Join us  

रोज सकाळी न चुकता फक्त १५ मिनिटं ५ गोष्टी करा, आजीबाई झालात तरी चेहऱ्यावरचा ग्लो कमी होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2023 1:37 PM

5-Step Morning Skin Care Routine For Glowing Skin चेहऱ्यावर ग्लो यावा असं सगळ्यांना वाटतं, त्यासाठीच हे उपाय

ग्लोइंग - सॉफ्ट त्वचा कोणाला नाही आवडत. मात्र, धूळ, माती, प्रदुषणामुळे चेहऱ्यावर स्कीनच्या निगडीत अनेक समस्या निर्माण होतात. सध्या बाजारात अनेक प्रकारचे स्कीनकेअर प्रॉडक्ट्स मिळतात. काही प्रॉडक्ट्स चेहऱ्यावरील समस्या सोडवण्यासाठी मदत करतात. तर काही प्रॉडक्ट्समुळे स्कीन आणखी खराब होते. तर काही महिला तासंतास ब्यूटी पार्लरमध्ये ब्यूटी ट्रिटमेंट घेण्यासाठी पैसे आणि वेळ दोन्ही घालवतात. मात्र, चेहऱ्यावर हवा तसा ग्लो येत नाही.

काही दिवसात सणावाराचे दिवस सुरु होतील. या दिवसात प्रत्येकीला असे वाटते, की आपली त्वचा सुंदर - ग्लो करावी. जर आपल्याला देखील असे वाटत असेल, तर सकाळी स्कीनसाठी फक्त १५ मिनिटं काढा. जर नियमित आपण ही मॉर्निंग रुटीन फॉलो केली तर नक्कीच, चेहऱ्यावर आपल्याला बदल दिसून येईल. या रुटीनमुळे वय झालं तरी, वृद्धत्वाची लक्षणं लवकर दिसून येणार नाही(5-Step Morning Skin Care Routine For Glowing Skin).

मॉर्निंग रुटीनमध्ये फॉलो करा ५ गोष्टी

क्लिंजर

सकाळी उठल्यानंतर चेहरा माईल्ड क्लिंजरने स्वच्छ करा. साबण किंवा फोमिंग प्रॉडक्ट्सचा वापर टाळा. जर आपली त्वचा ड्राय असेल तर क्रीम किंवा ऑइलयुक्त क्लिंजरचा वापर करा.

कितीही तेल लावा-शाम्पू बदला केस गळणं थांबत नाही? डॉक्टर विचारतात, तुम्ही पाणी किती पिता..

नैसर्गिक फेसपॅक

चेहरा क्लिंजरने स्वच्छ केल्यानंतर नैसर्गिक फेसपॅकचा वापर करा. यासाठी हळद, बेसन आणि चंदन एकत्र करून पेस्ट तयार करा. व ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. १५ मिनिटानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची शक्यता दूर होईल.

टोनर

त्वचेला एक्‍स्‍ट्रा हायड्रेशन देणं गरजेचं आहे. यामुळे चेहरा तुकतुकीत आणि ग्लो करते. यासाठी रोज त्वचेवर टोनरचा वापर करा. जर आपल्याकडे टोनर नसेल तर, चेहऱ्यावर गुलाबपाणी लावा. यासह नियमित भरपूर पाणी प्या.

शरीराला घामामुळे दुर्गंध येतो? आंघोळीच्या पाण्यात मिसळा ५ रुपयांची पांढरी गोष्ट - दिवसभर राहाल फ्रेश

सिरम

धूळ, माती, प्रदुषणामुळे चेहरा डल होतो. त्यामुळे स्कीनला एक्‍स्‍ट्रा प्रोटेक्‍शन देणं गरजेचं आहे. आपण चेहऱ्यावर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध सिरम लावू शकता. याच्या नियमित वापरामुळे वृद्धत्वाची चिन्हे त्वचेवर दिसून येत नाही.

सनस्क्रीन

घराबाहेर पडताना नेहमी चेहऱ्यावर सनस्क्रीनचा वापर करा. आपल्या स्कीनवर सूट करेल, अशा सनस्क्रीनचा वापर करा. चेहऱ्याला नेहमी धूळ, माती, प्रदुषणापासून प्रोटेक्ट करा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी