असते. मॉइश्चरायझर्स त्वचेला हायड्रेट आणि पोषणमूल्य मिळवून देण्यास मदत करतात. मॉइश्चरायझरचा वापर कोरडेपणा टाळण्यासाठी, त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी तसेच त्वचेला मऊ आणि उजळ रंग देण्याचे काम करतात. मॉइश्चरायझर क्रिम, लोशन, जेल आणि तेल म्हणून देखील वापरले जाऊ शकते(Homemade Moisturizer for Soft Glowing & Flawless Skin, Remove Dark Spots, Pigmentation & Wrinkles)

आपली स्किन ज्या प्रकारची असते त्या प्रमाणे आपण त्वचेची काळजी घेतो. स्किन कोणत्याही प्रकारची असो तिला मॉइश्चराइज करणे गरजेचे असते. स्किनचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी स्किनला हायड्रेटिंग आणि मॉइश्चरायझिंग करणे फायदेशीर ठरते. प्रत्येकालाच मॉइश्चराइझ स्किन आवडते. स्किन मॉइश्चराइझ(Winter Skin Care Tips: 5 Natural Moisturisers To Prevent And Remedy Dry Skin) करण्यासाठी आपण स्किनवर वेगवेगळ्या प्रकारचे मॉइश्चरायझर लावतो. परंतु हे विकतचे महागडे मॉइश्चरायझर (BEST NATURAL MOISTURIZERS FOR YOUR SKIN) घेऊन लावण्यापेक्षा किचनमधल्या नेहमीच्याच गोष्टींचा वापर करून नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून त्यांचा आपल्या त्वचेवर उपयोग करु शकतो(Moisturizer For Dry Skin: Homemade Natural Moisturizer For Dry Skin In Winter).

नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून कोणत्या गोष्टींचा वापर करु शकतो ? 

१. खोबरेल तेल :- आजीच्या बटव्यातील उपायांपासून ते ब्युटी हॅक्सपर्यंत सगळ्याचं सौंदर्य प्रसाधनांमध्ये खोबरेल तेलाचा वापर नक्कीच होतो. हे त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करते आणि त्वचेला हायड्रेट ठेवते. याचबरोबर, त्यात अँटी - बॅक्टेरियल गुणधर्म भरपूर प्रमाणांत असतात, ज्यामुळे त्वचेला होणारे कोणत्याही प्रकारचे इंन्फेक्शन रोखण्यास मदत होते. आपण रात्री झोपताना खोबरेल तेलाने शरीराची मालिश करू शकता.

शांत झोप आणि सुंदर व्हा ! ब्यूटी स्लिपचा घ्या निवांत फॉर्म्युला, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो चकटफू...

२. मध :- हिवाळ्यात जर कडाक्याच्या थंडीने आपली त्वचा कोरडी होऊ लागली असेल तर मधापेक्षा दुसरा उत्तम पर्याय दुसरा असूच शकत नाही. आंघोळीपूर्वी कच्च्या दुधात मध मिसळून या मिश्रणाने त्वचेची मालिश करावी. मधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करतात. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होईल आणि त्वचेवर चमकही येईल. 

हिवाळ्यात केसांना तेल लावल्याने खरंच सर्दी - खोकला होतो ? तज्ज्ञ सांगतात केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत...

३. कोमट तूप :- तूप हलके गरम करून त्वचेला लावल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. हा खूप जुना आणि पूर्वापार चालत आलेला सोपा उपाय आहे. तुपात हेल्दी फॅट्स आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. यासाठी आंघोळीच्या एक तास आधी कोमट तुपाने शरीराची मालिश करून घ्यावी.  

पिंपल्स फुटून चेहऱ्यावर काळे डाग पडलेत ? ३ सोपे उपाय, किचनमधील हे खास पदार्थ काळे डाग कायमचे दूर करतील...

४. कोरफडीचा गर :- हिवाळ्यात त्वचा मॉइश्चरायझ करण्यासाठी कोरफड जेल हा एक चांगला पर्याय आहे. हे त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करते आणि ती चमकदार ठेवते. अ‍ॅलोवेरा जेलमध्ये अँटी - बॅक्टेरियल आणि अँटी - फंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणांत असतात, ज्यामुळे त्वचेला खाज येणे आणि इतर  संसर्गापासून आराम मिळतो. यासाठी आपण आंघोळीनंतर त्वचेवर कोरफड जेलचा एक हलका थर लावू शकता. यामुळे ऐन हिवाळ्यात आपली त्वचा मॉइश्चरायझ केली जाते. 

अंडरआर्म्स हेअर रिमूव्हलसाठी केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्स वापरुन त्वचा काळवंडली, ४ घरगुती नैसर्गिक सोपे उपाय...

५. बदाम तेल :- बदामाच्या तेलामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट असतात , जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात, रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने त्वचेवर मसाज केल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासोबतच, काळे डाग देखील कमी करण्यास फायदेशीर ठरु शकते.    

या गोष्टीही लक्षात ठेवा - 

१. आपल्या त्वचेच्या स्वच्छतेसाठी जास्त गरम पाणी वापरू नका, यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो. २. रासायनिक फेशियल आणि त्वचा उपचार किंवा रासायनिक ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरण्याचे प्रमाण कमी करा, नाहीतर त्वचेचा कोरडेपणा वाढू शकतो. ३. पुरेसे पाणी प्या आणि फळ भरपूर प्रमाणात खा, यामुळे आपली त्वचा निरोगी राहते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी