आजकाल प्रत्येक जण केस गळणे, पांढरे केस, केसात कोंडा यासह इतर समस्येने त्रस्त आहेत (Hair Fall Remedy). महिलांसोबतच पुरुष आणि लहान मुलांनाही केसगळतीचा सामना करावा लागत आहे (Hair Care Tips). ज्यामुळे केस दाट तर होत नाहीच, शिवाय केस गळतीमुळे केसांची वाढ खुंटते आणि पुन्हा नवी वाढ होत नाही (Expert Tips for Hairs). ज्यामुळे हेअर ग्रोथमध्येही प्रॉब्लेम येतात.
अशावेळी केसांची निगा राखणं, जीवनशैली आणि आहाराकडे लक्ष द्यायला हवे. जर आपल्याला सुंदर, लांब आणि दाट केस हवेत तर, जीवनशैलीत काही बदल करून योगगुरू मुस्कान मित्तल यांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करून पाहा. यामुळे केसांची पुन्हा नव्याने वाढ होईल. शिवाय केसांच्या अनेक समस्याही सुटतील(5 Natural Remedies to Stop Hair Fall).
झोपण्यापूर्वी आपल्या टाळूची मालिश करा
तज्ज्ञांच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी टाळूची मालिश केल्याने केसांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. रात्री केसांना तेल लावून मसाज करा. यामुळे तणाव कमी होईल. शिवाय रक्त परिसंचरण देखील सुधारेल. ज्यामुळे केस गळणे आणि तुटणे कमी होते. दररोज तेल न लावता टाळूला मसाज केल्याने केस मजबूत होतील.
रणवीर सिंह वाढवतोय १५ किलो वजन, तुमचं वजनच वाढत नसेल तर पाहा ‘त्याचं’ डाएट
रात्री कधीही केस बांधू नका
अनेकदा, दिवसभराच्या कामानंतर स्त्रिया त्यांचे केस घट्ट अंबाडामध्ये बांधतात आणि रात्री झोपतात. रात्री घट्ट अंबाडा घालून झोपल्याने केसांची गुणवत्ता खराब होते. इतकेच नाही तर, केस गळण्याचीही समस्या निर्माण होते. त्यामुळे रात्री नेहमी हलके केस बांधून झोपावे.
बालायाम योग
योगगुरूंच्या मते, बालायम योगामुळे केस गळणे आणि खराब झालेले केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते. या योगामध्ये दोन्ही हातांची नखे एकत्र घासा. यामुळे केसांच्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होईल. दररोज किमान १० मिनिटे बालायाम योग करा.
शिल्पा शेट्टीच्या फिट आणि फंटास्टिक फिगरचं रहस्य काय? पाहा आल्याचे ती करत असलेले ‘खास’ प्रयोग
कोंबिंगमुळे केस गळणे थांबते ?
केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या टाळण्यासाठी केसांना दररोज कंघी करणे खूप महत्वाचे आहे. कोंबिंगमुळे टाळूमध्ये नैसर्गिक तेलांचे वितरण होते, ज्यामुळे केस निरोगी राहतात. रोज केस विंचरल्याने टाळूला पोषण मिळते. ज्यामुळे केस तुटणे आणि गळणे थांबते.
नियमित व्यायाम करा
व्यायामाने तणाव कमी होतो. ज्याचा थेट परिणाम टाळू आणि केसांवर होतो. जेव्हा आपण तणावमुक्त असतो तेव्हा केस तुटणे आणि गळणे कमी होते. योगगुरूच्या मते, दररोज व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. ज्याच्या मदतीने केस मजबूत होतात.