हिवाळा आणि ड्रायनेस ही खूपच कॉमन समस्या आहे. हिवाळ्यात वातावरणातील गारठ्यामुळे प्रामुख्याने त्वचा खूपच रुक्ष, निस्तेज आणि कोरडी पडते. त्वचा फुटू नये म्हणून आपण हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिम्स, लोशन, मॉइश्चरायझर लावतो. परंतु काहीवेळा त्वचेची विशेष काळजी घेऊन देखील थंडीत फुटते, अशातच जर आपण वॅक्सिंग केले तर त्वचा अधिकच कोरडी, आणि रुक्ष दिसते. हिवाळ्यात वॅक्सिंग केल्याने काहीवेळा तर त्वचेवर बारीक रेषा, सुरकुत्या पडून त्वचा संपूर्ण पांढरी पडते आणि फुटते. आपण त्वचेवरील केस काढून टाकण्यासाठी वॅक्सिंग करण्याचा सोपा पर्याय निवडतो. परंतु हिवाळ्यात वॅक्सिंग करताना आधीच थंडीमुळे कोरड्या पडलेल्या त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते( Waxing in the Winter Everything You Need to Know).
बरेचदा हिवाळ्यात वॅक्सिंग केल्यानंतर आपल्या त्वचेवर कोरडेपणा अधिक जाणवू लागतो. यामुळे हिवाळ्यात वॅक्सिंग करून देखील आपली त्वचा गुळगुळीत, मुलायम दिसण्याऐवजी कोरडी, रुक्ष, निस्तेज दिसते. त्याचबरोबर, हिवाळ्यात थंडीने कोरडी पडलेली त्वचा वॅक्सिंग करताना अधिक ताणली जाऊन त्वचेला भेगा किंवा इजा होण्याची (5 Winter Waxing Tips for Silky Smooth Skin) शक्यता असते. असे होऊ नये म्हणून कित्येकजणी हिवाळ्यात वॅक्सिंग करणेच सोडून देतात. परंतु आपण काही गोष्टींची विशेष काळजी घेतली तर हिवाळ्यात देखील आपण अगदी सहजपणे वॅक्सिंग करु शकतो. हिवाळ्यात वॅक्सिंग करताना लक्षात ठेवाव्यात अशी काही सोप्या गोष्टी पाहूयात(5 Simple Tips To Avoid Dryness After Waxing In Winters).
हिवाळ्यात वॅक्सिंग करताना लक्षात ठेवा या गोष्टी...
१. वॅक्सिंग केल्यानंतर लगेच त्वचेसाठी गरम पाण्याचा वापर करु नका.
हिवाळ्यात गरम पाणी चांगल वाटत हे खर आहे पण सगळ्याच गोष्टींचा अतिरेक वाईट असतो. त्यामुळे हिवाळ्यात वॅक्सिंग केल्यानंतर लगेच त्वचेसाठी गरम पाण्याचा वापर करु नका. खरतर, खूप गरम पाणी त्वचेतील आवश्यक तेल आणि आर्द्रता काढून टाकते. वॅक्सिंगनंतर त्वचा संवेदनशील असल्याने गरम पाण्याने तिला इजा होऊ शकते, यासाठी हिवाळ्यात वॅक्सिंग केल्यानंतर लगेच त्वचेसाठी गरम पाण्याचा वापर करु नका.
हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावून देखील त्वचा कोरडी पडते? ‘या’ ३ चुका तुम्ही हमखास करताय...
२. वॅक्सिंग करण्याआधी आणि नंतर त्वचा मॉइश्चराइझ करुन घ्यावी.
हिवाळ्यात वॅक्सिंग करण्याआधी आणि नंतर त्वचा मॉइश्चराइझ करुन घ्यावी. हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा आधीच कोरडी होते. कारण वातावरणातील थंड हवेमुळे त्वचेतील आर्द्रता शोषून घेतली जाते. अशा परिस्थितीत, जेव्हा आपण वॅक्सिंग करतो तेव्हा त्वेचेचा कोरडेपणा अधिक दिसून येतो. यासाठी, आपण वॅक्सिंग करण्यापूर्वी आणि नंतर त्वचेला मॉइश्चरायझिंग करू शकता. थंडीत तुम्ही दररोज तुमच्या त्वचेवर एलोवेरा जेल किंवा कोको बटर लावू शकता. यामुळे हिवाळ्यात वॅक्सिंग करताना त्वचा ताणली जाणार नाही, तसेच त्वचेचा ओलावा कायम टिकून राहील.
थंडीत त्वेचेला भेगा पडतात-काळपटपणा येतो? खोबरेल तेलात मिसळा ३ पदार्थ, त्वचा राहील मऊ मुलायम कायम!
३. प्री-वॅक्स स्क्रब वापरा.
हिवाळ्यात वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचेला हलकेच स्क्रब करू शकता. यामुळे आपल्या त्वेचेवरील डेड स्किन निघून जाईल. यानंतर वॅक्सिंग केल्यावर त्वचा मऊ, मुलायम दिसेल. यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले स्क्रब किंवा इतर ब्यूटी प्रॉडक्ट्स तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापरू शकता. यामुळे तुम्हाला वॅक्सिंग करणे सोपे जाईल.
४. हिवाळ्यात त्वचेच्या संरक्षणासाठी योग्य वॅक्सची निवड करणे आवश्यक असते.
हिवाळ्यात आधीच रुक्ष, कोरड्या पडलेल्या त्वचेला वॅक्सिंग करण्यासाठी योग्य वॅक्सची निवड करणे आवश्यक असते. हिवाळ्यात फक्त आर्गन किंवा डार्क चॉकलेट वॅक्स वापरावे. आर्गन वॅक्समध्ये व्हिटॅमिन ई, फॅटी अॅसिड असल्यामुळे त्वचेला झटपट ओलावा मिळतो. त्याचवेळी, डार्क चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे त्वचा खूप गुळगुळीत होते.
५. वॅक्सिंग केल्यानंतर सैल कपडे घालणे.
वॅक्सिंग केल्यानंतर खूप घट्ट कपडे घातल्याने त्वचेला हानी पोहचू शकते. अशा परिस्थितीत, हिवाळ्यात वॅक्सिंग केल्यानंतर शक्यतो सैल कपडे घालावे. सैल कपडे घातल्याने वॅक्सिंग केल्यानंतर कोरडेपणामुळे त्वचेवर लालसरपणा येणार नाही.