Join us  

दिवसभर ए.सी मध्ये बसता, ५ टिप्स - कोरडी - निस्तेज तर नाही झाली तुमची त्वचा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2023 12:41 PM

Do these 5 things to protect your skin from air conditioner : सतत एसीमध्ये बसणं, पाणी कमी पिणं यामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात, ५ गोष्टींची काळजी घ्या..

आजकाल आपण घरी किंवा ऑफिस कुठेही गेलो तरीही एअर कंडिशनर हा सगळीकडे असतोच. सध्याच्या काळात आपल्यापैकी बरेचजण हे दिवसांतून बरेचवेळा  एअर कंडिशनरचा वापर करतात. दिवसांतल्या २४ तासांपैकी बरेच जास्त तास आपण ए.सी मध्येच बसून घालवतो. ए.सी मध्ये बसल्यावर आपल्याला येणाऱ्या घामापासून कायमची सुटका तर मिळते परंतु सारखं ए.सी मध्ये बसून राहण्याचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत.

एअर कंडिशनरमध्ये बसून आपल्याला खूप बरं वाटतच. घामाच्या धारा, अंगाची होणारी लाही लाही कमी होते परंतु त्याचे आपल्या त्वचेवर न कळत अनेक दुष्परिणाम होतात. आपण ए.सी मधून निघणाऱ्या कृत्रिम हवेचा आनंद घेत असताना आपल्या त्वचेला होणाऱ्या हानीकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. आपण जर दिवसेंदिवस ए.सी (Do you want to protect your skin from air conditioner; Try out these 5 steps) मध्ये असेच बसून राहिलो तर हळूहळू आपल्या त्वचेवर त्याचे दुष्परिणाम (Do these 5 things to protect your skin from air conditioner)दिसू लागतात. त्वचा रुक्ष, निस्तेज होणे, त्वचा वारंवार कोरडी पडणे, त्वचेवर सुरकुत्या वाढणे, त्वचेवरील वृद्धत्वाच्या खुणा दिसून येणे अशा अनेक समस्या उद्भवतात. यामुळे जर आपण दिवसभर ए.सी मध्ये बसत असाल तर आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स लक्षात ठेवू(5 THINGS TO DO IF YOU SIT IN AN AIR-CONDITIONED ENVIRONMENT FOR LONG HOURS).

  दिवसभर ए.सी मध्ये बसत असाल तर त्वचेची घ्या अशी काळजी... 

१. हायड्रेटेड रहा :- एअर कंडिशनिंग केवळ हवा थंड करत नाही तर त्यातील आर्द्रता देखील काढून टाकते. यामुळे आपल्या घरातील वातावरणातील आर्द्रता कमी होऊ शकते, ज्यामुळे आपली त्वचा कोरडी व निस्तेज होऊ शकते. असे होऊ नये म्हणून दिवसभर पाणी पिऊन हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या त्वचेची आर्द्रता संतुलित ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्यावे. याव्यतिरिक्त, घरातील आर्द्रता योग्य त्या पातळीवर राखण्यासाठी आपल्या  घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये ह्युमिडिफायर वापरण्याचा प्रयत्न करावा. यामुळे एअर कंडिशनर लावलेल्या ठिकाणची आर्द्रता योग्य राखली जाईल, तसेच यामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. 

फेशियल तर करतोच पण हे मेडी फेशियल नेमकं काय आहे, फेशियलचा नवा ट्रेंड...

२. त्वचेला नियमितपणे मॉइश्चराईज करा :- जर आपण दिवसभर एअर कंडिशनरमध्ये बसणार असाल तर आपल्या संपूर्ण त्वचेवर आधी मॉइश्चरायझर लावायला विसरु नका. त्वचेचा कोरडेपणा व रुक्षपणा कमी करण्यासाठी त्वचेला नियमितपणे मॉइश्चराईज करणे गरजेचे असते. आपले हात, कोपर आणि चेहरा यांसारख्या जलद कोरड्या होणाऱ्या त्वचेला ए.सी त बसण्याआधी मॉइश्चरायझर लावावे. यामुळे आपली त्वचा कोरडी न पडता त्वचेत ओलावा टिकून राहतो. मॉइश्चरायझरमध्ये असणारे hyaluronic acid किंवा ceramides सारखे घटक त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास आणि आपली त्वचा मऊ व कोमल ठेवण्यास मदत करू शकते.

महागडे मॉइश्चरायजर लोशन कशाला ? रोज रात्री ‘असे’ वापरा कोरफड जेल, त्वचा दिसेल चमकदार...

३. त्वचेचे रक्षण करा :- दिवसभर आपण जर एअर कंडिशनरमध्ये बसणार असाल तरीही सनस्क्रीन लावून त्वचेचे रक्षण करा. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपण त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावतो. याचप्रमाणे एअर कंडिशनरमध्ये बसण्याआधी देखील त्वचेला सनस्क्रीन लावणे गरजेचे असते. सनस्क्रीन लावण्यासोबतच, हलके व लांब - बाही असलेले कपडे घालण्याला प्राधान्य द्यावे, यामुळे ए.सी तून निघणाऱ्या कृत्रिम हवेपासून त्वचेचे संरक्षण केले जाते. 

चॉकलेट खा आणि चेहऱ्यालाही लावा ! १ चमचा कोको पावडर आणेल चेहऱ्यावर चमचमता आनंदी ग्लो...

४. त्वचा हळुवारपणे स्वच्छ करा :- त्वचेला कठोरपणे हार्श फेसवॉश लावून स्वच्छ करणे चुकीचे आहे. असे केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाऊ शकते आणि कोरडेपणा वाढू शकतो. यामुळे चेहरा धुण्यासाठी सौम्य, हायड्रेटिंग क्लीन्सर निवडा आणि गरम पाणी वापरणे टाळा, कारण ते आपली त्वचा आणखीनच कोरडी करु शकते. 

फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?

५. निरोगी आहाराची निवड करा :- आपल्या त्वचेच्या आरोग्याचा आपल्या आहाराशी जवळचा संबंध असतो. त्वचेचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फळे, भाज्या आणि नट यांसारख्या अँटिऑक्सिडंट्सयुक्त पदार्थांचा समावेश करावा. फ्लेक्ससीड्स आणि अक्रोड्समध्ये असणारे ओमेगा - ३ फॅटी अ‍ॅसिड त्वचेची नैसर्गिक आर्द्रता राखण्यात मदत करू शकतात. याशिवाय, त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी कॅफीन आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादित केल्याने त्वचेच्या एकूण आरोग्यात याचा फायदा होऊ शकतो.

दूध नासले तर फेकू नका, घरच्याघरी करा त्वचेसाठी खास सिरम - चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो...

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी