गरमीच्या दिवसात त्वचेचे आजार होणं कॉमन आहे. कारण सतत घाम आल्यानं आणि त्वचेवर घाम जमा झाल्यानं संसर्ग होऊन रिंग वर्म, फंगल इन्फेक्शन असे आजार वाढतात. (How to Cure Fungal Infection on Skin Naturally) अंग ओले राहिले आणि ओल्या त्वचेवर कपडे घातल्यानंही इन्फेक्शन वाढत जातं. महिनोंमहिने औषधं घेतल्यानंतरही हे इन्फेक्शन बरं होत नाही. हे टाळण्यासाठी घट्ट कपडे घालणं टाळून सुती कपडे वापरायला हवेत याशिवाय त्वचेवर कोणत्याही केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर करणं टाळा. हा त्रास टाळण्यासाठी काही घरगुती उपाय तुमची मदत करू शकतात.( 5 Simple Home Remedies For Fungal Infections)
मध
मधातील हिलिंग गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. हे एक एंटी सेप्टिक आहे. यामुळे फंगल इन्फेक्शनपासून आराम मिळतो. यातील हायड्रोजन पेरोक्साईड बॅक्टेरिया आणि फंगसला कमी करतात. कोणत्याही संसर्गासाठी मध वापरण्यासाठी, संक्रमित भागावर एक चमचा मध लावा आणि अर्धा तास सोडा. लवकर बरे होण्यासाठी आपण दिवसातून दोनदा हे करू शकता.
कडुलिंब
कडुलिंबात औषधी गुणधर्म असतात. यामुळे खाजेची समस्या उद्भवत नाही. कडुलिंबाची पानं रामबाण उपाय आहेत कडुलिंबाची पानं वाटून पेस्ट तयार करा आणि खाज येत असेल अशा ठिकाणी लावा. यामुळे त्वचेचं इन्फेक्शन कमी होतं.
नारळाचं तेल
नारळाचं तेल अनेक आजारांवर गुणकारी आहे. या तेलाला लेमन ग्रास किंवा तिळाच्या तेलासह मिसळून खाज येत असलेल्या ठिकाणी लावा. यामुळे लवकरात लवकर आराम मिळेल. आरोग्य तज्ज्ञांनीही हे तेल लावण्याचा सल्ला दिला आहे.
हळद
हळदीला त्वचेशी संबंधित अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हटले जाते. हळदीचा तुकडा किंवा हळद पावडर पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा आणि नंतर प्रभावित भागावर लावा आणि कोरडे होण्याची वाट पाहा. नंतर एकामागून एक थर घाला. असे काही दिवस केल्यानं खाज सुटण्याच्या समस्येपासून आराम मिळेल.
झेंडूचं फूल
झेंडूचं फूल हार बनवताना आणि पूजेसाठी आवर्जून वापरलं जातं. या फुलाच्या मदतीनं तुम्ही खाजेपासून सुटका मिळवू शकता. या सुगंधित फुलात एंटी एलर्जी आणि एंटी फंगल गुण असता. ज्यामुळे खाजेपासून आराम मिळतो.