Join us  

उन्हाळ्यात डिओ, फेसवॉश वापरताय? रोजच्या वापरातल्या ५ घातक गोष्टी, आरोग्याशी खेळ कराल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2023 11:46 AM

5 Things You Should Never Use : या उत्पादनातील रासायनिक घटक त्वचेतून थेट आपल्या शरीरात जात असतात.

आपण रोज सकाळी उठल्यापासून टूथपेस्ट, फेसवॉश, डिओड्रंट अशा एक ना अनेक गोष्टी वापरत असतो. उन्हाळ्याच्या दिवसांत तर घामाघूम होत असल्याने आपण दर काही वेळाने फेसवॉश वापरुन तोंड धुतो. इतकेच नाही तर दिवसभर घामाचा वास येऊ नये म्हणून आपण अंगावर डिओड्रंटही मारतो. या सगळ्या गोष्टींमध्ये असणारे रासायनिक घटक आरोग्यासाठी घातक असतात. त्यामुळे केवळ त्वचेलाच नाही तर आरोग्यालाही नुकसान पोहोचण्याची शक्यता असते. प्रसिद्ध योगा प्रशिक्षक स्मृती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करतात (5 Things You Should Never Use). 

कोणती उत्पादने आपल्या आरोग्यासाठी घातक असतात, त्यामागची कारणे आणि त्याला पर्याय म्हणून काय वापरु शकतो याविषयी त्या विस्ताराने माहिती देतात. आपण वापरत असलेल्या मॉईश्चरायजर, फेसवॉश, शाम्पू, डिओ या उत्पादनांचा थेट त्वचेशी संपर्क येतो. या उत्पादनातील रासायनिक घटक त्वचेतून थेट आपल्या शरीरात जात असतात. त्यामुळे हार्मोन्सचे असंतुलन तर होतेच पण पोटाच्या तक्रारीही उद्भवतात. तसेच ही सगळी उत्पादने प्लास्टीकच्या बाटल्यांमध्ये येत असल्याने आपण निसर्गाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करतो. 

(Image : Google)

आरोग्यासाठी घातक ५ उत्पादने 

१. टूथपेस्ट२. फेसवॉश३. शाम्पू ४. बॉडी लोशन५. डिओड्रंट

या सगळ्यांना पर्याय काय?

१. घरीच करा नैसर्गिक फेसवॉश

आपण घरच्या घरी विविध पीठे वापरुन फेसवॉश तयार करु शकतो. मात्र इतका वेळ नसेल तर तांदळाच्या पीठात पाणी घालून त्याचा फेसवॉश म्हणून वापर करावा. हे करण्याआधी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. 

२. डिओड्रंटला पर्याय

बेकींग सोडा हा अतिशय सोपा आणि उत्तम उपाय असून घामाचा वास घालवण्यासाठी काखेत किंवा अन्य घाम येणाऱ्या ठिकाणी बेकींग सोड्याचा वापर करावा. यामध्ये चांगला वास येण्यासाठी बाजारात मिळणारी वेगवेगळ्या प्रकारची इसेन्शिअल ऑईलही आपण वापरु शकतो. तुम्हाला हवे असल्यास बेकींग सोडा जितका आहे तितक्याच प्रमाणात कॉर्न फ्लोअरही वापरु शकता. पण नुसता बेकींग सोडा वापरल्यासही हरकत नाही. 

(Image : Google)

३. टूथपेस्ट बनवण्यासाठी

मीठ, खोबरेल तेल आणि हळद या तीन गोष्टी एकत्र केल्यास आपली टूथपेस्ट तयार होते. या तिन्ही गोष्टी घरात सहज उपलब्ध असतात. त्यामुळे विकतची कोणत्याही ब्रँडची टूथपेस्ट वापरण्याला हा उत्तम पर्याय आहे. 

४. शाम्पू डोक्याला लावण्याआधी

आपल्या केसांत धुळीचे कण, घामाचा चिकटपणा असतो. तो निघण्यासाठी शाम्पू करण्याआधी रीठा पावडर पाण्यात भिजवून मग ती केसांच्या मूळांना लावावी. ही पावडर बाजारात सहज उपलब्ध असते. नाहीतर हरभरा डाळीचं पीठ पातळ करुन त्यानेही आपण केसांच्या खालची त्वचा स्वच्छ करु शकतो. त्यानंतर केसांना शाम्पू लावावा. म्हणजे त्वचा खराब होण्यापासून संरक्षण होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी