डोळ्यांवरील आयब्रो हा विषय जितका नाजूक आहे तितकेच आयब्रोसुद्धा नाजूक असतात. आयब्रोची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. आयब्रो हा चेहेऱ्यावरील सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपल्या चेहेऱ्याच्या सुंदरतेत भर पाडण्यात आयब्रोचे मोठे योगदान आहे. आयब्रोचे केस वाढल्यावर त्या विचित्र दिसतात. भुवयांना व्यवस्थित शेप करण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो. जर भुवया चेहेऱ्याच्या आकारानुसार, कधी जास्त किंवा बारीक कोरल्या गेल्या असतील तरीदेखील चेहेऱ्याचा लूक खराब (How to Shape Eyebrows without pain) होतो. त्यामुळे आयब्रो करताना त्या नीट कोरण गरजेचं असून, त्यामुळे चेहेऱ्याला उठावदार लूक येतो. आयब्रो केल्याने चेहेऱ्याला येणाऱ्या छान लूकमुळे ते करावेसे वाटतात, पण ते करताना होणाऱ्या वेदनेमुळे काही स्त्रियांना आयब्रो करणे म्हणजे मोठं संकटच वाटत. आयब्रो करताना होणाऱ्या वेदनेला कमी करण्यासाठी काही खास (5 Super Easy Hacks That Make Eyebrow Threading & Plucking Completely Painless) टिप्स.. यामुळे आपण बिनधास्तपणे वेदनाविरहित आयब्रो करू शकता(How to Thread Eyebrows).
आयब्रो करताना बरेचदा आपल्याला काही वाटत नाही. परंतु आयब्रो केल्यानंतर होणाऱ्या वेदना या नकोशा होतात. काहीजणींना तर आयब्रो केल्यानंतर तो भाग लाल होणे, आयब्रोच्या भागावर सूज येणे, जळजळ होणे, रॅशेज येणे अशा अनेक लहान मोठ्या समस्या जाणवतात. असे होऊ नये म्हणून आधीच खबरदारी घेतलेली चांगली असते. यासाठी आयब्रो केल्यानंतर जर आपल्याला देखील अशा समस्या येत असतील तर काही घरगुती उपाय लक्षात ठेवूयात(Painless Eyebrow Threading Useful Tips).
आयब्रो थ्रेडिंगनंतर येणारी सूज, जळजळ, रॅशेज कमी करण्यासाठी उपाय...
१. एलोवेरा जेल वापरा :- आयब्रो थ्रेडिंगनंतर दिसणारी सूज, जळजळ होणे, रॅशेज येणे या समस्या दूर करण्यासाठी कोरफड जेलचा वापर आपण करु शकता. आयब्रो थ्रेडिंग केल्यानंतर भुवयांवर थोडेसे कोरफडीचे जेल घेऊन लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे आयब्रो थ्रेडिंगनंतर आलेली सूज, जळजळ कमी होण्यास मदत मिळते.
२. थंड पाण्याचा वापर करा :- आयब्रो केल्यानंतर भुवयांवरील सूज दूर करण्यासाठी थंड पाण्याचा किंवा बर्फाचा देखील आपण वापर करु शकतो. थ्रेडिंगकेल्यानंतर लगेच थंड पाण्याने चेहरा धुवा. यासोबतच आपण थ्रेडिंग केलेल्या भागांवर हलक्या हाताने बर्फ चोळून लावू शकतो. आयब्रो केल्यानंतर दिवसातून अनेकवेळा या उपायाची पुनरावृत्ती करून, थ्रेडिंगनंतर दिसणारी सूज, जळजळ, वेदना सहजपणे कमी केले जाऊ शकते.
अभ्यंगस्नानासाठी नेमके कोणते तेल वापरावे ? तेल गरम करण्याची योग्य पद्धत, त्वचेला होतील अनेक फायदे...
३. हळद वापरा :- आयब्रो करुन झाल्यावर भुवयांवर येणारी सूज, जळजळ, रॅशेजची समस्या दूर करण्यासाठी हळद अतिशय फायदेशीर ठरते. यासाठी चमचाभर हळद घेऊन ती थंड पाण्यांत मिक्स करुन त्याची थोडी घट्टसर पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट थ्रेडींग केलेल्या भागांवर लावून घ्यावी ती पेस्ट १५ ते २० मिनिटे तशीच भुवयांवर ठेवून द्यावी. १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. हळदीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. हळदीच्या मदतीने सूज आणि वेदनांची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
सणासुदीसाठी मेकअप करताना ४ सोप्या स्टेप्समध्ये फाउंडेशन लावण्याची योग्य पद्धत, चेहरा दिसेल उजळ...
४. खोबरेल तेल लावा :- खोबरेल तेल हा आपल्या कुठल्याही प्रकारच्या स्किन प्रॉब्लेमसाठी एक उत्तम पर्याय आहे. आयब्रो केल्यानंतर जर त्या भागांवर सूज आली असेल किंवा थ्रेडिंग करताना काही लहान - मोठ्या जखमा झाल्या असतील तर आपण त्यावर खोबरेल तेल लावू शकतो. खोबरेल तेलाच्या मदतीने त्वचेला आराम मिळतो आणि सूज कमी होते. खोबरेल तेलाऐवजी आपण बदामाचे तेलही वापरू शकता. खोबरेल तेलामध्ये असलेले मॉइश्चरायझर त्वचेत ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.
वारंवार केसांना हेअर कलर करूनही केसांचा रंग फिकट होऊ नये म्हणून ७ चुका टाळा...
५. मालिश करा :- आयब्रो करण्यापूर्वी जी भुवई आपण कोरणार आहात त्या भुवईला बोटांच्या साहाय्याने हलका जोर देऊन मालिश करून घ्या. यामुळे त्या भागातील हेअर फॉलिकल्स लूज पडून भुवयांचे केस सहजरित्या काढता येतील. तसेच जास्त वेदनेची समस्याच उद्भवणार नाही.