आपल्या सौंदर्यात आपल्या केसांचा खूप मोठा वाटा असतो. त्यामुळेच तर केसांना आपण मनापासून जपतो. त्यांची काळजी घेतो. केस लांब असो किंवा अखूड असो, कुरळे असो किंवा सिल्की असो.. सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की ते निरोगी असायला हवे. जे केस निरोगी असतात त्यांच्यावर कायम एक छान चमक असते.. पण बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की केसांची चमकच गायब होते. केस खूपच कोरडे, रुक्ष अगदी झाडूसारखे रखरखीत दिसू लागतात (5 tips to get rid of dry and split hair). विशेषत: केसांचा खालचा भाग आणि टोके खूप जास्त कोरडी पडतात (home remedies for dry hair). अशा केसांना मग लवकर फाटे फुटून ते आणखी खराब होऊन जातात (how to keep hair smooth, silky and shiny?). म्हणूनच केसांच्या बाबतीत असं होऊ द्यायचं नसेल तर पुढे सांगितलेल्या पद्धतीने केसांची काळजी घ्यायला सुरुवात करा...(best hair care solution at home for dry hair)
केस कोरडे होऊ नये म्हणून काय उपाय करावा?
केस छान सिल्की, चमकदार व्हावे तसेच त्यांचा कोरडेपणा कमी व्हावा यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील याविषयीची माहिती ब्यूटी एक्सपर्टने auroraglow.pk या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
अस्सल मराठवाडी काळा मसाला करण्याची रेसिपी! भाज्या होतील खमंग- स्वयंपाक होईल चवदार
१. यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की ज्या दिवशी केस धुणार आहात त्याच्या आदल्या रात्री केसांच्या खालच्या भागाला तेल लावून ठेवा. केसांच्या टोकांना थोडं अधिक तेल लावा.
वयाची तिशी येताच ५ गोष्टी बदला- वय वाढलं तरी तारुण्य आणि फिटनेस टिकून राहील..
२. दुसऱ्यादिवशी केसांवर ज्या ठिकाणी तेल लावलं आहे त्याच भागावर केस धुण्याच्या आधी कंडिशनर लावा. हे कंडिशनर तुमच्या केसांवर अर्धा तास राहू द्या आणि त्यानंतर केसांच्या मुळाशी शाम्पू लावून बोटाच्या टोकांनी मसाज करून केस धुवा.
३. शाम्पू केसांच्या खालच्या भागात तसेच केसांच्या टाेकांना लावू नका. तो भाग केवळ पाण्याने स्वच्छ करा.
उन्हामुळे रापलेल्या त्वचेला द्या काकडीचा गारवा! ४ पद्धतींनी काकडी वापरा- चेहरा चमकेल
४. केस धुण्यासाठी नेहमी नॉर्मल टेम्परेचरचे पाणी घ्यावे. गरम पाण्याने केस धुणे टाळावे.
५. केस धुतल्यानंतर ते कधीही उन्हामध्ये वाळवू नये. ओलसर केस घेऊन जर तुम्ही कडक उन्हात, मोकळ्या हवेमध्ये गेलात तर त्यामुळे केसांचा कोरडेपणा अधिक वाढतो.