Join us  

महिलांनी अजिबात वापरु नयेत अशा ५ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात, चांगले दिसण्याच्या नादात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2023 1:30 PM

5 Products Women Should Not Use : काही उत्पादनं मात्र आपल्या त्वचेसाठी, आरोग्यासाठी घातक असू शकतात, त्याविषयी...

ठळक मुद्देचांगले दिसण्यासाठी आपण अनेकदा काही ना काही प्रॉडक्ट वापरतो, पण त्याचे तोटे समजून घ्यायला हवेतसौंदर्याचा विचार करताना आरोग्याचाही प्रामुख्याने विचार करायला हवा..

आपण परफेक्ट नाही असे महिलांना सतत वाटते असते. आपण छान असणं हे आपल्या दिसण्यापेक्षा असण्यावर अवलंबून असते हे अनेकींना कळत असून वळत नाही. मग सगळ्या गोष्टी केवळ असण्यापेक्षा दिसण्याशी जोडल्या जातात. आपली त्वचा चांगली नाही, आपले केसच खराब आहेत, आपला रंग सावळा आहे, आपल्या चेहऱ्यावर डाग किंवा पिंपल्स आहेत, उंची कमी आहे असं अनेकींना कायम वाटतं. मग आपल्यादृष्टीने परफेक्ट नसलेल्या या गोष्टी परफेक्ट करण्यासाठी बाजारात मिळणारी विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधने किंवा इतर गोष्टी वापरल्या जातात (5 Products Women Should Not Use).  

आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी अशाप्रकारची उत्पादनं वापरणं अगदी सामान्य असलं तरी काही उत्पादनं मात्र आपल्या त्वचेसाठी, आरोग्यासाठी घातक असू शकतात. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र याबाबात महत्त्वाची माहिती शेअर करतात. द योग इन्स्टीट्यूट या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या अशा ५ गोष्टींची यादी देतात. तसेच या गोष्टी वापरल्याने निर्माण होणाऱ्या समस्याही सांगतात. त्यामुळे ही उत्पादने वापरणे महिलांनी त्वरीत थांबवायला हवे, ही उत्पादने कोणती आणि त्यामुळे काय तोटे होतात पाहूया...

(Image : Google)

१. स्कीन लायटनिंग क्रीम 

या उत्पादनांमुळे आपली त्वचा आहे त्यापेक्षा गोरी दिसायला मदत होत असल्याने अनेक तरुणी त्याचा सर्रास वापर करतात. पण यामध्ये हायड्रोक्यूनॉन आणि पारा यांसारख्या घटकांचा वापर केलेला असतो. हे घटक त्वचेसाठी चांगले नसल्याने त्याचा वापर करु नये. यामुळे भविष्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. यापेक्षा घरगुती फेसमास्क वापरणे केव्हाही चांगले. 

२. अंडर वायर ब्रेसियर 

ब्रेस्ट उचललेले दिसावेत म्हणून अनेक तरुणी अशा ब्रा वापरतात. मात्र यामुळे त्वचेला आणि बरगड्यांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे कॉटनच्या कापडाच्या आपल्याला कम्फर्टेबल होतील अशा ब्रेसियर वापरणे केव्हाही फायद्याचे.

३. हाय हिल्स 

बऱ्याच महिला उंच दिसण्यासाठी हाय हिल्सचा वापर करतात. पण अशाप्रकारच्या चपलांमुळे गुडघे, टाचा आणि एकूण पायांवर ताण येतो. सतत हिल्स वापरल्या तर पाठीवरही त्याचा ताण येऊन पाय, पाठ सगळेच अवघडल्यासारखे होते. त्यापेक्षा आपल्या पायाला कम्फर्ट देतील अशे सँडल किंवा शूज वापरावेत.

 

४. इंटीमेट वॉश प्रॉडक्ट

या उत्पादनांमध्ये अतिशय उच्च दर्जाच्या केमिकल्सचा वापर केलेला असतो. आपली व्हजायना ही अतिशय नाजूक असल्याने याठिकाणी अशी उत्पादने वापरल्यास काही तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. यामध्ये खाज येणे, जळजळ होणे, लघवीला त्रास होणे अशा समस्या उद्भवतात. त्यापेक्षा व्हजायना साध्या पाण्याने धुवावी आणि कोरडी करावी. 

५. हेअर डाय

पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी किंवा फॅशन म्हणून केसांना रंग करण्यासाठी बऱ्याच महिला हेअर डायचा वापर करतात. पण या डायमध्ये असणारी केमिकल्स घातक असतात. ज्यामुळे त्वचेच्या तक्रारींपासून अस्थमापर्यंतचे गंभीर आजार होऊ शकतात. 

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्सहेल्थ टिप्सलाइफस्टाइल