धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला अनेकांना जमत नाही. त्यात स्किनची काळजी घ्यायलाच जमेल असेही नाही. काही लोकं मेकअप लावतात, पण अनेकदा झोपण्यापूर्वी चेहरा धुवत नाही. ज्यामुळे चेहऱ्यावर मुरूम, स्किन एलर्जी अशा समस्या निर्माण होतात. जेव्हा आपण कामातून घरी परततो, तेव्हा हात - पाय - चेहरा धुतो.
पण झोपण्यापूर्वी फार कमी लोकं चेहरा धुतात. पण झोपण्यापूर्वी चेहरा का धुवावा? रात्री चेहरा धुतल्याने स्किनला कोणते फायदे मिळतात? फक्त मेकअप लावल्यावरच नाही तर, इतरही वेळी चेहरा रात्री धुवायला हवा का? रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुण्याचे फायदे कोणते हे पाहूयात(5 reasons why you should ALWAYS wash your face before going to Bed).
पोर्स ओपन होतात
दिवसभर काम करताना आपला चेहरा धूळ, माती आणि प्रदूषणाच्या संपर्कात येतो. ज्यामुळे त्वचेची छिद्रे ब्लॉक होतात. काही वेळेला आपली स्किन खूप ऑयली होते. यामुळे देखील स्किनची छिद्रे बंद होतात. अशा वेळी त्वचेच्या संबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुणे खूप गरजेचं आहे. रात्री सामान्य पाण्याने चेहरा धुतल्याने अनेक समस्या कमी होतात. व स्किन फ्रेश राहते.
काजळ पसरण्याची भीती वाटते? ५ भन्नाट टिप्स, डोळे दिसतील टपोरे, काजळ पसरणार नाही
सुरकुत्या कमी होतात
रात्री चेहरा धुतल्याने त्वचा रात्रभर स्वच्छ आणि तजेलदार राहते. ज्यामुळे डलनेस आणि सुरकुत्या येण्याचा धोका कमी होतो. व चेहरा पोर्सद्वारे श्वास घेतो. ज्यांची त्वचा कमी वयात खूप वयस्कर दिसत असेल, तर त्यांनी नियमित रात्री चेहरा स्वच्छ धुवावा.
मुरुमांचा धोका कमी होतो
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुतल्याने मुरूम यासह मुरुमांचे डाग कमी होतात. रात्री चेहरा धुतल्याने सकाळी स्किन फ्रेश दिसते. यासह पोर्स ओपन होतात. ज्यामुळे मुरुमांची समस्या कमी होते.
चेहऱ्यावर चमचाभर दुधाची साय लावा; दिसाल तरूण-सुंदर, मिळतील फायदेच फायदे
त्वचेचा कोरडेपणा कमी होतो
झोपण्यापूर्वी चेहरा धुतल्याने त्वचा मॉइश्चरायज राहते. ज्यामुळे स्किन ड्राय होत नाही. जर आपलीही त्वचा वारंवार कोरडी होत असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुण्याची सवय लावा.
रात्री झोपण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
रात्री चेहरा धुण्यापूर्वी काही प्रॉडक्ट्सचा वापर करणे टाळा. आपला चेहरा साध्या पाण्याने धुवा, व धुताना त्वचेला जास्त घासण्याचा प्रयत्न करू नका. आपला चेहरा धुतल्यानंतर, स्वच्छ सूती कापडाने किंवा टॉवेलने हलक्या हाताने कोरडे करा. शक्यतो रात्री झोपताना कोणत्याही प्रकारचे उत्पादन लावणे टाळा.