त्वचा जपण्यासाठी, सुंदर ठेवण्यासाठी स्किन केअर प्रोडक्टसची गरज पडते. त्वचा क्लीन करण्यापासून ते त्वचेचा पोत सुधारण्यापर्यंत त्वचेशी निगडित अनेक बारीक सारीक गोष्टींसाठी विविध प्रकारचे स्किन केअर प्रोडक्टस बाजारात उपलब्ध आहेत. सर्व जरी स्किन केअर प्रोडक्ट्स असले तरी सर्वच आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतात असं नाही. कोणासाठी विशिष्ट प्रोडक्ट खूप फायदेशीर ठरतं तर कोणासाठी तेच प्रोडक्ट त्वचेचं नुकसाम करणारं ठरतं. तर कोणासाठी अजिबातच परिणामकारक ठरत नाही. त्वचारोग तज्ज्ञ डाॅ. जयश्री शरद सांगतात की स्किन केअर प्रोडक्टस आपल्यासाठी फायदेशीर ठरतात की तोट्याचे हे आपण स्किन केअर प्रोडक्टस घेताना काय काळजी घेतो यावर अवलंबून असतं. अमूक एखाद्या प्रोडक्टसचा मैत्रिणीच्या चेहऱ्यावर चांगला परिणाम दिसला म्हणून तो आपल्या त्वचेलाही तितकाच फायदेशीर ठरेल हा विचार स्किन केअर प्रोडक्टस घेताना कराल तर आपण स्वत: आपल्या त्वचेचं नुकसान करण्याचा पर्याय स्वीकारतो असं डाॅ. जयश्री सांगतात. स्किन केअर प्रोडक्टस विकत घेण्याचे विशिष्ट नियम आहेत ते लक्षात ठेवून प्रोडक्ट्स घेतल्यास , वापरल्यास त्याचा त्वचेसाठी चांगला फायदा होतो.
Image: Google
स्किन केअर प्रोडक्टस विकत घेताना
1. स्किन केअर प्रोडक्टस निवडताना आधी आपल्याला आपल्या त्वचेची खोलवर माहिती हवी. आपली त्वचा कोरडी आहे/ तेलकट आहे/ मिश्र आहे की संवेदनशील हे ओळखून प्रोडक्टस निवडायला हवेत. विशिष्ट आरोग्य समस्येतही त्वचेवर परिणाम होतो. उदा. पीसीओएसचा त्रास असल्यास त्वचा जास्त तेलकट होते तर हायपोथायराॅडिज्मच्या समस्येत त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेचा प्रकार,आपल्याला असलेल्या आरोग्य समस्या आणि त्याचा त्वचेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन आपल्या त्वचेच्या प्रकाराला सूट होतील अशी स्किन केअर प्रोडक्टस निवडल्यास त्वचेला फायदा होतो. आपल्याला जर आपली त्वचा नीट ओळखता येत नसेल तर त्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी.
Image: Google
2. अमूक एका प्रोडक्टसमुळे त्वचा उजळ होते, मुलायम होते म्हणून ते प्रोडक्ट घेतल्यास ना त्वचा उजळ होते ना आपल्या त्वचेवरील समस्या दूर होतात. आपल्या त्वचेच्या नेमक्या समस्या काय , त्वचेची गरज आहे हे ओळखून प्रोडक्टस् निवडावेत. उदा, चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या असतील, त्वचा काळवंडलेली असेल, त्वचेवर सुरकुत्या असतील , त्वचा निस्तेज दिसत आहे, त्वचेवर लालसर डाअ आहेत, स्किन टोन असमान आहे यापैकी कोणती/ कोणत्या समस्या आहेत हे बघून या समस्यांवर उपयोगी स्किन केअर प्रोडक्ट निवडावे.
Image: Google
3. स्किन केअर प्रोडक्ट घेताना केवळ त्यातले घटक जाणून घेणं पुरेसं ठरत नाही तर प्रोडक्टची मॅन्युफॅक्चरिंगडेट्, त्याची एक्सपायरी डेट तपासून घेणं गरजेचं. एक्सपायरी झालेलं स्किन केअर प्रोडक्ट त्वचेसाठी वापरल्यास त्याचा नकारात्मक परिणाम त्वचेवर होतो.
Image: Google
4. काही विशिष्ट प्रोडक्टसच्या बाबतीत त्यांच्या एक्सपायरी डेटसोबतच प्रोडक्ट उघडल्यानंतर किती दिवसात एक्सपायर होईल याचीही तारीकह् दिलेली असते. याला 'ओपन प्रोडक्ट एक्सपायरी डेट असं म्हणतात. आपण घेत असलेल्या प्रोडक्टवर ओपन प्रोडक्ट एक्सपायरी डेट आहे का? ती कोणती , प्रोडक्ट वापरायला काढल्यावर किती दिवसात वापरायला हवं हे जाणून घेणं आवश्यक आहे.
Image: Google
5. आपल्या मैत्रीणीला/ घरातील आणखी कोणाला विशिष्ट स्किन केअर प्रोडक्टचा लाभ झाला तर म्हणून आपण ते वापरल्यास आपल्यालाही तसाच फायदा होईल हे पाहून स्किन केअर प्रोडक्ट खरेदी करु नये. कोणाची काॅपी करुन स्किन केअर प्रोडक्टस खरेदी केल्यास त्याचे तोटेच होतात. डाॅ. जयश्री म्हणतात, की प्रत्येकाची त्वचा वैशिष्ट्यपूर्ण असते . त्यामुळे आपल्या स्किन केअर प्रोडक्ट विकत घेताना आपल्या सोबतचे काय घेताय, काय वापरताय याची काॅपी न करता आपल्या त्वचेचा प्रकार, गरज, समस्या ओळखायला हवी तरच आपण घेतलेले स्किन केअर प्रोडक्ट खऱ्या अर्थानं आपल्या त्वचेची काळजी घेण्यास परिणामकारक ठरतात. त्वचेशी निगडित समस्यांचं स्वरुप गंभीर असल्यास किंवा त्वचा संवेदनशील असल्यास सांगीव ऐकीव स्किन केअर प्रोडक्टस खरेदी न करता याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास त्वचेची सुरक्षितताही जपता येते.