Join us  

हिना खाननेही केला समर- कुल हेअरकट, उन्हाळ्यासाठी खास मोस्ट स्टायलिश 5 हेअरस्टाइल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 1:12 PM

Most stylish hairstyle for summer: उन्हाळ्याच्या गरमाटात केसांचा ताण नको आणि आपल्याही लूकमध्ये थोडा चेंज यावा, यासाठी अनेक जणी उन्हाळ्याच्या तोंडावर मस्त स्टायलिश हेअर कट (stylish hair cut) करून घेतात.. यंदा तुमचाही असा विचार असेल, तर या काही हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता....

ठळक मुद्देयावर्षी कोणता हेअर कट करायचा, याचा विचार करत असाल, तर हे काही ट्रेण्डी पर्याय नक्कीच बघून घ्या..

पावसाळ्यात, हिवाळ्यात मस्त हवे तेवढे केस वाढू द्यायचे आणि उन्हाळ्यात मात्र एक झकास हेअर कट करून स्वत:चा लूक बदलवून टाकायचा, हा अनेक जणींचा फंडा.. यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल होतो, थोडा लूक, चेहरा बदलला की आपल्यालाही फ्रेश वाटतं.. शिवाय उन्हाळ्यात लांबसडक केस मेंटेन ठेवण्याचा त्रासही वाचताे.. फ्रेब्रुवारी अर्धा संपलाय आणि आता उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जर तुम्हीही यावर्षी कोणता हेअर कट (trendy hair cut for summer) करायचा, याचा विचार करत असाल, तर हे काही ट्रेण्डी पर्याय नक्कीच बघून घ्या..

 

१. वेव्ही हेअर कट (wavy hair cut like Hina Khan)छोट्या पडद्यावरची मोठी अभिनेत्री हिना खान हिनेही तिचा लूक बदलून एक स्टायलिश हेअर कट केली आहे. तिने तिच्या या लेटेस्ट हेअरस्टाईलचा फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, हिनाचा हा नवा लूक तिच्या चाहत्यांना भलताच आवडला आहे. कारण अवघ्या एक- दोन दिवसांत हिनाच्या या फोटोंना जवळपास ३ लाख लाईक्स मिळाले आहेत. हिनाने तिचे केस खांद्यांच्या लेन्थपेक्षाही कमी केले आहेत... या हेअरस्टाईलचं नाव वेव्ही हेअर कट असं आहे. शॉर्ट हेअर नको असतील, तर हिनासारखी हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच करू शकता. 

 

२. पिक्सी हेअरकट (pixie hair cut)ज्या मुलींना बॉयकट प्रकारात मोडणारे खूपच शॉर्ट केस आवडतात, त्या मुलींसाठी पिक्सी हेअरकट हा एक छान पर्याय आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे मंदिरा बेदीची जी हेअरस्टाईल आहे, तिला पिक्सी हेअरकट म्हणतात. अशीच हेअर स्टाईल काही दिवसांपुर्वी किरण राव हिनेही केली होती. वेस्टर्न लूकमध्ये शोभून दिसणारी ही हेअरस्टाईल साडी नेसल्यानंतरही अगदीच हटके लूक देते...

 

३. ब्लंट बॉब हेअरस्टाईल... ( blunt bob hair style)'कुछ कुछ होता है' या चित्रपटातली काजोलची हेअरस्टाईल आठवते? किंवा 'क्या केहेना' या चित्रपटातली प्रिटी झिंटा हिची हेअरस्टाईल? अशा पद्धतीच्या हेअरकटला ब्लंट बॉब हेअरकट म्हणतात. हे दोन्ही चित्रपट जरी जुने झाले असतील, तरी त्या हेअर स्टाईल मात्र अजूनही तेवढ्याच स्टाईलिश आहेत... त्यामुळे शॉर्ट हेअर पाहिजेत, पण अगदीच पिक्सी कट नको असेल तर ब्लंट बॉब हेअरस्टाईचा पर्याय चांगला आहे..

 

४. शॉर्ट फ्रेंच बॉब हेअरस्टाईल (short french bob)थोडी थोडी ब्लंट बॉब हेअरस्टाईलसारखीच वाटणारी ही हेअरस्टाईल. या हेअरस्टाईलमध्ये केसांची लांबी जॉ लाईनपर्यंत ठेवली जाते आणि खालच्या बाजूने केसांच्या अतिशय सॉफ्ट लेअर केलेल्या असतात. कुरळ्या केसांपासून ते सिल्की केसांपर्यंत सगळ्याच केसांसाठी ही हेअरस्टाईल चांगली दिसते..

 

५. शॉर्ट लेअर कट (short layer cut)या प्रकारच्या लेअर कटमध्ये तुमचे केस मानेपर्यंत लांब किंवा त्यापेक्षाही शॉर्ट ठेवता येतात. अगदी वरपासून ते खालपर्यंत ४ ते ५ लेअर्समध्ये केस कापले जातात. पातळ केस असतील तर या हेअरस्टाईलमुळे तुमचे केस नक्कीच बाऊन्सी दिसू शकतात. सिल्की किंवा सेमी कर्ल केसांवर ही हेअरस्टाईल जास्त शोभून दिसते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीमंदिरा बेदीहिना खानकाजोलसमर स्पेशल