Join us  

ऐन तिशीत चेहऱ्यावर सुरकुत्या? रात्री झोपण्यापूर्वी करा ५ गोष्टी, चेहऱ्यावर तेज येईल लखलखीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2024 5:37 PM

5 Step Night Time Routine For Beautiful Skin : झोपण्यापूर्वी चेहऱ्याची घ्या 'अशी' काळजी; स्किन करेल ग्लो - कायम दिसाल तरुण..

वय आणि काळासोबत आपला हळूहळू चेहरा बदलू लागतो (Skin Care Tips). वयाच्या प्रत्येक टप्प्यावर, आपण आपल्या त्वचेची काळजी घ्यायला हवे. विशेष म्हणजे चाळीशीनंतर त्वचेच्या अनेक समस्या वाढत जातात (Beauty Tips). त्वचेच्या समस्यांवर आपण केमिकल रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतो (Beautiful Skin). पण यामुळे त्वचा अधिक खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यामुळे कमी वयातच त्वचा अधिक खराब होऊ लागते (30s Skin Care Routine).

चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात, आणि पिंपल्सचे डागही तसेच राहतात. जर चाळीशीनंतरही आपली त्वचा कायम तुकतुकीत राहावी असे वाटतं असेल तर, आतापासूनच 'या' गोष्टी फॉलो करायला विसरू नका. यामुळे त्वचेवर नवा तेज येईल(5 Step Night Time Routine For Beautiful Skin).

झोपण्यापूर्वी 'या' टिप्स फॉलो करा

झोपण्यापूर्वी मेकअप काढा

रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढायला विसरू नका. अनेक महिला मेकअप न काढता झोपतात. यामुळे मेकअपमधील रसायन चेहऱ्याला हानी पोहचवतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी नेहमी मेकअप काढून झोपा.

थंड पाण्याने चेहरा धुवा

झोपण्यापूर्वी नेहमी थंड पाण्याने चेहरा धुवा. असे केल्याने, चेहऱ्यावर असलेले बॅक्टेरिया आणि घाण साफ होतील, त्यानंतर आपल्याला फ्रेश वाटेल. याशिवाय रात्री थंड पाण्याने चेहरा धुतल्याने गाढ झोपही लागेल.

घरात बघावं तिकडं केस? योगगुरु सांगतात रोज ५ गोष्टी करा, केस गळती कायमची थांबेल

मॉइश्चरायझर लावा

स्किन केअर रूटीनमध्ये चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. यामुळे त्वचा हायड्रेट राहील. त्वचेचे वृद्धत्व कमी करण्यासाठी नाईट क्रीम देखील उपयुक्त ठरेल.

चेहऱ्याला मसाज करा

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला मसाज करा. चेहऱ्याला मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि सुरकुत्या येणं थांबतात.

ती सोडून गेली आणि ‘त्यानं’ स्वत:ला बदलून टाकलं, पाहा ब्रेकअपने आयुष्य पालटवणाऱ्या तरुणाची गोष्ट

अंडर आय क्रीम लावा

रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांभोवती अंडर आय क्रीम लावा. विशेषत: जे मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर तासन् तास घालवतात. त्यांच्यासाठी डोळ्याखालील क्रीम लावणे खूप महत्वाचे आहे. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स