आजकालच्या अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे आरोग्याच्या निगडीत अनेक आजार उद्भवतात. ज्यामुळे केस आणि त्वचेवर देखील परिणाम होतो. बिघडलेला आहार व खराब जीवनशैलीमुळे अनेकांना याचा फटका बसतो. ज्याचा इफेक्ट केसांवर होतो. केसांची निगा राखण्यासाठी फक्त तेल आणि मालिश उपयुक्त नसून, योग्य आहार घेणे तितकेच महत्वाचे आहे.
योग्य आहार न घेतल्यामुळे केसांची समस्या वाढते. अकाली केस पांढरे होणे, केस गळणे, केसांची वाढ कमी होणे, केसांमध्ये फाटे फुटणे, या व अशा अनेक समस्या उद्भवतात. अकाली केस पांढरे होणे ही समस्या लोकांमध्ये वाढत चालली आहे. त्यामुळे वेळीच या ५ सुपरफुड्सचा आहारात समावेश करा. जेणेकरून पांढऱ्या केसांची समस्या कमी होईल, व केस शाईन - काळेभोर होतील(5 nutrients for black hair and to fight premature greying).
पालक
पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह, जीवनसत्त्वे ए, सी आणि फोलेट आढळते. जे केसांच्या निरोगी वाढीस प्रोत्साहन देते. यासह केस गळतीपासूनही सुटका देते. यात सीबम असते, जे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून कार्य करते. आहारात पालकाचा समावेश केल्याने केस पांढरे होण्यापासून सुटका मिळते.
चिंचेचा चमकदार फेसपॅक, असा फेकपॅक तुम्ही लावला नसेल कधी, ट्राय करा बघा चेहऱ्यावर चमक
बदाम
बदाम हे व्हिटॅमिन ई चा उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे केस अकाली पांढरे होत नाही. व्हिटॅमिन ई हे एक अँटिऑक्सिडेंट आहे, जे केसांच्या मुळांना होणाऱ्या नुकसानापासून वाचवते.
बेरी
बेरी हे अँटिऑक्सिडंट्सचे उत्तम स्त्रोत आहे, जे केसांच्या मुळांवर होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करते. बेरीमध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर आढळते, जे कोलेजनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. कोलेजन केस मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.
डास चावल्याने प्रचंड खाज सुटली? पुरळमुळे त्वचा लाल पडली? ४ उपाय, स्किन होईल क्लिअर
रताळे
रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते, जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. व्हिटॅमिन ए केसांना निरोगी ठेवण्यास मदत करते. याशिवाय केस लवकर पांढरे होण्यापासून सुटका करते.
मशरूम
मशरूममध्ये भरपूर प्रमाणात कॉपर आढळते. ज्यामुळे मेलेनिनचे उत्पादन वाढते. व केस लवकर पांढरे होत नाहीत. यासाठी आहारात मशरूमचा समावेश करा.