Join us  

भुवया खूपच बारीक झाल्या ? करा ५ घरगुती उपाय, भुवया होतील दाट....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2023 8:07 PM

Best Home Remedies For Thick Eyebrows : भुवया विरळ झाल्या तर करा हे सोपे घरगुती उपाय...

गोल, टपोरे सुंदर पाणीदार डोळे आणि त्यावर तेवढ्याच जाड, भरीव भुवया असणे हे प्रत्येक महिलेचे स्वप्न असते. प्रत्येक व्यक्तीनुसार भुवयांचे आकार हे बदलत जातात. कोणाच्या भुवयांचे केस हे जाड, भरीव असतात तर कुणाच्या भुवया या अगदीच पातळ असतात. परंतु आपल्या भुवया जेवढ्या जाड व भरीव असतील तेवढ्याच त्या दिसायला अतिशय सुंदर दिसतात. भुवयांचे केस जाड, भरीव असलयाने आपण त्यांना हवा तसा आकार देऊ शकतो. विरळ आयब्रो कुणालाच आवडत नाही. अशावेळी आयब्रोचे केस दाट व भरीव दिसावे यासाठी आपल्यापैकी अनेकजण अनेक उपायांचा वापर करतात. आयब्रोचे सौंदर्य वाढवण्यासाठी काहीजणी पार्लरमध्ये जातात तर काही तरुणी आयब्रो पेन्सिलचा वापर करतात. बहुतांशजण मेकअपचा आधार घेऊन आयब्रो तात्पुरत्या स्वरुपात काळे व दाट करण्याचा पर्याय निवडतात. पण ब्युटी पार्लरमध्ये जाऊन पैसा खर्च करण्याऐवजी घरगुती उपाय करूनही आपण आपले आयब्रो नैसर्गिक पद्धतीने काळे करू शकतो.

केस हे कोणाच्याही सौंदर्यात अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. अगदी हलकासा हेअरकट केला तरी आपल्या लूकमध्ये मोठा फरक दिसून येतो. महिलांच्या बाबतीत तर भुवयांचे केसही लुक बदलण्यात मोठी मदत करतात. महिन्याभराने जेव्हा आपण पार्लरमध्ये आयब्रो करून येता तेव्हा लगेच “तुझ्या चेहऱ्यात काहीतरी वेगळं दिसतंय” अशा कमेंट लगेच ऐकू येतात, हो ना? त्यामुळे छान जाड भुवया असाव्यात अशी इच्छा अनेकांची असते. भुवया जाड व भरीव करण्यासाठी महागड्या ट्रिटमेंट्स करण्यापेक्षा घरगुती उपायांचा आपण वापर करू शकतो(5 Simple Home Remedies To Grow Thicker Eyebrows Naturally).

भुवया दाट व भरीव करण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय :- 

१. ऑइल मसाज करावा :- भुवया जाड व दाट करण्यासाठी आपण तेलाने रोज भुवयांना मसाज करू शकता. यासाठी आपण आपल्या भुवयांवर ऑलिव्ह ऑईल किंवा खोबरेल तेल लावू शकता आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी मसाज करू शकता. यामुळे भुवयांच्या केसांची वाढ होते. उत्तम परिणामांसाठी आपण ऑलिव्ह ऑइलमध्ये बदामाचे तेलही मिक्स करून तेही भुवयांना लावून मसाज करू शकता.

१ कांदा- १ कप खोबरेल तेल- पाहा या तेलाची जादू; केस गळती ते कोंडा- केसांच्या समस्या गायब!

२. एलोवेरा जेल लावा :- भुवया भरीव बनवण्यासाठी आपण त्यावर एलोवेरा जेलही लावू शकता. यासाठी कोरफडीच्या पानांमधून जेल काढून घ्यावे आणि ४ ते ५ मिनिटे या जेलने भुवयांना मसाज करावा. अर्ध्या तासानंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. जर आपल्याकडे ताज्या कोरफडीचा गर नसेल तर आपण बाजारांत विकत मिळणाऱ्या एलोवेरा जेलचा देखील वापर करू शकता. 

१ चमचा मेथी दाणे आणि चमचाभर कोरफड जेल, केसातला कोंडा होईल कमी- खास उपाय...

३. कच्च्या दुधाचा वापर करावा :- भुवया अधिक दाट व भरीव करण्यासाठी आपण कच्च्या दुधाचा देखील वापर करु शकतो. यासाठी एका भांड्यात थोडे कच्चे दूध घ्या आणि त्यात कापसाचा गोळा बुडवा. नंतर भुवयांवर लावा आणि काही वेळ हलक्या हातांनी मसाज करूनन घ्यावा. पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. दुधामध्ये असलेली प्रथिने भुवयांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक पोषण देऊन त्यांना जाड व भरीव होण्यास मदत करतात. 

४. पेट्रोलियम जेली लावा :- भुवया दाट करण्यासाठी आपण पेट्रोलियम जेली देखील वापरू शकता. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी भुवयांवर थोडी पेट्रोलियम जेली लावून थोडा वेळ मसाज करा, त्यानंतर भुवया स्वच्छ कापडाने पुसून घ्या. पेट्रोलियम जेलीमध्ये असलेले उत्कृष्ट हायड्रेटिंग एजंट भुवयांची वाढ सुधारण्यास मदत करतात. 

जास्वंद-मोगरा घालून केलेलं तेल लावा, विसरा केसाच्या समस्या! ऋजुता दिवेकरच्या आईने शेअर केला खास उपाय...

५. ग्रीन टी उपयुक्त ठरू शकते :- ग्रीन टी च्या मदतीने देखील आपण भुवयांना जाड व भरीवपणा देऊ शकतो. यासाठी ग्रीन टी बनवा आणि थंड करा, नंतर कापसाच्या मदतीने भुवयांवर लावा. वीस मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. ग्रीन टीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट घटक भुवयांच्या केसांची वाढ सुधारण्यात चांगली भूमिका बजावू शकतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्स