आपल्यापैकी बऱ्याचजणीं काळ्या अंडरआर्म्सच्या सम्येने खूपच त्रस्त असतात. अंडरआर्म्सचा काळपटपणा दूर करण्यासाठी आपण अनेक उपायांचा वापर करत असतो. काळ्या अंडरआर्म्स बरोबरच अंडरआर्म्सची दुर्गंधी ही एक सामान्य समस्या आहे जी अनेकींनी अनुभवलेली असते. बाकी शरीराच्या भागांपेक्षा अंडरआर्म्सची स्वच्छता ठेवणं खूपच गरजेचं असतं. अंडरआर्म्सची त्वचा ही अतिशय नाजूक असते. यामुळे या नाजूक त्वचेवर सतत येणारा घाम यामुळे अंडरआर्म्सची त्वचा काळी पडणे, दुर्गंधी येणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
वास्तविक उन्हाळ्याच्या दिवसात अति घामाने अंडरआर्म्समधील हे छोटे केस टोचतात शिवाय शरीराला घामाचा वासही येतो. त्यामुळे हल्ली बहुतेक सर्वचजणी अंडरआर्म्स करणे पसंत करतात. वर्षभरामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा येतो आणि आपल्या सभोवतालच्या सृष्टीमध्ये बदल घडतो. हे बदल स्वीकारून आपल्यालाही आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करणे आवश्यक असते. ऋतूमानानुसार शरीराच्या काही गरजा असतात त्याकडे आपण दुर्लक्ष करून चालत नाही. उन्हाळ्यात घाम आणि घामाच्या दुर्गंधीसंबंधी अनेक समस्या येतात. तसे उन्हाळ्यात घाम येणे ही काही नवीन गोष्ट नाही, तरीही यामुळे बहुतेक लोक वैतागलेले असतात. रोजच्या जीवनशैलीतील काही मुख्य कारणांमुळे अंडरआर्म्स काळे पडतात व त्यातून दुर्गंधी येऊ लागते. ही मुख्य कारण कोणती आहेत ते समजून घेऊयात(5 Reasons Your Armpits Suddenly Smell So Bad & What To Do About It).
कोणत्या कारणांमुळे अंडरआर्म्स काळे पडतात किंवा दुर्गंधी येते ?
१. योग्य ती स्वछता न राखल्यामुळे :- जर आपण रोज व्यवस्थित आंघोळ केली नाही, किंवा आपल्या शरीरावर ज्या भागांवर खूप घाम येतो त्या अवयवांची नीट स्वछता ठेवली नाही तर ही समस्या उद्भवते. शरीराच्या भागांची योग्य ती स्वच्छता न राखल्यास त्वचेवर बॅक्टेरिया तयार होऊ शकतात, शरीरातून अतिरिक्त दुर्गंधी येऊ शकते. यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात जर शरीरातून येणारी ही घामाची दुर्गंधी थांबवायची असल्यास दिवसातून किमान २ वेळा स्वच्छ आंघोळ करावी. अशावेळी अंडरआर्म्स किंवा ज्या अवयवांवर जास्त घाम येतो तेथील त्वचा साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी करुन घ्यावी.
२. सतत घाम येणे :- घाम येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. जेव्हा घाम त्वचेवर जास्त काळासाठी तसाच ठेवला जातो, तेव्हा तो बॅक्टेरियामध्ये मिसळू दुर्गंधी निर्माण होऊ शकते. घाम आणि दुर्गंधी कमी करण्यासाठी, अल्कहोल फ्री स्प्रे, डिओड्रंटचा वापर करावा.
३. रोजच्या आहारातील पदार्थ :- रोजच्या आहारात लसूण, कांदे आणि मसालेदार पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने अंडरआर्म्समध्ये अधिक जास्त दुर्गंधी येऊ शकते. अंडरआर्म्स मधील काळेपणा किंवा सतत येणारी दुर्गंधी नष्ट करण्यासाठी रोजच्या आहारात लसूण, कांदे आणि मसालेदार पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे. तसेच अशा पदार्थांचे सेवन केल्यानंतर दात घासण्यास विसरु नका किंवा माऊथवॉशचा वापर करण्यास विसरु नका.
भरीव, दाट पापण्या व भुवयांसाठी सोनम सांगते एक राज की बात, १ घरगुती उपाय... भुवया पापण्या होतील दाट..
४. वैद्यकीय परिस्थिती :- हायपरहाइड्रोसिस (अति घाम येणे) किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गासारख्या काही वैद्यकीय परिस्थितीमुळे अंडरआर्म्समधील दुर्गंधी वाढू शकते. तुमची वैद्यकीय स्थिती चांगली असल्याची खात्री करुन घ्यावी. उपचार पर्यायांसाठी आपल्या जवळच्या संबंधित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळी उठल्या उठल्या चेहरा भप्प सुजलेला दिसतो? भाग्यश्री सांगते त्यावर उपाय...
५. अति घट्ट / फिटिंगचे कपडे :- शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसात किंवा इतर दिवशी देखील घट्ट बसणारे, फिटिंगचे कपडे परिधान करणे टाळावे. शक्यतो नैसर्गिक कापसापासून तयार केलेल्या सैल सुती कपड्यांचा वापर करणे केव्हाही उत्तम ठरेल. कृत्रिम पदार्थांनी बनवलेले कपडे परिधान केल्याने शरीरावर येणारा घाम आणि बॅक्टेरिया आपल्या त्वचेतच अडकून बसतात, ज्यामुळे शरीराला दुर्गंधी येते. कापसा सारख्या नैसर्गिक साहित्यापासून बनवलेले सैल-फिटिंग, त्वचेला श्वास घेता येण्यासारखे कपडे घालण्याचा प्रयत्न करावा.