हिवाळ्यात थंडी सुरू झाली की सगळ्यात आधीच्या त्वचेच्या तक्रारी डोकं वर काढू लागतात. त्वचा कोरडी पडते किंवा उलायला लागते. अशी कोरडी झालेली त्वचा मग थोडी जरी ताणली गेली तरी लगेच ती भुरकट- पांढरट दिसू लागते. अशा कोरड्या त्वचेचे टॅनिंगही खूप लवकर होते. त्यामुळे मग अनेकदा अंग काळवंडल्यासारखे दिसते. असं होऊ नये म्हणून हिवाळ्यात आंघोळ करताना ५ गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे (5 Simple skin care tips for dry skin in winter). या काही साध्या- सोप्या गोष्टी केल्या तर हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे, उलणे असा काहीही त्रास होणार नाही. शिवाय या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ देण्याचीही गरज नाही (How to maintain moisture in skin, Skin care routine for winter). त्यामुळे हे काही उपाय काही दिवस नियमितपणे करून पाहा...(5 tips for bathing in winter for soft skin)
हिवाळ्यात अंग कोरडे पडू नये म्हणून उपाय
१. मॉईश्चरायझिंग बाॅडी वॉश
हिवाळ्याच्या दिवसांत तुमचा साबण बदलणं खूप गरजेचं आहे. कारण या दिवसांत कोणताही हार्ड साबण लावू नये.
हा बघा करिना कपूरचा तब्बल ५ लाखांचा चमचमता मेटॅलिक गाऊन, बघा त्या गाऊनची खासियत
सॉफ्ट सोप किंवा सॉफ्ट बॉडी वॉशचा वापर करावा. त्यासाठी तुमच्या साबणमध्ये किंवा बॉडी वॉशमध्ये shea butter, glycerin, or hyaluronic acid हे घटक आहेत की नाही ते तपासा. हे घटक असणारी साबण किंवा बॉडीवाॅशच हिवाळ्यात वापरा.
२. कोमट पाण्याने आंघोळ
थंडी जास्त असते म्हणून आपण हिवाळ्यात कडक पाण्याने आंघोळ करतो. पण यामुळे त्वचेतलं मॉईश्चर निघून जातं आणि त्वचा कोरडी पडते. त्यामुळे हिवाळ्यात कोमट पाण्यानेच आंघोळ करा. कडक पाणी टाळा.
३. जास्त स्क्रब नको
काही जणी हातापायांना आठवड्यातून दोन- तीन वेळा स्क्रब करतात. पण हिवाळ्यात त्वचा नाजूक झालेली असल्याने वारंवार स्क्रबिंग टाळावे. आठवड्यातून एकदाच स्क्रब करावे.
४. अंग पुसण्याची योग्य पद्धत
काहीजण खूप खरखरीत टॉवेलने खूप जोरात घासून अंग कोरडं करतात. पण ही पद्धत चुकीची आहे. हिवाळ्यात तर अशा पद्धतीने मुळीच अंग पुसू नये. अंग कोरडं करण्यासाठी टॉवेल अलगदपणे अंगाला लावून ओलसरपणा टिपून घ्यावा.
घरच्या पावभाजीला विकतसारखी चव- रंग येतच नाही? २ सिक्रेट टिप्स- स्ट्रीटस्टाईल पावभाजी आता घरीच
५. मॉईश्चरायझर
मॉईश्चरायझर तर आपण लावतोच. पण थंडीमध्ये आंघोळीनंतर अंग थोडं ओलसर असतानाच माॅईश्चरायझर लावावं. त्यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते.