Lokmat Sakhi >Beauty > मेहेंदी आणि डायचे साइड इफेक्ट टाळा, वापरा ५ घरगुती गोष्टी-डाय न करता केस काळे करण्याची युक्ती

मेहेंदी आणि डायचे साइड इफेक्ट टाळा, वापरा ५ घरगुती गोष्टी-डाय न करता केस काळे करण्याची युक्ती

5 Natural Ways to Dye & Color Your Hair without Chemicals : डाय न करताही केस काळे कसे करायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2024 10:00 AM2024-07-10T10:00:00+5:302024-07-10T11:02:35+5:30

5 Natural Ways to Dye & Color Your Hair without Chemicals : डाय न करताही केस काळे कसे करायचे?

5 Natural Ways to Dye & Color Your Hair without Chemicals | मेहेंदी आणि डायचे साइड इफेक्ट टाळा, वापरा ५ घरगुती गोष्टी-डाय न करता केस काळे करण्याची युक्ती

मेहेंदी आणि डायचे साइड इफेक्ट टाळा, वापरा ५ घरगुती गोष्टी-डाय न करता केस काळे करण्याची युक्ती

केस काळे करण्यासाठी आपण विविध गोष्टी करून पाहतो (Hair care Tips). बऱ्याच महिला मेहेंदीचा देखील वापर करतात. अनेक मेहेंदीमुळे केसांचे रंग काळे नसून लाल होते (Hair Colour). शिवाय बाजारात मिळणाऱ्या मेहेंदी आणि डायमध्ये केमिकल रसायनांचा वापर जास्त प्रमाणात होतो. ज्यामुळे केसांचे अधिक नुकसान होते.

केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी आपण काही घरगुती साहित्यांचा देखील वापर करू शकता. केमिकलयुक्त रासायनिक डायचा वापरण्याऐवजी घरगुती उपाय केसांसाठी बेस्ट ठरतील. या घरगुती गोष्टींमुळे केस काळे आणि निरोगी राहतील. शिवाय केस चमकदारही दिसतील(5 Natural Ways to Dye & Color Your Hair without Chemicals).

केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी घरगुती उपाय

आवळा

आवळा हे केसांसाठी अप्रतिम औषध आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात. जे केस मजबूत आणि काळे करण्यास मदत करतात. यासाठी एका बाऊलमध्ये आवळा पावडर घ्या. त्यात चहापत्तीचं पाणी किंवा पाणी मिसळून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट केसांना लावा आणि तासभर राहू द्या. यानंतर केस शॅम्पूने धुवा. आपण या आवळा पावडरचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.

ना गुळ - ना साखर, कपभर ड्रायफ्रुट्सची करा पौष्टीक बर्फी; मिळेल ताकद-हाडंही ठणठणीत

चहापत्तीचं पाणी

चहापत्तीच्या पाण्यामध्ये नैसर्गिक रंग असतो. ज्यामुळे केस काळे आणि घनदाट होतात. यासाठी एका भांड्यात पाणी घ्या. त्यात २ ते ३ चमचे चहापत्ती पावडर घाला.  पाणी ५ मिनिटांसाठी उकळवत ठेवा. नंतर गॅस बंद करा. चहाचे पाणी केसांना लावा. ३० मिनिटानंतर शाम्पूने केस धुवा.

भृंगराज

भृंगराजला 'केशराज' म्हणजे केसांचा राजा असेही म्हणतात. हे केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होतात. भृंगराजच्या पानांची पेस्ट बनवून केसांना लावा. ३० मिनिटानंतर केस शाम्पूने धुवा. यामुळे केस काळेभोर आणि घनदाट दिसतील.

मेहेंदी आणि कॉफीचे मिश्रण

जर आपल्याला मेहेंदीचा रंग आवडत नसेल तर, आपण त्यात कॉफी घालून त्याचा रंग अधिक गडद करू शकता. एका बाऊलमध्ये मेहेंदी पावडर घ्या. त्यात कॉफी पावडर मिक्स करा. चहापत्तीच्या पाण्याने किंवा पाण्याने पेस्ट तयार करा. तयार पेस्ट केसांना लावा. २ तास राहू द्या. नंतर शाम्पूने केस धुवा.

पुऱ्या - भजी तळल्यानंतर उरलेले तेल फेकून का देता? २ युक्त्या, बघा तेलाचे काय करायचे..

खोबरेल तेल आणि लिंबाचा रस

खोबरेल तेल केसांना पोषण देण्यासोबतच ते काळे होण्यास मदत करते. लिंबाच्या रसामुळे केसांना नवी चमक येते. खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण थोडे गरम करून स्काल्पवर लावून मसाज करा. तासाभरानंतर शाम्पूने केस धुवा.

Web Title: 5 Natural Ways to Dye & Color Your Hair without Chemicals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.